प्रसिद्ध अभिनेता चेतन वडनेरेच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे.

चेतन वडनेरे लग्नबंधनात अडकलाय. 22 एप्रिलला त्याचं लग्न झालं.

चेतनने अभिनेत्री ऋतुजा धारपशी लग्न केलं. अनेक वर्षांपासून ते डेट करत होते.

चेतन आणि ऋतुजाची ओळख फुलपाखरू मालिकेच्या सेटवर झाली होती.

तेथे दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.

काही महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता.

या दोघांचं लग्न नाशिकमध्ये झालं असून,दोघेही खूप सुंदर दिसत होते.

नवरदेव आणि नवरीच्या पारंपारिक वेशात दोघांचा लूक पाहण्यासारखा होता.

हे फोटो फॅन्सला आवडताय आणि सगळे त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देताय.