वीकएंडला ओटीटीवर काय पहायचं. कोरोना लॉकडाऊननंतर नवीन सिनेमे आणि वेबसिरीज ओटीटीवर पाहण्याचा ट्रेंड सुरू झालाय. त्यामुळे या वीकेंडला ओटीटीवर कोणता सिनेमा किंवा वेब सिरीज रिलीज होणार आहे, याकडे अनेकांचं लक्ष असतं. घराबाहेर पडून थेटरला सिनेमा पाहण्यापेक्षा घरबसल्यास ओटीटीवर सिनेमा पाहण्याचा आनंद अनेकजण लुटत असतात.
म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी या वीकेंडला ओटीटीवर कोणते नवीन सिनेमे आणि वेबसिरीज रिलीज होणार आहेत, याबद्दलची माहिती घेऊन आलो आहोत.
वीकएंडला ओटीटीवर काय पहायचं
जर तुम्ही हॉरर आणि सस्पेन्स वेब सिरीजचे फॅन असाल, तर या आठवड्याला तुमच्यासाठी एक खूप चांगला ऑप्शन जिओ सिनेमा घेऊन आलंय. दिल्लीतील एका सामूहिक आत्महत्या प्रकरणाचा गुंता सोडवणाऱ्या ऑफिसरची गोष्ट तुम्हाला जिओ सिनेमावर या आठवड्यात रिलीज झालेल्या गाठ या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळेल. ऑफिसर गदरसिंग कशाप्रकारे ही केस सॉल्व करतो, हे तुम्ही पाहू शकाल.
पण जर तुम्हाला सस्पेन्स वेबसिरीज ऐवजी एखादी हलकी फुलकी बॉलीवूड कॉमेडी रोमांटिक फिल्म पहायची असेल, तर तुमच्यासाठी आणखीन एक ऑप्शन आहे, तो म्हणजे विद्या बालन, प्रतीक गांधी आणि इलियाना डीक्रूज यांचा चित्रपट दो और दो प्यार.
काही महिन्यांपूर्वी थेटरमध्ये रिलीज झालेला हा चित्रपट आता डिजनी हॉटस्टार या ओटीटीवर तुम्हाला पाहता येणार आहे. थेटरमध्ये जरी हा चित्रपट जास्त चालला नसला, तरी अनेकांनी चित्रपटाची स्तुती केली होती. त्यामुळे हा तुमच्यासाठी नक्कीचं चांगला ऑप्शन असेल, यात शंका नाही.
दुनियादारी चित्रपट पुन्हा येणार
बॉलीवूड चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आणखीन एक ऑप्शन आहे आणि तो म्हणजे अवनीत कौर, सनी सिंग, अन्नू कपूर आणि सुप्रिया पाठक यांचा “लव्ह की अरेंज मॅरेज” हा चित्रपट.
झी फाईव (Zee5) या ओटीटीवर तुम्हाला हा बॉलीवूड चित्रपट पाहता येणार आहे. चित्रपटाची गोष्ट खूपचं इंटरेस्टिंग आहे. एकमेकांवर प्रेम करत असलेल्या अवनीत आणि सनी या दोघांच्या आई-बाबांचा एकमेकांवर जीव जडतो आणि मग पुढे काय धमाल होते, हे पाहणं प्रेक्षकांसाठी खूपच एंटरटेनिंग असेल, यात शंका नाही.
एकूणचं ओटीटीवर सिनेमा आणि वेब सिरीज पाहण्यासाठी या आठवड्यात नक्कीचं चांगले ऑप्शन आहेत. त्यामुळे तुम्ही कोणता चित्रपट पाहणार नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !