माहेरची साडी हा चित्रपट प्रत्येक मराठी सिनेरसिकाच्या हृदयाच्या खूप जवळ आहे.
1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने इतिहास रचत सर्वाधिक कमाई केली होती.
चित्रपटात अलका कुबल, उषा नाडकर्णी, रमेश भाटकर, विक्रम गोखले यांच्या भूमिका गाजल्या.
चित्रपटाच्या यशात दिग्दर्शक विजय कोंडके यांचाही सिंहाचा वाटा होता.
आता इतक्या वर्षानंतर विजय कोंडके यांनी नवीन चित्रपटाची घोषणा केलीये.
या चित्रपटाचं नाव आहे लेक असावी तर अशी आणि हा चित्रपट येत्या 25 एप्रिलला येईल.
विजय कोंडके हे प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि वितरक आहेत.
मराठीतील सुपरस्टार दादा कोंडके यांचे ते पुतणे. दादांबरोबरही त्यांनी काम केलं.
आता त्यांच्या या नवीन चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतील यात शंका नाही.
हार्दिक जोशीने वडिलांना गिफ्ट केली लाखोंची कार अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा.
Learn more