मृणाल दुसानिस हे नाव घेतलं कि आठवते गोड दिसणारी सुंदर आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री

हे मन बावरे मृणालची शेवटची मालिका होती. मालिका संपल्यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली.

मृणालचं लग्न अमेरिकेतील सॉफ्टवेअर इंजिनिअर नीरज मोरेशी झालेलं. 

या दोघांना नूरवी नावाची एक क्युट मुलगीही आहे. मृणाल अभिनय सोडून संसारात रमली होती.

परंतु मृणालचे फॅन्स तिला खूप मिस करत होते. आता या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे.

मृणाल दुसानिस आणि तिचं कुटुंब अमेरिका सोडून भारतात स्थायिक होणार आहे.

मृणालने एका मुलाखतीत खुलासा केलाय कि ती आता भारतातचं राहणार  आहे.

त्याचबरोबर तिला मराठी चित्रपट आणि मालिकांमध्येही काम करायचंय.

तर तुम्ही उत्साहित आहात का मृणालला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी ?

मृणालने माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून पदार्पण केलं होते.