Dabeli Recipe In Marathi | कच्छी दाबेली रेसिपी 2024

Dabeli Recipe In Marathi

Dabeli Recipe In Marathi

Dabeli Recipe In Marathi स्ट्रीट फूड खायला आपल्या सर्वांनाच खूप आवडतं. नेहमी घरचं जेवण खाऊन आपण सर्वजण कंटाळतो आणि मग काहीतरी चटपटीत खाण्याची सर्वांचीच इच्छा असते.

कच्छी दाबेली असाच एक अतिशय चटपटीत आणि टेस्टी खाद्यपदार्थ आहे. दाबेली खायला सर्वांनाच खूप आवडतं. बाहेर रस्त्यावर मिळणारी कच्छी दाबेली खाण्यासाठी भरपूर गर्दी पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या दाबेली बाहेर मिळतात ते खायला खूप गर्दी होते.

पण बाहेर आपल्याला मन भरून दाबेली खाताच येत नाही. आरोग्यासाठी बाहेरचं जास्त खाणं चांगलं नाही आणि प्रत्येकाच्या बजेटमध्येही ते बसत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण जर दाबेली घरीच बनवली तर पोट भरून खाऊ शकतो आणि पुन्हा पुन्हासुद्धा बनवू शकतो.

आज आपण एकदम चटपटीत कच्छी दाबेली घरी बनवण्याची रेसिपी (Dabeli Recipe In Marathi) शिकणार आहोत.

कच्छी दाबेली बनवण्यासाठी लागणारं साहित्य :

घरातील ४-५ जणांसाठी कच्छी दाबेली (Dabeli Recipe In Marathi) बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया.

बटाट्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य :

  • अर्धा किलो बटाटे
  • ५-६ पाकळ्या लसूण
  • १ तुकडा आलं
  • १ सोललेले डाळिंब
  • अर्धी वाटी शेंगदाणे
  • १ वाटी बारीक शेव
  • २ बारीक चिरलेले कांदे
  • दाबेली मसाला
  • १ चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा हळद
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • अर्धा चमचा कांदा लसूण मसाला
  • १ चमचा कसुरी मेथी
  • २-३ चमचे किसलेला गूळ
  • २ डजन पाव
  • बटर

चिंचेच्या चटणीसाठी लागणारं साहित्य

  • अर्धी वाटी चिंच
  • अर्धी वाटी किसलेला गूळ
  • चिमूटभर लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • ५-६ बिया काढलेले खजूर
  • अर्धा चमचा कॉर्न फ्लॉवर

पुदिना चटणीसाठी लागणारं साहित्य

  • १ वाटी पुदिना
  • अर्धा वाटी कोथिंबीर
  • ५-६ लसणाच्या पाकळ्या
  • अर्धा तुकडा आलं
  • २ हिरव्या मिरच्या
  • २ चमचा फरसाण
  • २ चमचे किसलेलं खोबरे
  • अर्धा चमचा साखर
  • २ चमचे दही
Ingredients For Dabeli Recipe In Marathi
Ingredients For Dabeli Recipe In Marathi

कच्छी दाबेली बनवण्याची कृती :

1. सगळ्यात आधी गॅसवर कुकर ठेवायचा. त्यात 1 ग्लास पाणी टाकायचं आणि अर्धा किलो बटाटे ५-१० मिनिटे कुकरमध्ये उकडत टाकायचे.

2. बटाटे उकडून झाल्यानंतर ते सोलून घ्यायचे आणि चांगले मॅश करून घ्यायचे.

3. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकायचं. जिरे मोहरी टाकायची. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि कांदा फ्राय झाल्यानंतर त्यात आलं लसणाची पेस्ट टाकायची.

4. यामध्ये दाबेली मसाला, १ चमचा लाल तिखट, काश्मिरी लाल तिखट टाकायचं.

5. हे सर्व मसाले फ्राय करून घ्यायचे. फ्राय केल्यानंतर त्यात कुस्करलेले बटाटे टाकायचे. चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेला गूळ टाकायचा. २-३ चमचे चिंचेची आंबट गोड चटणी टाकायची आणि सर्व आता छान मिक्स करून घ्यायचं.

आपली दाबेलीची चटणी तयार आहे.

Katvada Recipe In Marathi | कट वडा मराठी रेसिपी 2024

चिंचेची चटणी बनवण्याची कृती :

1. सगळ्यात आधी एका पातेल्यात चिंच टाकून कुस्करून घ्यायची आणि त्यातील चोथा काढून उरलेलं चिंचेचं पाणी गॅसवर उकळत ठेवायचं.

2. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात भिजलेली खजूर टाकून ग्राइंड करून घ्यायची आणि नंतर खजूर चिंचेच्या पाण्यात ओतून द्यायची.

3. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, किसलेला गूळ, चिमूटभर लाल तिखट आणि एका वाटीत पाणी घेऊन त्यात कॉर्न फ्लॉवर टाकून मिक्स करायचं आणि हे पाणी चिंचेच्या पाण्यात टाकून मिक्स करायचं.

आपली चिंचेची चटणी तयार आहे.

पुदिना चटणी बनवण्याची कृती :

एका मिक्सरच्या भांड्यामध्ये १ वाटी पुदिना, स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, २ चमचे दही, किसलेलं खोबरे, फरसाण, आलं आणि लसूण, साखर, हिरव्या मिरच्या टाकून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं.

आपली पुदिन्याची चटणी तयार आहे.

आपण जे एक वाटी शेंगदाणे घेतले होते ते पॅनवर टाकून भाजून घ्यायचे. त्याचे सालं काढून घ्यायचे आणि मिक्सरने जाडसर काढून घ्यायचे.

मग पॅनवर थोडं तेल टाकून लाल तिखट टाकायचं. त्यावर शेंगदाणे टाकून थोडं लिंबू टाकून छान मिक्स करून घ्यायचं.
आपले मसाला शेंगदाणे तयार आहेत.

आपली दाबेलीसाठीची बटाट्याची चटणी, चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी आणि मसाला शेंगदाणे तयार आहेत.

पाव घेतल्यानंतर तो पाव चिरायचा एका बाजूने चिंचेची चटणी दुसऱ्या बाजूने पुदिन्याची चटणी लावायची. त्यानंतर त्यावर आपण दाबेलीची चटणी बनवली ती टाकायची. वरून मसाला शेंगदाणे टाकायचे आणि दुसऱ्या बाजूने डाळिंबाचे दाणे टाकायचे. वर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. बारीक शेव टाकायची. कोथिंबीर टाकायची आणि फोल्ड करायचं.

एका पॅनवर बटर टाकल्यानंतर त्यावर पाव दोन्ही बाजूने कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा.

अशाप्रकारे आपली दाबेली (Dabeli Recipe In Marathi) तयार आहे.

Procedure For Dabeli Recipe In Marathi
Procedure For Dabeli Recipe In Marathi

ही टेस्टी दाबेली तुम्ही एका प्लेटमध्ये चिंचेची चटणी आणि पुदिन्याची चटणीसोबत सर्व्ह करू शकता. ही कच्छी दाबेली तुम्हाला नक्कीच आवडेल.

ही तर फक्त साधी कच्छी दाबेली आहे पण यासोबतच तुम्ही दाबेलीचे अनेक दुसरे प्रकार बनवून देखील टेस्ट करू शकता.

जसं की बटर दाबेली, चिझ दाबेली, पनीर दाबेली, चिझ बटर दाबेली, कॉर्न दाबेली, गार्लिक दाबेली, शेजवान दाबेली, चॉकलेट दाबेली अशा वेगवेगळ्या दाबेली ट्राय करायला हव्यात.

https://faktyojana.com/idli-sambar-marathi-recipe/

Important Tips For Dabeli Recipe In Marathi

1. दाबेली बटर लावून भाजली तर खूप क्रिस्पी बनते.

2. दाबेलीच्या चटणीत 2 चमचे चिंचेची चटणी टाकली तर खूप छान टेस्ट येते.

3. पुदिन्याची चटणी बनवताना त्यात शेव टाकली तर चटणी घट्ट बनते.

4. चिंचेच्या चटणीत खजूर टाकली तर चिंचेची चटणी आणखी टेस्टी होते.

5.आपल्या सर्वांना रस्त्यावर मिळणारी टेस्टी कच्छी दाबेली खूप आवडते पण त्यापेक्षाही टेस्टी आणि हेल्दी कच्छी दाबेली आपण नक्कीच घरी बनवू शकतो. घरी बनवलेल्या दाबेलीमध्ये आपण सर्व वस्तू चांगल्या वापरतो आणि स्वच्छताही ठेवतो. घरी नक्कीच चांगली कच्छी दाबेली बनते.

6. (Dabeli Recipe In Marathi) दाबेली हा लोकप्रिय गुजराती खाद्यपदार्थ आहे. गुजरातमधील कच्छची ही प्रसिद्ध रेसिपी आहे. सध्या गुजरात आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो.

7. कच्छी दाबेली ही वजन कमी करण्यासाठी खूपच चांगला ऑप्शन आहे. कारण दाबेलीमध्ये खूप कमी कॅलरीज असतात. आपल्याकडे बटाट्याचे पदार्थ सर्वांनाच आवडतात त्यामुळे दाबेली हा आपल्या आरोग्याला नुकसान न होता हेल्दी पदार्थ आहे.

8. कच्छी दाबेली ही सर्वात आधी मांडवी कच्छचे निवासी केशवजी गाभा चुडासामा यांनी बनवली होती. त्यांनी 1960 मध्ये दाबेली विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता. आपल्याकडे या पदार्थाला कच्छी दाबेली म्हणतात पण गुजरातमध्ये डबल रोटी असं म्हणतात.

9. दाबेली खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. यामध्ये कच्छी दाबेली, चीझ दाबेली, बटर दाबेली, जैन दाबेली, गार्लिक दाबेली, चीज बटर दाबेली, पनीर दाबेली, कॉर्न दाबेली, शेजवान दाबेली, चॉकलेट दाबेली अशा अनेक प्रकारच्या दाबेली असतात.

या सर्व टिप्स तुम्हाला चटपटीत कच्छी दाबेली Dabeli Recipe In Marathi बनवण्यासाठी खूपच कामी येतील.

FAQ For Dabeli Recipe In Marathi

1. Dabeli Recipe In Marathi हा कुठला प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे ?

कच्छी दाबेली हा गुजरातमधील कच्छ भागातील खाद्यपदार्थ आहे. त्याच भागाच्या नावामुळे या पदार्थाला कच्छी दाबेली असं नाव पडलं. कच्छी दाबेली खूपच टेस्टी आणि लोकप्रिय पदार्थ आहे.

2. कच्छी दाबेली ही कशापासून बनवतात ?

कच्छी दाबेली ही पावामध्ये मसाला भरून बनवली जाते. हा मसाला मॅश केलेले बटाटे आणि दुसऱ्या मसाल्यांपासून बनवला जातो. त्यावर शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, शेव, कांदा, चिंचेची आणि पुदिन्याची चटणी टाकली जाते.
अशाप्रकारे कच्छी दाबेली तयार होते.

3. Dabeli Recipe In Marathi बनवण्यासाठी कोणता मसाला वापरावा ?

अगदी बाहेरच्या सारखी कच्छी दाबेली बनवायची असेल तर तुम्ही मार्केटमध्ये मिळणारे तयार मसाले वापरू शकता त्यामुळे टेस्ट खूप चांगली लागते. पण जर तुम्हाला बाहेरचा मसाला वापरायचा नसेल आणि घरचाच मसाला हवा असेल तर तुम्ही दाबेलीमध्ये टाकायचा मसाला घरच्याघरी देखील बनवू शकता आणि हा मसाला दाबेलीमध्ये वापरू शकता.

4. दाबेली आणि वडापाव या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे ?

दाबेली आणि वडापाव या दोन्हीमध्ये मोठा फरक आहे. या दोन्ही पदार्थांमध्ये पाव वापरला जातो पण या पावात स्टफिंग वेगवेगळं असतं. वडापावमध्ये वडा असतो तर दाबेलीमध्ये पावाच्या आत मॅश केलेले बटाटे, बारीक शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, शेव, कांदा, मसाल्याचं मिश्रण आणि चटण्या असतात.

5. कच्छी दाबेली आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे का ?

कच्छी दाबेली आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगली आहे. वजन कमी करण्यासाठी ही दाबेली नक्कीच खाल्ली जाते. दाबेलीमध्ये कॅलरीजसुद्धा खूप कमी असतात. हेल्दी स्नॅक म्हणून दाबेली ओळखली जाते.

अशाप्रकारे आपली चटपटीत आणि टेस्टी कच्छी दाबेली Dabeli Recipe In Marathi तयार आहे. तुम्ही ही कच्छी दाबेली घरच्यांना प्लेटमध्ये सर्व्ह करू शकता. सगळ्यांना ही दाबेली नक्कीच आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल हे नक्की. घरच्याघरी जर इतक्या सोप्यात दाबेली बनवता येत असेल तर मग बाहेरून दाबेली खाण्याची काहीच गरज नाही.

तुम्हाला ही रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा. तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top