मृणाल दुसानिस भारतात परतलीये, ही बातमी आतापर्यंत तुम्हाला कळलीचं असेल.

नुकतीच तिने एका न्यूज चॅनेलला मुलाखत देत तिचा आई बनण्याचा अनुभव कसा होता ते सांगितलं.

मृणाल सांगते, प्रेग्नन्सीच्या वेळी कोरोना काळ असल्याने ती नवऱ्याबरोबर एकटीच होती.

अनोळखी लोकांमध्ये तिचं बाळंतपण झालं, पण तिच्या नवऱ्याने नीरजने तिची खूप काळजी घेतली.

मृणालच्या मुलीचं नाव नुर्वि आहे आणि या नावाचा अर्थ लक्ष्मी असा आहे.

मृणाल सांगते, नुर्वि खूप हुशार आहे पण ती तेवढीचं मस्तीही करते.

नुर्वि आणि मृणाल एकत्र गाणी म्हणतात, डांस करतात, कार्टून पाहतात आणि मस्ती करतात.

भारतात आल्यानंतर एवढी माणसं आणि गर्दी पाहून नुर्वि थोडी घाबरली होती.

पण आता तिला रोज मंदिरात जायला आणि बाप्पाचं दर्शन घ्यायला आवडतं.

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका बंद होणार ? अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.