Whatsapp Delete For Everyone केलेले मेसेज पाहण्यासाठी फक्त ही एक सेटिंग करा

Whatsapp Delete For Everyone

Whatsapp Delete For Everyone जगभरात 100 कोटींपेक्षा जास्त लोक व्हाट्सअप्प या इन्स्टंट मॅसेजिंग सर्व्हिसचा वापर करतात. मागील काही वर्षात युजर्सला उपयोगी ठरतील, असे अनेक फीचर्स व्हाट्सअप्पने लॉंच केले आहेत. मग ते पेमेंट करण्यापासून डॉक्युमेंट फाईल शेअर करण्यापर्यंत आहेत.

अनेकदा व्हाट्सअप्पवर चुकीचा मेसेज सेंड केला जातो, समोरच्या व्यक्तीने तो पाहू नये अशी आपली इच्छा असते. युजर्सच्या याच इच्छेचा आदर करत व्हाट्सअप्पने डिलीट फॉर एव्हरीवन हे फिचर लॉंच केलं आहे.

Whatsapp Delete For Everyone

परंतु अनेकदा समोरच्या व्यक्तीने मला कोणता मेसेज केला होता आणि तो का डिलीट केला ? असा प्रश्न आपल्याला पडतो. हा मेसेज पाहण्याची आपली इच्छा होते. परंतु डिलीट झालेला मेसेज कसा पहायचा याचं उत्तर आपल्याकडे नसतं. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय.

Whatsapp Delete For Everyone
Whatsapp Delete For Everyone

हा Delete For Everyone केलेला मॅसेज पाहण्यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अप्लिकेशनची गरज नाहीये. तुमच्या मोबाईलमधील एक सेटिंग ऑन करून तुम्ही हे डिलिटेड मेसेज पाहु शकतात.

जेव्हा कधी व्हाट्सअप्प मेसेज येतो, तेव्हा व्हाट्सअप्पकडून आपल्याला नोटिफिकेशन येतं. या नोटिफिकेशनचा वापर करून तुम्ही डिलीट झालेला मेसेज पाहू शकता. त्यासाठी फक्त नोटिफिकेशनसाठी तुम्हाला ऍडव्हान्स सेटिंग्जमध्ये नोटिफिकेशन हिस्ट्री ऑन करावी लागेल.

ही सेटिंग ऑन केल्यावर तुम्हाला आलेले मेसेजेस नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये सेव्ह होतील. जेव्हा कधी समोरच्या व्यक्तीने पाठवलेले मेसेजेस डिलीट फॉर एव्हरीवन होतील, तेव्हा तुम्ही नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये जाऊन हे मेसेजेस वाचू शकतात. परंतु या फिचरचा वापर करून फक्त टेक्स्ट मेसेज सेव्ह होतात. फोटोज, व्हिडीओज किंवा डॉक्युमेंट मेसेज सेव्ह होत नाही.

Whatsapp Delete For Everyone
Whatsapp Delete For Everyone

वजन कमी करण्यासाठी वापरा ही एक ट्रिक

तसंच ही नोटिफिकेशन हिस्ट्री जास्त काळ सेव्ह राहत नाही. त्यामुळे 24 तासांच्या आत तुम्ही ती चेक करावी लागेल.

एकूणचं व्हाट्सअप्पचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी ही खूप छान ट्रिक आहे, एवढं मात्र नक्की. तर तुमच्याही मनात डिलीट फॉर एव्हरीवन मेसेजबद्दल जिज्ञासा असतात ना. तुम्ही ही ट्रिक वापरणार का नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top