Yuva Nidhi Yojana 2024
Yuva Nidhi Yojana 2024 भारत देश जगातील सर्वात तरुण देश आहे. आपल्या देशातील तरुणांची संख्या खूप मोठी आहे आणि इतर कोणत्याही देशात एवढे तरुण नाहीत. त्यातचं विकसनशील देश असल्यामुळे प्रत्येकाला ही गोष्ट पटलीये की, शिक्षणानेच त्यांच्या आयुष्याचा उद्धार होऊ शकतो. त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकजण आपल्या तरुण मुलांना शिकवतोय, त्यांना उच्च शिक्षण देतोय.
परंतु या तरुण लोकांसमोर सर्वात मोठी समस्या आहे रोजगाराची. तरुणांची संख्या मोठी आहे, परंतु त्या प्रमाणात रोजगाराची संख्या नाहीये. त्यामुळे अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगार राहत आहेत. भारतातील तरुण वर्ग आज मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. त्यांना नोकरीची संधी मिळत नाहीये आणि ही खूप मोठी समस्या आहे.
आता या समस्येतून बाहेर येण्यासाठी कर्नाटक राज्याने एक नवीन योजना आली आहे. या योजनेचे नाव आहे, युवा निधी योजना 2024 (Yuva Nidhi Yojana 2024). मग ही युवा निधी योजना 2024 नेमकी आहे तरी काय ? या योजनेचा युवा लोकांना म्हणजे तरुणांना काय लाभ मिळतो ? या योजनेच्या पात्रता आणि अटी काय आहेत ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
युवा निधी योजना नेमकी काय आहे ?
आपल्या देशात सर्वत्र बेरोजगारीची समस्या आहे. हे बेरोजगार तरुण रात्रंदिवस नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असतात. आधीच त्यांनी शिक्षण घेताना खूप कष्ट केलेले असतात. पैसा खर्च केलेला असतो आणि आता नोकरी मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. नोकरी मिळवताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. आपलं घर सोडून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं, तिथं राहणं, तिथं नोकरी मिळेपर्यंत खर्च भागवण, ही तरुणांसाठी खूप अडचणीची बाब आहे.
बेरोजगार तरुणांची ही समस्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने युवा निधी योजना Yuva Nidhi Yojana 2024 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारने 250 कोटी रुपयांचं वार्षिक बचत ठेवलंय आणि राज्यातील बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 3 हजार रुपयेपर्यंत बेरोजगारी भत्ता देण्यात येणार आहे.
मग हा बेरोजगारी भत्ता म्हणजेचं Yuva Nidhi Yojana 2024 फायदा कोणत्या तरुणांना मिळेल ? त्यासाठी पात्रता काय आहेत ? नियम अटी काय आहेत ? आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
युवा निधी योजना पात्रता आणि अटी
कर्नाटक सरकारने बेरोजगार तरुणांसाठी ही योजना सुरू केली आहे. परंतु राज्यातील सर्वच बेरोजगारांना या Yuva Nidhi Yojana 2024 योजनेचा लाभ होणार नाही. त्यासाठी सरकारने काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. आपण ते पाहूया.
1) जे विद्यार्थी 2022 – 2023 या शैक्षणिक वर्षात डिप्लोमा किंवा डिग्री परीक्षा पास झाले आहेत आणि पास झाल्यानंतर त्यांना पुढील सहा महिने नोकरी मिळाली नाहीये. अशा बेरोजगार तरुणांना सरकार युवा निधी योजनेअंतर्गत बेरोजगार भत्ता देते.
2) डिप्लोमा किंवा डिग्री मिळवल्यानंतर सहा महिने बेरोजगार असलेल्या तरुणांनाच हा बेरोजगारी भत्ता देण्यात येईल. परंतु फक्त पुढील 1.5 वर्ष त्यांना हा बेरोजगारी भत्ता मिळेल. त्यानंतर त्यांना सरकारच्या या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांच्या आत नोकरी मिळवावी लागेल.
3) ज्या बेरोजगार तरुणांना सरकारच्या इतर योजनांचा लाभ मिळतोय, त्यांना युवा निधी योजनेचा लाभ मिळणार नाही.
4) युवा निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्या बेरोजगार तरुणांचं बँक अकाउंट आधार कार्डशी संलग्न असायला हवं.
5) जे तरुण डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशननंतर पुढील उच्च शिक्षण घेत आहे, त्यांना सरकारच्या या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
6) ज्या तरुणांना शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारी किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी लागली आहे, त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
7) जे तरुण शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय करताय, त्यांना सुद्धा सरकारच्या या Yuva Nidhi Yojana 2024 योजनेचा लाभ घेता येणार नाही.
हेही वाचा : PM Yasasvi Scholarship In Marathi | प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना
युवा निधी योजनेचे लाभ
आता आपण पाहूया, या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना काय लाभ देण्यात येईल.
कर्नाटक सरकारने या Yuva Nidhi Yojana 2024 योजनेचे दोन भाग केले आहेत.
1) ज्या बेरोजगार तरुणांनी डिग्री म्हणजेचं ग्रॅज्युएशनची परीक्षा पास केलीये. ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशनची पदवी आहे. त्यांना या योजनेअंतर्गत दरमहा 3000 रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात येईल.
2) तर ज्या तरुणांनी डिप्लोमा पास केला आहे. त्यांना या योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपयांचा बेरोजगारी भत्ता देण्यात येईल.
युवा निधी योजनेची रजिस्ट्रेशन प्रोसेस
या योजनेसाठी पात्र असलेल्या बेरोजगार तरुणांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागेल. आपण त्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस जाणून घेऊया.
1) कर्नाटक सरकारच्या सेवा सिंधू या ऑनलाइन पोर्टलवर लॉगिन करावं लागेल.
2) या पोर्टलवर युवा निधी योजना (Yuva Nidhi Yojana 2024) हा ऑप्शन दिसेल। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल.
3) या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्याबद्दल सर्व माहिती भरावी लागेल. त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रांची जोडणी केल्यानंतर हा फॉर्म सबमिट करावा लागेल.
4) हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला डाऊनलोड फॉर्म ऑप्शन दिसेल. हा फॉर्म डाऊनलोड करून प्रिंट करून घ्यायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रांची जोडणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडे हा फॉर्म जमा करायचा.
5) या योजनेसाठी पात्र असलेल्या बेरोजगार तरुणांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर सरकारी अधिकारी या सर्व अर्जांची छाननी करतील आणि या योजनेसाठी जे बेरोजगार तरुण पात्र असतील, त्यांची लिस्ट या पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल.
6) या योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपये किंवा पंधराशे रुपये बेरोजगारी भत्ता त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मिळते.
युवा निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
या Yuva Nidhi Yojana 2024 योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडे काही कागदपत्र असणं खूप आवश्यक आहे. त्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे दिली आहेत.
1) अर्जदाराचं आधार कार्ड
2) अर्जदाराचा पत्त्याचा पुरावा
3) अर्जदाराचं शैक्षणिक प्रमाणपत्र
4) अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
5) अर्जदाराचं बँक खातं पासबुक
6) अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटोज
7) अर्जदाराचा मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस
युवा निधी योजनेचे महत्व
या Yuva Nidhi Yojana 2024 योजनेअंतर्गत कर्नाटक सरकार फक्त बेरोजगार तरुणांना बेरोजगारी भत्ता देणार नाहीये, तर ज्या तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांना कमी व्याजदरात कर्जही उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग दिले जाईल. पुढील काही काळात या योजनाही सुरू करण्यात येणार आहेत.
आजच्या काळात जेथे आपल्या देशात बेरोजगारीची समस्या खूप मोठी आहे. प्रत्येकजण नोकरीसाठी रात्रंदिवस मेहनत करतोय, प्रयत्न करतोय. तेथे कर्नाटक सरकारची योजना खूपच उल्लेखनीय आहे. अडचणीच्या काळात, बेरोजगारीच्या काळात जेथे काही तरुण हे दुःखी होतात. डिप्रेशनमध्ये येतात, निराश होतात. तेथे त्यांच्या हातात थोडे पैसे आले, सरकारकडून पाठिंबा मिळाला, तर ते नव्या जोमाने नोकरी मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग धंदा सुरू करण्यासाठी प्रयत्न करतील आणि या निराशेच्या वातावरणातून बाहेर येतील.
FAQ About Yuva Nidhi Yojana 2024 युवा निधी योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : युवा निधी योजना (Yuva Nidhi Yojana 2024) महाराष्ट्रात सुरू आहे का ?
उत्तर : नाही, युवा निधी योजना महाराष्ट्रात सुरू नाहीये. ही योजना कर्नाटक राज्याने सुरू केली असून कर्नाटक राज्याच्या निवासी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
2) प्रश्न : युवा निधी योजनेचा लाभ कोणत्या विद्यार्थ्यांना मिळतो ?
उत्तर : कर्नाटक राज्यातील ते विद्यार्थी ज्यांनी याच वर्षी डिप्लोमा किंवा डिग्री मिळवली आहे. परंतु मागील सहा महिन्यांपासून ते बेरोजगार आहेत. त्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
3) प्रश्न : युवा निधी योजनेमध्ये (Yuva Nidhi Yojana 2024) बेरोजगारी भत्ता किती मिळतो ?
उत्तर : या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दीड हजार रुपये ते 3000 रुपये बेरोजगारी भत्ता त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मिळतो.
4) प्रश्न : युवा निधी योजनेचा लाभ बेरोजगार तरुणांना किती दिवस मिळतो ?
उत्तर : कर्नाटक राज्यातील बेरोजगार तरुणांना जवळपास दीड वर्ष या योजनेचा लाभ मिळेल. बेरोजगार राहिल्याच्या दोन वर्षानंतर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
5) प्रश्न : युवा निधी योजनेसाठी (Yuva Nidhi Yojana 2024) अर्ज कसा करायचा ?
उत्तर : या योजनेसाठी तुम्ही कर्नाटक सरकारच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता.
एकूणचं कर्नाटक सरकारने सुरू केलेली ही Yuva Nidhi Yojana 2024 योजना खूपचं कौतुकास्पद आहे. या योजनेचा बेरोजगार तरुणांना खूप मोठ्या प्रमाणात लाभ होईल. कारण स्वतःच्या इच्छेने कुणीच बेरोजगार राहत नाही. प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभ राहण्याची इच्छा असते. शिक्षण पूर्ण करूनही अनेकांना रोजगार मिळत नाही.
अशावेळेस या तरुणांची कौटुंबिक आणि सामाजिक स्थिती खालवते. त्यामुळे सरकार त्यांना बेरोजगारी भत्ता देऊन त्यांची कौटुंबिक सामाजिक आणि मानसिक अवस्था सुधारण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा. कारण या बेरोजगारी भत्ताचा वापर ते नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी करू शकतात. आणखीन प्रयत्न करून रोजगार मिळवू शकतात.
तुमच्या मनात युवा निधी योजनेबद्दल Yuva Nidhi Yojana 2024 आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीच कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि सरकारच्या आणखी योजनाबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !