Yashoman Apte Marriage टेलिव्हिजन विश्वातील चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता यशोमन आपटे ओळखला जातो. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह या मालिकेत काम करतोय. त्याने साकारलेली आकाशची भूमिका सर्वांनाचं खूप आवडतेय. यशोमन दिसायला खूप हँडसम असल्याने तरुणींच्या काळजाचा ठोका तो नेहमीचं चुकवत असतो आणि त्याला लग्नाबद्दलही अनेकदा विचारणा होत असते.
आता यशोमन आपटेने त्याच्या लग्नाच्या चर्चांवर उत्तर दिलंय. नुकतीचं त्याने एक मुलाखत दिली, तेव्हा त्याला विचारलं गेलं की, तू लग्न कधी करणार आहेस ? तेव्हा यशोमनने सांगितलं की, तसं तर माझ्या लग्नाबद्दल खूप अपेक्षा आहेत, परंतु काही अपेक्षा नाहीयेत सुद्धा.
Yashoman Apte Marriage
Yashoman Apte Marriage यशोमन सांगतो की, सध्या तरी त्याने लग्नाचा कोणताही विचार केलेला नाहीये. म्हणून कशी मुलगी हवी आहे, याचाही विचार त्याने अजून केला नाही. म्हणजेचं ज्या तरुणी यशोमनवर फिदा आहेत त्यांना अजून तरी घाबरण्याची गरज नाहीये. त्यांचा आवडता यशोमन अजूनही सिंगलचं आहे.
यशोमन आपटेने पस्तीस टक्के काठावर पास या मराठी चित्रपटातून अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं. त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यानंतर त्याने अनेक नाटकात काम केलं. परंतु त्याला खरी ओळख मिळाली झी युवा वाहिनीवरील फुलपाखरू या मालिकेतून.
लग्नसराईत घ्या हे 10 कॉमेडी उखाणे
या मालिकेत त्याने अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबत मानस हे पात्र साकारलं होतं. हृता आणि यशोमनची जोडी प्रेक्षकांना तुफान आवडली होती आणि या मालिकेतूनचं यशोमनला खूप मोठी लोकप्रियता मिळाली. आजही लोक हृता आणि यशोमन या दोघांच्या क्युट आणि रोमँटिक जोडीची आठवण काढतात.
सध्या यशोमन शुभविवाह या स्टार प्रवाहवरील मालिकेत मुख्य भूमिका साकारतोय आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकतोय. सोशल मीडियावरही तो खूप ऍक्टिव्ह असतो आणि नेहमीचं आपले छान छान फोटोज आणि व्हिडिओज चाहत्यांबरोबर शेअर करत असतो.
तर तुम्हाला आवडतो का यशोमन आपटे ? त्याची कोणती भूमिका तुम्हाला आवडते ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि मनोरंजन विश्वाशी निगडित अशाच नवीन नवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !