Youtuber Angry Rantman Death News मनोरंजन विश्वातून एक खूपचं धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध युट्यूबर अँग्री रेंटमैनचा वयाच्या अवघ्या 27 या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या बातमीने सोशल मीडिया विश्वाला जबरदस्त धक्का बसलाय.
Youtuber Angry Rantman Death News अँग्री रेंटमैनचं खरं नाव अभ्रदीप साहा असं होतं आणि तो मूळचा कोलकत्ता पश्चिम बंगालचा होता. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत तो विविध चित्रपट आणि सामाजिक प्रश्नांवर समीक्षण करायचा, आपलं मत मांडायचा.
Youtuber Angry Rantman Death News
त्याचं अँग्री रेंटमैन नावाचं youtube चैनल होतं. या चैनलवर जवळपास 5 लाख सबस्क्राइबर आहे तर Instagram वरही एक लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. अभ्रदीप अवघ्या 27 व्या वर्षी हे जग सोडून गेला आहे, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. ही अफवा आहे की काय असं लोक विचारत आहेत.
परंतु ही अफवा नसून, हे सत्य आहे. अभ्रदीपच्या कुटुंबाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितली की, काही दिवसांपूर्वी त्याच्यावर एक मोठी सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर तो लाईफ सिस्टीम सपोर्टवर होता आणि त्याचा त्यामध्येचं मृत्यू झाला.
मल्टिपल ऑरगॅन फेलुअरने त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. या बातमीनंतर सोशल मीडियावर सर्वांना धक्का बसला आहे. कोणाचाचं विश्वास बसत नाहीये. अनेकजण ही बातमी खरी आहे की खोटी, याबद्दल प्रश्न विचारत आहेत, तर अनेक जण त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.
FD बद्दल संपूर्ण माहिती मराठीत
2017 मध्ये इंग्लिश प्रीमियर लीगबद्दल त्याने एक व्हिडिओ बनवला होता. नो पॅशन, नो व्हिजन अशी टॅगलाईन असलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आणि मग त्यानंतर त्याने अनेक हॉलीवुड चित्रपट, बॉलीवूड चित्रपट, आयपीएलवर आधारित व्हिडिओ बनवले आणि ते सगळीकडेचं व्हायरल झाले.
अँग्री रेंटमैनची समीक्षण करण्याची वेगळी शैली आणि कोणाची भीडभाड न बाळगता खरं बोलण्याची पद्धत यामुळे तो प्रेक्षकांचा फेवरेट होता. लोक त्याच्या व्हिडीओजची वाट पाहायचे. परंतु मागील काही महिन्यांपासून आजारपणामुळे तो सोशल मीडियापासून दूर होता आणि त्यातचं ही दुःखद बातमी आल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
आपणही Youtuber Angry Rantman Death News अँग्री रेंटमैनला श्रद्धांजली वाहूया आणि मनोरंजन विश्वाशी निगडित इतर बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !