यशोमन आपटेच्या आईला पाहिलंत का ? ‘शुभविवाह’ मालिकेतील अभिनेता यशोमन आपटे हा मराठी मालिकांमधील देखणा अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो सध्या ‘शुभविवाह’ मालिकेत आकाशची भूमिका साकारतोय. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना फार आवडतेय. याआधी त्याने ‘फुलपाखरू’ या मालिकेत हृता दुर्गुळेसोबत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तो घराघरात लोकप्रिय झाला.
यशोमन सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. तो इंस्टाग्रामवर नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. यशोमन आपटेच्या आईला पाहिलंत का ? नुकतेच त्याने आपल्या आईसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यशोमनच्या आईचा 60 वा वाढदिवस काही दिवसांपूर्वी साजरा करण्यात आला. त्याने आईच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केलेत आणि यासोबत एक सुंदर पोस्ट लिहत तिला मातृदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
यशोमन आपटेच्या आईला पाहिलंत का ?
यशोमनने या पोस्टमध्ये लिहलंय की,
काही दिवसांपूर्वी माझ्या आईची ‘साठी’ झाली! Sorry आई! ही post करायला मी उशीर केलाय, एक चांगला दिवस शोधत होतो…. पण हे post करायला मातृदिनापेक्षा अजून चांगला दिवस कुठला असू
शकतो?
आईबद्दल काय लिहू असा विचार केला की काही सुचतंच नाही… काय बोलू आईबद्दल? माझी आई मस्त आहे! सुंदर गोड cute! आणि full timepass ! आई असली की घरातली सगळी कामं एकदम सुरळीत सुरू असतात पण जर आई २ दिवस घरात नसेल तर आपल्याला काय काय करावं लागतं हे जाणवलं, की आईचं महत्त्वं कळतं! पण आईचं महत्त्वं आयुष्यात एवढंच आहे का?
आई आपल्या आयुष्यात नेमका काय role play करते?
मी ह्या प्रश्र्नचा, एक अभिनेता म्हणून त्या दृष्टिकोनातून विचार केला… की एक आई तिचा ‘role’ निभावण्यात कधी चुकुच शकत नाही! तिला त्या ‘role’ साठी कुठलाही अभ्यास करावा लागत नाही कारण बाळाला जन्म देताच तो आईचा role automatically तिच्यामध्ये जन्म घेतो… आपल्या बाळाला काय हवं नको ते आईला बरोब्बर कळत असतं… आपलं मूल धडपडलं तर त्याला धावत जाऊन जवळ घ्यायची ‘spontaneous reaction’ किंवा प्रेम व्यक्त केल्यावर गालावर एक गोड पापी द्यायची ‘addition’ कोणालाही तिला सांगावी लागत नाही… आपण कधी तिच्यावर चिडलो रागावलो तरीही तेवढ्याच प्रेमाने आणि मायेने आपल्या मुलांना ती जेवायला वाढते… थोडक्यात काय तर आईचं पात्रं त्या बाईमध्ये इतकं
भिनलेलं असतं की जगातला कुठलाही अभिनेता एखादं पात्रं तिच्यापेक्षा सुंदर साकारू शकतंच नाही! मग अश्या आईला oscar पेक्षा मोठं कोणतं award द्यायचं बाबा????
आई मी खूप नशीबवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस… तुला आणि जगातल्या सगळ्या आयांना hats off आणि मनापासून नमस्कार!
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! Happy mother’s day!
यशोमन आपटेच्या आईला पाहिलंत का ? या शब्दात आपलं आईबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि मराठी कलाकारांनी कमेंट्स करत त्याच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्या दोघा आईमुलाच्या प्रेमाचं कौतुक केलं आहे.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !