West Bengal Yuvshri Yojana 2024
West Bengal Yuvshri Yojana 2024 आज संपूर्ण जग भारताकडे आशेच्या नजरेने पाहतंय. भारत मॅन्युफॅक्चरिंग हब, आयटी हब आणि सॉफ्टवेअर हब बनू शकतं, असं प्रत्येक देशाला वाटतंय. काही वर्षांपूर्वी अविकसित गरीब देश म्हणून हिणवल्या जाणाऱ्या भारताला आज संपूर्ण जगामध्ये किंमत आली आहे. भारताला 21 व्या शतकातील सर्वात मोठी महासत्ता म्हणून ओळखलं जातंय आणि या सगळ्यांचं एकमेव कारण म्हणजे भारतातील तरुण लोकसंख्या.
आपल्या देशातील 65 टक्के लोकसंख्या ही 25 वर्षांपेक्षा खालील आहे. म्हणजेचं पुढील काही वर्षात ही सगळी तरुण माणसं देशाला विकसित बनवतील. काम करतील आणि आपल्या देशाला प्रगतीच्या एका नव्या शिखरावर घेऊन जातील.
म्हणूनचं संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागून राहिलंय. येथे संसाधनाची कमी नाहीये. मग सॉफ्टवेअर असो, मॅन्युफॅक्चरिंग असो, आयटी असो किंवा इतर कोणत्याही इंडस्ट्रीसाठी लागणारे मनुष्यबळ. त्याचबरोबर आपल्या देशात खरेदी करणाऱ्यांची संख्याही कमी नाहीये. म्हणून जगभरातील विविध कंपन्यांना भारतात यायचंय. त्यांचे उद्योगधंदे सुरू करायचे आहेत. वस्तू तयार करायच्यात आणि विकायच्यात. संपूर्ण जगभरात एक्सपोर्ट करायच्या आहेत.
त्यामुळेचं भारताचा भविष्यकाळ हा सोनेरी असेल. यावर संपूर्ण जगाचं एकमत झालंय. परंतु हे सगळं सत्य होऊ शकेलं, त्यासाठी सर्वात मोठी अट एकचं आहे आणि ती म्हणजे आपल्या देशातील जे मनुष्यबळ आहे, ते स्किल असायला हवं. त्यांच्याकडे शैक्षणिक योग्यता असायला हवी. त्यांना कोणत्यातरी कामाचं ज्ञान असायला हवं.
आपल्या देशातील तरुण पिढीला योग्य मार्ग दाखवणं, हे सरकारचं मुख्य कर्तव्य आहे. म्हणूनचं देशातील केंद्र सरकार असो किंवा विविध राज्य सरकार ते तरुणांसाठी विविध योजना राबवत असतं. आज आपण पश्चिम बंगाल सरकारने सुरू केलेल्या युवश्री योजनेबद्दल West Bengal Yuvshri Yojana 2024 जाणून घेणार आहोत.
पश्चिम बंगाल युवश्री योजना
2013 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने युवश्री योजनेची West Bengal Yuvshri Yojana 2024 सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण बेरोजगारांना एक वर्षासाठी दरमहा आर्थिक मदत केली जाते. त्याचबरोबर त्यांना विविध व्यवसायांचं प्रशिक्षण दिलं जातं. स्किल वर्कर बनवलं जातं. त्यांना व्यवसाय करायचा असेल, तर मार्गदर्शन केलं जातं. नोकरी करायची असेल, तर त्यांच्यासाठी रोजगार मिळावे आयोजित केले जातात. त्यासाठी त्यांना ट्रेनिंग दिली जाते. असे अनेक प्रकल्प या योजनेअंतर्गत हाताळले जातात.
पश्चिम बंगाल युवश्री योजनेची वैशिष्ट्ये
ही West Bengal Yuvshri Yojana 2024 योजना खूपचं वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपण या योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.
1) या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना दरमहा 1500 रुपयांची मदत दिली जाते.
2) पण ही एक हजार पाचशे रुपयांची मदत फक्त वर्षभर दिली जाते. त्यानंतर बेरोजगार तरुणांना ही मदत दिली जात नाही.
3) या वर्षभरा दरम्यान तरुणांना जर एखादा व्यवसाय करायचा असेल, तर त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणही दिलं जातं.
4) ज्या तरुणांना नोकरी करायची आहे, त्या तरुणांसाठी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. त्यांना रोजगार मिळवण्यासाठी पाठवले जातं. नोकरी मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.
5) एकूणचं बेरोजगार तरुणांना हरप्रकारे मदत करून त्यांना स्वावलंबी बनवणे, हेच या West Bengal Yuvshri Yojana 2024 योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे.
पश्चिम बंगाल युवश्री योजनेच्या पात्रता आणि अटी
1) या West Bengal Yuvshri Yojana 2024 योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कमीत कमी दहावी इयत्ता पास झालेला असावा.
2) वय वर्ष 18 ते 35 या वयोगटातील तरुणांना या योजनेसाठी अर्ज करता येतो.
3) अर्जदार बेरोजगार आहे, या संबंधित प्रमाणपत्र अधिकाऱ्यांकडून उपलब्ध केलेलं असावं.
4) अर्जदार पश्चिम बंगाल राज्याचा मूळनिवासी असावा.
पश्चिम बंगाल युवश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
या West Bengal Yuvshri Yojana 2024 योजनेत अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता आहे.
1) अर्जदाराचं आधार कार्ड
2) अर्जदाराचं बेरोजगार असल्याचं प्रमाणपत्र
3) अर्जदार दहावी इयत्ता पास असल्याचं प्रमाणपत्र
4) अर्जदाराचे निवासी पत्र
5) अर्जदाराच्या वयाचा दाखला
6) अर्जदाराला एखादा व्यवसाय करायचा असल्यास त्या संबंधित कागदपत्रे
7) अर्जदाराचं बँक अकाउंट पासबुक
8) अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटोज
पश्चिम बंगाल युवश्री योजनेसाठी अर्ज कोठे करायचा
या West Bengal Yuvshri Yojana 2024 योजनेसाठी राज्य सरकारने एक ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या पोर्टलवर लॉगिन करून अर्जदार अर्ज भरून देऊ शकतो. त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रांची जोडणी करावी लागते.
संबंधित अधिकारी या अर्जाची छाननी करतात आणि अर्ज योग्य आढळल्यास या अर्जदारास पश्चिम बंगाल युवश्री योजनेअंतर्गत दरमहा बेरोजगार भत्ता सुरू होतो. त्याचबरोबर इतर लाभही मिळतात.
हेही वाचा : Maharashtra Kukkutpalan Yojana 2024 | महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना
पश्चिम बंगाल युवश्री योजनेचे उद्दिष्ट
जसं की आपण याआधी चर्चा केली, कोणत्याही देशासाठी त्याची तरुण पिढी सर्वात मोठी संपत्ती असते. देशातील तरुण जेवढे सुशिक्षित आणि स्किल असतील, तेवढंचं जास्त तो देश प्रगती करतो आणि भारताकडे तर ही संपत्ती अमर्यादित आहे. भारत तरुणांचा देश म्हणून संपूर्ण जगभरात ओळखला जातो.
परंतु कोणतीही मोठी ताकद मिळाल्यावर त्याबरोबरची जबाबदारी सुद्धा तेवढीचं मोठी असते. त्यामुळे या तरुण लोकसंख्येला चांगलं शिक्षण मिळवून देणं आणि चांगलं शिक्षण मिळाल्यानंतर त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देणं, व्यवसाय करायचा असेल, तर भांडवल उपलब्ध करून देणे ही सरकारची खूप मोठी जबाबदारी आहे.
आणि आपली ही जबाबदारी ओळखतचं पश्चिम बंगाल सरकारने युवश्री योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारने एक नाही तर तरुणांच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्या तरुणांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय आणि आता त्यांच्याकडे नोकरी नाहीये. त्या तरुणांना वर्षभर बेरोजगारी भक्ता दिला जातो. ज्याचा वापर ते आपल्यातील स्किल वाढवण्यासाठी, त्याचबरोबर नोकरीचा शोध घेण्यासाठी करू शकतात. या योजनेअंतर्गत ज्या तरुणांना एखाद्या विषयाचं ट्रेनिंग हवं असेल, तेही मिळतं. ज्या तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, त्याबद्दल मार्गदर्शन देखील मिळतं. म्हणजे अनेक समस्या सोडवणारी ही एक योजना आहे.
आपण समाजात पाहतो की, अनेक तरुणांनी रात्रंदिवस मेहनत करून कर्ज काढून, शिक्षण घेतलेलं असतं. परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही. एक तर चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही किंवा नोकरीचं मिळत नाही. अशा वेळेस तरुणांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं, ते निराश होतात, चुकीचं पाऊल उचलतात. अशा तरुणांना निराशेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे.
आपल्या देशात शिक्षणाची व्यवस्था दिवसेंदिवस सुधारते आहे. सर्वांना शिक्षण मिळतंय. सरकार त्या दृष्टीनेही प्रयत्न करतंय. आई-वडील आणि विद्यार्थी सुद्धा रात्रंदिवस मेहनत करून, कर्ज काढून उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु देशातील शिक्षण पद्धती अशी आहे, जेथे तुम्हाला व्यावसायिक ज्ञान मिळत नाही.
जेव्हा विद्यार्थी नोकरीच्या विश्वात पदार्थ करतात तेव्हा त्यांना समजतं की, त्यांच्या या डिग्रीपेक्षा त्यांच्याकडे स्किल असणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे विद्यार्थी निराश होतात, त्यांना असं वाटतं की, आपल्या शिक्षणाचा काहीही फायदा नाहीये. परंतु नोकरीसाठी जे स्किल लागतं, ते मिळवणं सहज शक्य आहे. विद्यार्थी आधीपासून खूप शिक्षण घेऊन आलेले असतात, त्यामुळे कोणतीही नवीन गोष्ट शिकणं त्यांच्यासाठी अवघड नाही.
आणि जगातील कोणतीही नोकरी करण्यासाठी विशेषतः दोन तीन गोष्टींबद्दलचं स्किल घ्यावं लागतं. त्यामुळे हे स्किल तुम्ही सहज सहा महिने ते वर्षभरात शिकू शकतात. परंतु हे वर्षभर स्किल शिकण्यासाठी जो पैसा लागतो, जो संयम लागतो तेच पुरवण्याचं काम अशा योजनांमार्फत होतं.
म्हणूनचं पश्चिम बंगाल सरकारच्या युवश्री योजनेचा West Bengal Yuvshri Yojana 2024 आदर्श घेऊन भारतातील इतर राज्यांनी सुद्धा बेरोजगार तरुणांसाठी अशा योजनांची सुरुवात करण्याची गरज आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी, स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
पश्चिम बंगाल युवश्री योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : West Bengal Yuvshri Yojana 2024 ही योजना कधी सुरू करण्यात आली ?
उत्तर : ही योजना पश्चिम बंगाल सरकारने 2013 मध्ये सुरू केली होती.
2) प्रश्न : पश्चिम बंगाल युवश्री योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ?
उत्तर : या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
3) प्रश्न : पश्चिम बंगाल युवश्री योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना बेरोजगार भत्ता मिळतो का ?
उत्तर : होय, या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना एक वर्षापर्यंत दरमहा १५०० रुपये बेरोजगार भत्ता मिळतो.
4) प्रश्न : पश्चिम बंगाल युवश्री योजनेचे आणखीन फायदे काय आहेत ?
उत्तर : या योजनेत बेरोजगार तरुणांना फक्त बेरोजगारी भत्ताचं मिळत नाही. तर त्यांना नोकरी मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्याचबरोबर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर प्रशिक्षणही मिळतं.
5) प्रश्न : पश्चिम बंगाल युवश्री योजनेत कोणत्या वयोगटातील तरुणांना लाभ घेता येतो ?
उत्तर : या West Bengal Yuvshri Yojana 2024 योजनेअंतर्गत 18 ते 35 या वयोगटातील तरुण योजनेचा लाभ घेऊ शकतात.
पश्चिम बंगाल सरकारने सुरू केलेली ही West Bengal Yuvshri Yojana 2024 योजना खरंच खूप कौतुकास्पद आहे. या योजनेचा राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात फायदा होतोय. त्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारी योजना खूपचं उल्लेखनीय आहे, यात शंका नाही.
तुमच्या मनात पश्चिम बंगाल युवश्री योजनेबद्दल West Bengal Yuvshri Yojana 2024 आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि अशाचं नवीन नवीन योजनांच्या माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !