प्रत्येक भारतीयाच्या मनात वाराणसी नगरीबद्दल आणि पवित्र गंगा मातेबद्दल अपार श्रद्धा आहे.

प्रत्येकाला वाराणसीला जाऊन गंगेत डुबकी मारून पवित्र गंगेची आरती बघण्याची इच्छा

सध्या आपली मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामी ही वाराणसीला गेलीय.

तिने आपण वाराणसीला भेट दिल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय

वैदेहीने गंगेच्या किनारी मनोभावे पूजा केली. त्यानंतर ती गंगेच्या आरतीतही सामील झाली.

तिने जहाजमध्ये बसून मस्त फिरण्याचा आनंद लुटला आणि पक्ष्यांना दाणेही टाकले.

वैदेहीने शेअर केलेल्या या व्हिडिओला हर हर गंगे असं सुंदर कॅप्शनसुद्धा दिलंय.

वैदेहीचे फॅन्स हा इतका सुंदर धार्मिक व्हिडिओ पाहून अतिशय भारावून गेले आहेत.

या व्हिडिओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्स करत तिचं खूप कौतुक केलंय.

वैदेहीचे फॅन्स आता तिच्या पुढील भूमिकेविषयी अतिशय उत्सुक आहेत.