अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकरचं नुकतंच लग्न झालं.
सध्या प्रथमेश आणि क्षितिजा हे दोघेही सुखाने संसार करत आहेत.
प्रथमेश सोशल मीडियावरून आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहतो.
तो कामासोबतच आपल्या पर्सनल लाईफचे व्हिडिओ शेअर करतो.
आता प्रथमेशने क्षितिजासोबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय.
त्यात क्षितिजा प्रथमेशच्या केसांना तेल लावून मस्त मालिश करताना दिसतेय.
प्रथमेशने या व्हिडिओवर लग्नानंतरचं सुख असं लिहलं आहे.
यासोबतच सुख म्हणजे नक्की हे असतं असं कॅप्शनमध्ये लिहलंय.
या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांना खूप आवडतोय.
प्रथमेशच्या या व्हिडिओवर त्याचे फॅन्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.