Wet N Joy Water Park Lonavala सध्या संपूर्ण देशात उष्णतेची लाट पसरली आहे. उन्हाळा खूप वाढलाय आणि या उन्हाळ्यात सगळेजण आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातचं बच्चे कंपनीला सुट्टी लागली आहे. लहान मुलं घरी आहेत. त्यामुळे त्यांनाही कुठेतरी फिरायला जायची इच्छा असते.
परंतु एवढ्या उन्हात कुठे फिरायला जावं, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि मग मुलांनाही फिरता यावं, त्याचबरोबर उन्हापासून बचाव व्हावा, असं एकमेव ठिकाण आहे आणि ते म्हणजे वॉटर पार्क. सध्या अनेकजण वॉटर पार्कला जाऊन एन्जॉय करताना दिसत आहेत, म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रचं नाही तर आपल्या देशातील सर्वात प्रसिद्ध अशा वेट अँड जॉय वॉटर पार्क लोणावळाबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.
वेट अँड जॉय लोणावळा वॉटर पार्कमध्ये किती रुपयांचं टिकीट आहे ? हा वॉटर पार्क नेमका कोठे आहे ? येथे काय काय सुविधा आहेत ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
वेट एन जॉय वॉटर पार्क लोणावळा कोठे आहे ?
हा वेट एन जॉय वॉटर पार्क लोणावळा जुना मुंबई पुणे हायवेवर टकवे मुंढवारे या गावात आहे. मुंबई किंवा पुण्यापासून तुम्ही येथे अगदी काही तासांमध्ये पोहोचू शकतात.
वेट एन जॉय लोणावळा या पार्कची खासियत म्हणजे येथे 1 नाही, तर 2 पार्क आहे. एक आहे वाटर पार्क आणि दुसरा आहे अम्युझमेंट पार्क. वॉटर पार्कमध्ये तुम्ही पाण्यात विविध राईडस एन्जॉय करू शकतात. तर अम्युझमेंट पार्कमध्ये अनेक इंटरनॅशनल राइडस आहेत, ज्या तुम्हाला थ्रिलिंग अनुभव देतील.
Wet N Joy Water Park Lonavala Ticket Price
आता तुमच्या मनात हा सर्वात मोठा प्रश्न असेल की, या दोन्ही पार्कचं तिकीट किती आहे ? तर सर्वात आधी आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील टॉप 5 वॉटर पार्क
सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे या वॉटर पार्कमध्ये विविध ऑफर्स देण्यात आल्या आहेत. एका वयस्क व्यक्तीचे तिकीट येथे 1299/- रुपये आहे. या तिकीटमध्ये तुम्ही वॉटर पार्क आणि अम्युझमेंट पार्कमधील सर्व राइडस मनसोक्त एन्जॉय करू शकतात. परंतु या तिकिटामध्ये कपडे आणि जेवण समाविष्ट नाही.
तुमच्याबरोबर जर लहान मुलं असतील आणि त्यांची हाईट 4 फुटांपेक्षा कमी असेल, तर त्यांना या वॉटर पार्कमध्ये फ्री प्रवेश आहे. त्यांच्यासाठी तिकीट घेण्याची गरज नाही. तसंच त्यांना जेवणाचे पैसेही देण्याची गरज नाहीये.
वॉटर पार्कमध्ये तुम्हाला जेवण करण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स मिळतील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार स्वतःचे पैसे देऊन जेवण करू शकतात.
तसंच वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करण्यासाठी तुमच्याकडे विशिष्ट प्रकारचे कपडे असायला हवेत. ते कपडेही तुम्हाला आतमध्ये भाडेतत्त्वावर किंवा विकतसुद्धा मिळतात. तुमच्या आवडीनुसार आणि साईजनुसार येथे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल असतात.
एकूणचं सध्या वॉटर पार्कमध्ये खूप गर्दी आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक ऑप्शन्स मिळतात. जसं की, गुरुवार आणि मंगळवारला येथील तिकीट 1299 नाही, तर फक्त 799 रुपये असतं. त्याचबरोबर एकाचं वेळेस जर तुम्ही 5 पेक्षा जास्त लोकांची बुकिंग केली, तर तुम्हाला 10 टक्के ऑफ सुद्धा मिळतोय. तुम्ही जर कॉलेज स्टूडेंट असाल तर आयडेंटिटी कार्ड दाखवून 20% ऑफ मिळू शकतो.
या सगळ्या ऑफर्स चेंज होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही वेट एन जॉय पार्क लोणावळा च्या ऑफिशीयल वेबसाईटवर जाऊन लेटेस्ट ऑफर चेक करू शकतात.
तर तुम्ही कधी जाताय या Wet N Joy Water Park Lonavala वॉटर पार्कला ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !