Whatsapp Band Honar : व्हाट्सएप भारतातून गाशा गुंडाळणार पण का ?

Whatsapp Band Honar

Whatsapp Band Honar व्हाट्सअप आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. अनेक लोक तर फोन वापरतात फक्त व्हाट्सअप वापरण्यासाठीचं. त्यांचा संपूर्ण दिवस व्हाट्सअपवर मेसेज पाठवण्यात, एकमेकांचे स्टेटस पाहण्यात जातो. आज व्हाट्सअपवर काय स्टेटस ठेवायचं, याचाही लोक तासनतास विचार करत असतात.

परंतु आता अशा सर्व लोकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. कदाचित येत्या काही काळात त्यांना व्हाट्सअप वापरता येणार नाही कारण WhatsApp भारत सोडून जाण्याची शक्यता आहे. (Whatsapp Band Honar) व्हाट्सअप सुविधा भारतात बंद होऊ शकते. मग नेमकं असं काय झालंय की व्हाट्सअप भारतात बंद होऊ शकतं ? आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

Whatsapp Band Honar

2021 मध्ये भारत सरकारने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बद्दलचा नवीन कायदा लागू केला होता. हा नवीन कायदा भारतातील मोठ मोठया मेसेजिंग ॲप्सला मानणं बंधनकारक होतं. म्हणजे देशभरात जर कोणीही कोणाला मेसेज पाठवला, आणि जर त्याबद्दल सरकारला माहिती हवी असेल, तर व्हाट्सअपसारख्या मॅसेजिंग ऍपला ती देणं बंधनकारक आहे.

याच नियमांना व्हाट्सअपने दिल्ली हायकोर्टमध्ये आव्हान दिलंय. यादरम्यान व्हाट्सअपच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, आमचे मेसेज end to end encrypted असतात. तिसरी कोणीही व्यक्ती ते पाहू शकत नाही, WhatsApp ही नाही. परंतु सरकारच्या नवीन नियमानुसार जर सरकारने कोणत्याही व्हाट्सअप चॅटबद्दल माहिती मागवली, तर आम्हाला ते चॅट decrypted करून दाखवावे लागतील.

Why Whatsapp Leaving India

म्हणजेचं वर्षानुवर्ष आम्हाला हे व्हाट्सअप मेसेजेस सेव्ह करून ठेवावे लागतील. त्याचबरोबर आमच्या युजर्सच्या प्रायव्हसीबरोबर सुद्धा हे चुकीचं असेल. जर असं होणार असेल तर आम्हाला भारतात राहण्याची इच्छा नाही. आम्ही भारतातील आमच्या सेवा बंद करून निघून जाऊ.

मोबाईल हरवला असेल तर असा ट्रॅक करा

व्हाट्सअपच्या (Whatsapp Band Honar) या स्टॅन्डनंतर सर्वांनाचं जबर धक्का बसलाय. व्हाट्सअप ही भारतात सर्वाधिक वापरली जाणारी मेसेजिंग सर्विस आहे. भारतात 40 कोटी पेक्षा जास्त लोक व्हाट्सअप वापरतात. व्हाट्सअप ही फेसबुक म्हणजेचं मेटाची कंपनी असून मार्क झुकरबर्ग या कंपनीचे सीईओ आहेत.

काही वर्षांपूर्वी लोक एकमेकांना मेसेज करण्यासाठी एसएमएसचा वापर करायचे. परंतु आता एसएमएस कोणीही वापरत नाही, सगळे व्हाट्सअपचा वापर करतात.

Whatsapp Vs SMS
Whatsapp Vs SMS

त्याचबरोबर व्हाट्सअप कॉलिंगही मोठ्या प्रमाणात होते आणि जर अशातचं व्हाट्सअपने भारतात आपले ऑपरेशन बंद केले, तर मात्र अनेकांना दुसऱ्या पर्यायांचा विचार करावा लागेल, तेवढं मात्र नक्की.

तर तुम्हाला काय वाटते याबद्दल नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top