मराठीत कॉमेडी शो म्हटलं की चला हवा येऊ द्या आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा आठवतात.

काही दिवसांपूर्वी चला हवा येऊ द्या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.

पण आता या दोन्ही कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांसाठी नवीन कॉमेडी शो आणताय.

निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजनेचा नवीन कॉमेडी शो कलर्सवर येतोय.

नुकतेच या शो चे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यामुळे सर्वांना धक्का बसला.

येत्या 20 एप्रिलपासून शनिवार रविवार रात्री 9 वाजता हा शो कलर्स मराठीवर येईल.

या शोचं नाव आहे हसताय ना ? हसायलाचं पाहिजे. हे निलेश साबळेचं प्रसिद्ध वाक्य आहे.

याचा अर्थ आता हा नवीन शो महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाशी स्पर्धा करणार.

मग आता कॉमेडीची ही तिकडी काय कमाल करते हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

टोयोटाने लॉन्च केली सर्वात स्वस्त SUV. अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.