Where Is Lord Hanuman In Kaliyuga : कलियुगात हनुमानाचं निवासस्थान कोठे आहे ?

Where Is Lord Hanuman In Kaliyuga

Where Is Lord Hanuman In Kaliyuga बजरंग बलीना संकटमोचन म्हटलं जातं. आयुष्यात कोणतंही संकट आलं आणि बजरंगबलींचं नाव घेतलं की, ते संकट दूर होतं. आजच्या या कलियुगात सगळे देव स्वर्गात आहेत, आपापल्या निवास स्थानावर आहेत. परंतु बजरंग बली आजही या पृथ्वीवर आहेत आणि भक्तांची पीडा दूर करत आहेत. त्यांचं दुःख दूर करत आहे.

Where Is Lord Hanuman In Kaliyuga

आपल्या सर्वांना माहिती आहे की, बजरंगबलींना अमरत्वाचं वरदान मिळालंय. ते चिरंजीवी आहेत, अजूनही जिवंत आहेत आणि या पृथ्वीवरचं वास करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, आता ते कुठे राहतात ? आज आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

Where Is Lord Hanuman In Kaliyuga श्री भागवत पुराणानुसार बजरंग बली हे गंधमादन पर्वत येथे वास्तव्यास आहेत. तुमच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल की, हा गंधमादन पर्वत नेमका आहे तरी कोठे ? पुराणानुसार हा गंधमादन पर्वत कैलास पर्वताच्या उत्तरेकडे स्थित आहे. येथेचं कश्यप ऋषींनी तप केलं होतं.

कलियुगात हनुमान कोठे वास्तव्यास आहेत ?

बजरंग बली यांनी माता सीता आणि प्रभू श्रीराम यांची सेवा केली. माता सीता यांनी बजरंगबलींना अमरत्वाचं वरदान दिलं होतं. हे वरदान मिळाल्यानंतरचं मागील लाखो वर्षांपासून बजरंग बली हे या पृथ्वीवरचं जिवंत आहेत आणि त्यांच्या भक्तांचे दुःख हरताय.

हनुमान अजूनही या पृथ्वीवर आहेत, त्याबद्दल अजून एक कारण सांगितलं जातं की, ते भगवान विष्णूचा दहावा अवतार कल्की अवताराची वाट पाहत आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की, सध्या कलियुग सुरू आहे आणि जसं रामायण आणि महाभारतामध्ये रावण आणि कंस यांसारखे राक्षस होते, तसंच या कलियुगामध्ये कली नावाचा एक राक्षस आहे.

हे 7 चिरंजीव अजूनही आहेत जिवंत

Where Is Lord Hanuman In Kaliyuga कलियुगात जसं जसं पाप वाढत जाईल, तसा हा कली दानव आणखीन शक्तिशाली होत जाईल आणि कलियुगाच्या शेवटी तो संपूर्ण मानवतेचा संहार करण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा भगवान विष्णू त्यांचा दहावा आणि शेवटचा अवतार कल्की म्हणून प्रकट होतील.

या कल्की अवताराला मदत करण्यासाठी बजरंग बली अजूनही या पृथ्वीवर आहेत. परंतु अजून कलियुग संपण्यास आणि भगवान कल्की अवतारण्यास हजारो वर्षांचा कालावधी बाकी आहे.

अशीच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग पौराणिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top