मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची नुकतीच हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
11 एप्रिल रोजी छातीत त्रास होऊ लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं.
सयाजी शिंदे यांची साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं तेव्हा त्यांनी आपल्या काही तपासण्या केल्या.
टेस्टमध्ये सयाजी शिंदे यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल थोडी कमी जाणवली.
डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफी करण्याचा सल्लाही दिला. सयाजी शिंदे यांनी सर्व गोष्टी सकारात्मकतेने घेतल्या.
दोन तीन दिवसांपूर्वी त्यांचं एक शूटिंग रद्द झालं त्यामुळे ते साताऱ्यात आले आणि शस्त्रक्रिया करायचं ठरवलं.
त्यांच्या हृदयातील तीन रक्तवाहिन्यांपैकी दोन ठीक होत्या पण एका रक्तवाहिनीत 99 टक्के ब्लॉक होता.
हार्टअटॅक येण्यापूर्वीच ते आपल्या आरोग्याविषयी जागरूक होते.
आता त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि लवकरच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल.