Masala Dosa Marathi Recipe
Masala Dosa Marathi Recipe मसाला डोसा हे आपल्याकडील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थांपैकी एक आहे. नाश्त्यासाठी हमखास सर्वजण मसाला डोसा खाणं खूप पसंत करतात. अतिशय हेल्दी आणि पचण्यासाठी हलका असा मसाला डोसा असतो.
मसाला डोसा ही साऊथ इंडियन डिश असून सध्या सगळीकडेच खूप लोकप्रिय आहे. मसाला डोसा ही डिश कर्नाटकमधील उडुपी या ठिकाणची असल्याची माहिती मिळते.
मसाला डोसा हे स्ट्रीट फूड म्हणून प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक वेगवेगळे प्रकारचे डोसे हे आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला हे मसाला डोसे खायलासुद्धा खूप आवडतात.
पण हीच मसाला डोसाची रेसिपी Masala Dosa Marathi Recipe आपण आपल्या घरीसुद्धा बनवू शकतो. मसाला डोसाची रेसिपी अगदी सोपी आहे आणि अतिशय टेस्टीसुद्धा बनते.
आज आपण मसाला डोसा रेसिपी घरी कशी बनवायची ते शिकणार आहोत.
मसाला डोसा बनवण्याचं साहित्य :
आपल्या घरातील 4 – 5 जणांसाठी मसाला डोसा बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते पाहूया.
डोसा बनवण्याचं साहित्य
- 3 ग्लास रेशनचे तांदूळ
- 1 ग्लास उडीद डाळ
बटाट्याची चटणी बनवण्याचं साहित्य :
- 5 – 6 बटाटे
- 2 कांदे
- 2 – 3 हिरव्या मिरच्या
- 2 – 3 लसणाच्या पाकळ्या
- 1 तुकडा आलं
सांबर बनवण्याचं साहित्य :
- 1 वाटी तूर डाळ
- 1 कांदा
- 2 टोमॅटो
- 1 पान तेजपत्ता
- आलं लसणाची पेस्ट
- 2 – 4 वाळलेल्या लाल मिरच्या
- 2 पळ्या तेल
- अर्धा चमचा जिरे
- अर्धा चमचा मोहरी
- 1 चमचा लाल तिखट
- 1 चमचा कसुरी मेथी
- अर्धा चमचा कांदा लसूण मसाला
- अर्धा चमचा गरम मसाला
- 2 चमचे सांबर मसाला
डाळीची मिक्स चटणी बनवण्याचं साहित्य :
- अर्धा वाटी शेंगदाणे
- 2 चमचे उडीद डाळ
- 2 चमचे मुगाची डाळ
- 2 चमचे हरभरा डाळ
- 1 कांदा
- 2 – 3 लसणाच्या पाकळ्या
- 2 – 3 हिरव्या मिरच्या
- अर्धा वाटी दही
- चवीनुसार मीठ
- थोडी कोथिंबीर
- पुदिना
Masala Dosa Marathi Recipe Procedure मसाला डोसा बनवण्याची कृती :
डोसा बनवण्याची कृती :
- सगळ्यात आधी 4 – 5 तासांसाठी तांदूळ पाण्यात भिजत टाकायचे. त्यानंतर तांदूळ पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि थोडे थोडे करून बारीक दळून घ्यायचे.
- दळल्यानंतर हे पीठ एका पातेल्यात रात्रभर ठेवायचं.
मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं हे पीठ छान फुगलं असेल. त्यात चवीनुसार मीठ आणि चिमूटभर सोडा टाकून मिक्स करायचं. - आता गॅसवर एक पॅन ठेवायचा आणि त्यावर थोडंसं तेल लावायचं आणि डोस्याचं बॅटर त्यावर गोलाकार टाकून डोसा बनवायचा. त्यावर आपल्या घरातील मसाले टाकून मग बटाट्याची चटणी टाकायची आणि रोल करून घ्यायचा.
हा डोसा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा म्हणजे आपला डोसा तयार आहे.
बटाट्याची चटणी बनवण्याची कृती :
- सगळ्यात आधी कुकरमध्ये 5 – 6 बटाटे 5 ते 10 मिनिटांसाठी उकडून घ्यायचे. ते बटाटे सोलून घ्यायचे आणि चांगले मॅश करायचे.
- त्यानंतर एका पॅनमध्ये तेल टाकून त्यात अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा.
- मग आलं, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून टाकायच्या आणि ते फ्राय करून घ्यायचं.
- मग त्यात अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करायचं आणि 5-6 बटाटे टाकायचे. हे सर्व मिक्स करायचं आणि त्यावर कोथिंबीर टाकायची.
आपली बटाटा चटणी तयार आहे.
सांबर बनवण्याची कृती :
- एका कुकरमध्ये 1 वाटी तूरडाळ टाकून 10 – 15 मिनिटे शिजवून घ्यायची. आता एका कढईत तेल, जिरे, मोहरी, चिरलेला कांदा, तेजपत्ता टाकून छान हलवून घ्यायचं.
- कांदा लालसर झाल्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकून त्यात 2 चिरलेले टोमॅटो टाकायचे. टोमॅटो टाकल्यानंतर 2-4 वाळलेल्या लाल मिरच्या टाकायच्या.
- त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे सांबर मसाला टाकायचा आणि हे सर्व मसाले छान मिक्स करून आता आपली शिजलेली डाळ त्यात टाकायची आणि मिक्स करायची. मग त्यात 1 – 2 ग्लास पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं.
- त्यानंतर भिजत टाकलेल्या चिंचेचं पाणी आणि 2 – 3 चमचे किसलेला गूळ टाकायचा. मग 5 मिनिटे उकळी येऊ द्यायची. त्यावर कोथिंबीर टाकायची.
आपलं सांबर तयार आहे.
मिक्स डाळीची चटणी बनवण्याची कृती :
- सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे, तेल टाकून 2 चमचे उडीद डाळ, 2 चमचे मुगाची डाळ, 2 चमचे हरभरा डाळ भाजून घ्यायच्या, कांदा लालसर फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात 2-3 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, अर्धा वाटी शेंगदाणे, कोथिंबीर, पुदिना, चवीनुसार मीठ, अर्धा वाटी दही, 1 चमचा साखर टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं.
- त्यानंतर ही चटणी भांड्यात टाकायची. मग एका कढईत एक पळी तेल टाकून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून फोडणी तयार करून घ्यायची. ती फोडणी त्या चटणीत ओतून द्यायची. आपली चटणी तयार आहे.
https://faktyojana.com/dabeli-recipe-in-marathi
आपला मसाला डोसा, सांबर आणि मिक्स डाळीची चटणी तयार आहे. तुम्ही एका प्लेटमध्ये डोसा, सांबर आणि मिक्स डाळीची चटणी देऊन सर्व्ह करू शकता. सर्वांना हा टेस्टी मसाला डोसा (Masala Dosa Marathi Recipe) खूपच आवडेल.
Masala Dosa Marathi Recipe Important Tips महत्वाच्या टिप्स :
- डोसामध्ये उडदाची डाळ जास्त टाकली तर आपला डोसा क्रिस्पी बनतो.
- मिक्स डाळीची चटणी बनवताना डाळी जर तेलात भाजून घेतल्या तर चटणी खूप टेस्टी लागते.
- सांबरमध्ये चिंच आणि गूळ घातला तर सांबरही टेस्टी बनतो.
- डोसा बनवताना पीठ तव्याला चिकटू नये म्हणून तवा गरम असताना त्यावर पाण्याचा शिपका मारायचा आणि मग कपड्याने पुसल्यानंतरच पीठ तव्यावर टाकायचं म्हणजे डोसा चिकटणार नाही.
- (Masala Dosa Marathi Recipe) डोसा खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदे होतात. डोस्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं. डोसा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील हाडं, केस आणि स्नायू मजबूत होतात. आपण नाश्ता करताना डोसा खाल्ला तर शरीरात खूप वेळ एनर्जी राहते.
- डोसा बनवताना पीठ तव्यावर चिकटतं कारण तवा खूप थंड किंवा खूप गरम असतो. तवा खूप गरम असेल तर डोसा तव्यावर चिकटू नये म्हणून दरवेळी तव्यावर पाण्याचा शिपका मारायचा आणि कपड्याने पुसून घ्यायचं. त्यानंतरच तव्यावर पीठ टाकायचं म्हणजे डोसा तव्याला चिकटणार नाही.
- डोसाचं बॅटर जर गाढं बनवायचं असेल तर त्यात गव्हाचं पीठ किंवा बाजरीचं पीठ किंवा नाचणीचं पीठ टाकायचं. दुसरं पीठ टाकल्यामुळे डोसाचं बॅटर गाढं बनवता येतं.
- डोसा खाल्ल्याने आपलं वजन कमी होतं कारण डोसा आंबवून बनवला जातो आणि आंबवून बनवलेल्या पदार्थांमध्ये प्रोबायोटिकचं प्रमाण वाढते त्यामुळे डोसा खाल्ल्याने पोट चांगलं राहतं आणि वजन कमी होतं.
- मसाला डोसा Masala Dosa Marathi Recipe हे खूपच फेमस स्ट्रीट फूड आहे. डोसाचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. मसाला डोसा, मुंग दाल डोसा, पनीर डोसा, चिझ डोसा, शेजवान डोसा, मैसूर मसाला डोसा, पावभाजी डोसा, ओट्स डोसा, रवा डोसा, नाचणी डोसा, गव्हाच्या पिठाचा डोसा, बीटरूट डोसा, चना डोसा असे अनेक प्रकारचे डोसे आहेत.
- डोसा बॅटर जास्त काळ टिकावं म्हणून आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो आणि जेव्हा डोसा बनवायचा असेल तेव्हा फ्रिजमधून काढून लगेच बनवू लागतो पण तसं न करता डोसा बनवायच्या आधी 15 मिनिटे हे बॅटर बाहेर काढून ठेवावं.
FAQ About Masala Dosa Marathi Recipe | मसाला डोसा रेसिपी काही महत्त्वाचे प्रश्न :
- Masala Dosa Marathi Recipe ही कुठली डिश आहे ?
मसाला डोसा ही डिश मूळची कर्नाटकमधील उडुपी येथील आहे. मसाला डोसा ही एक अत्यंत लोकप्रिय साऊथ इंडियन डिश आहे. पण आजकाल सगळीकडेच खूप आवडीने बनवली जाते आणि खाल्ली जाते.
- Masala Dosa Marathi Recipe कशापासून बनवला जातो ?
मसाला डोसा तांदूळ, उडीद डाळपासून बनवतात त्यात घरातले मसाले, बटाट्याची चटणी टाकतात. डोस्यासोबत सांबर आणि मिक्स डाळीची चटणीसुद्धा असते. मसाला डोसाची ही रेसिपी खूप टेस्टी बनते.
Idli Sambar Marathi Recipe | ईडली सांबर रेसिपी
- Masala Dosa Marathi Recipe बनवण्याचं बॅटर आंबट झालं तर काय करायचं ?
डोसा बनवण्याचं बॅटर खूप आंबट झालं तर त्या बॅटरमध्ये थोडं पाणी टाका आणि चांगलं मिक्स करा. त्यानंतर थोडा वेळ तसंच राहू द्या. काही वेळाने जे पाणी वर आलं असेल ते काढून टाका आणि पिठात मैदा, तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ मिक्स करा म्हणजे डोस्याच्या बॅटरमधील आंबटपणा कमी होईल.
- डोस्याचं पीठ किती दिवसापर्यंत चांगलं राहतं ?
डोस्याचं पीठ दळल्यानंतर आपण रात्रभर ते झाकून ठेवतो म्हणजे ते छान आंबतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ते आंबवलेलं पीठ मिक्स करून त्याचे डोसे बनवतो. पण जर आपल्याला नंतर डोसे बनवायचे असतील तर ते पीठ एका हवा बंद डब्यात ठेवायचं म्हणजे हे पीठ आठवडाभर चांगलं राहतं.
- Masala Dosa Marathi Recipe बनवण्यासाठी कोणता तांदूळ वापरायला हवा ?
डोसा बनवण्यासाठी तुम्ही रेशनमध्ये मिळणारे तांदूळ वापरू शकता. कारण डोसा किंवा इडली बनवताना हे तांदूळ वापरल्याने बनणारे पीठ खूप चांगलं फुगतं आणि डोसा किंवा इडली खूप छान बनतं.
आपला कुरकुरीत मसाला डोसा (Masala Dosa Marathi Recipe) तयार आहे तो तुम्ही एका प्लेटमध्ये घरच्यांना सर्व्ह करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने आपण बाहेरच्या पेक्षाही उत्तम मसाला डोसा घरी बनवू शकतो. तुमच्या घरातील सर्वांना ही मसाला डोसा रेसिपी नक्कीच आवडेल यात काहीच शंका नाही.
तुम्हाला ही Masala Dosa Marathi Recipe रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सांगा. अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच पहा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.