(नवीन चित्रपट शुक्रवारीचं का) चित्रपट हे मनोरंजनाचं एक प्रभावी माध्यम आहे. आपल्या सर्वांनाचं सिनेमा पहायला खूप आवडतं. मग ते थेटर असो, टीव्ही असो किंवा ओटीपी. काही लोक तर सिनेमाचे इतके वेडे असतात की, ते शुक्रवारची वाट पाहतात आणि फर्स्ट डे फर्स्ट शो थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहतात. त्यांना टेलिव्हिजन किंवा मोबाईलवर सिनेमा पहायला नाही आवडत .
पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपल्या देशात नवीन चित्रपट शुक्रवारीचं का रिलीज केले जातात ? शनिवार रविवार किंवा सोमवारच्या दिवशी का नाही ? आज आपण याचं प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत.
नवीन चित्रपट शुक्रवारीचं का
चित्रपट बनवणं हा एक बिझनेस आहे. लोक चित्रपट तयार करतात. त्यासाठी पैसा खर्च करतात आणि मग या चित्रपटातून चांगली कमाई व्हावी, हा त्यांचा उद्देश असतो. परंतु सिनेमाची चांगली कमाई लोक सिनेमा पाहायला आल्यामुळे होते. जेवढे जास्त लोक सिनेमा पाहायला येतील, तेवढीच चित्रपटाची कमाई जास्त होईल.
त्यामुळेचं सिनेमा शुक्रवारच्या दिवशी रिलीज केले जातात. कारण आपल्या देशामध्ये शुक्रवार हा अनेक लोकांसाठी शेवटचा कामाचा दिवस असतो. त्यानंतर अनेकांना शनिवारी सुट्टी असते किंवा हाफ डे असतो आणि रविवारची सुट्टी तर सर्वांनाच मिळते. आठवडाभरचा ताण घालवण्यासाठी अनेक लोक शनिवार रविवार चित्रपटाला जाण्यास पसंती देतात. त्यामुळेचं नवीन चित्रपट शुक्रवारीचं का रिलीज केले जातात.
सध्या असं दिसतंय की, लोक चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा ओटीपी किंवा टीव्हीवर चित्रपट पाहणं पसंत करत आहेत. परंतु काही वर्षांपूर्वी जेव्हा आपल्या देशामध्ये टीव्ही नव्हता किंवा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा. मोबाईल नव्हते, तेव्हा लोकांना चित्रपट पाहायला खूप आवडायचं आणि लोक शुक्रवारची वाट पाहायचे, की नवीन चित्रपट कधी येईल आणि आम्ही तो सिनेमा हॉलमध्ये जाऊन पाहू.
Why Movies Released On Friday
आपल्या देशातील सुपरस्टार राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांचे चित्रपट तर अनेक महिने सिनेमागृहात चालायचे. करोडो रुपयांची कमाई करायचे. असंही नाहीये की, आता लोकांना चित्रपट पाहण्यात इंटरेस्ट नाहीये. आताही जेव्हा चांगले चित्रपट येतात, तेव्हा लोक थिएटरमध्ये जाऊनचं पाहतात.
हिंदीमध्ये बाहुबली आणि मराठीमध्ये सैराट त्याचं चांगलं उत्तम उदाहरण आहे. जर कलाकृती चांगली असेल, तर लोक पैसा खर्च करून थेटरमध्ये जातात.
तर तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पहायला आवडतं का ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !