प्रसाद ओक महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात जज म्हणून दिसतात.
आता या कार्यक्रमाबद्दल त्यांनी एक हृदयद्रावक प्रसंग सांगितला आहे.
कोरोना लॉकडाऊन दरम्यान हास्यजत्रेच्या शुटिंगसाठी ते दमनमध्ये होते.
बायोबबलमध्ये शुटिंग होत असल्याने कोणीही बाहेर जाऊ शकत नव्हतं.
याचदरम्यान त्यांच्या वडिलांचा पुण्यात मृत्यू झाला.
दमन ते पुणे 6-7 तासांचा प्रवास, पण कोरोनामुळे डॉक्टर थांबायला तयार नव्हते.
त्यामुळे प्रसाद ओक यांना वडिलांचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही.
जेव्हा वडिलांचे अंत्यसंस्कार सुरू होते, तेव्हा ते हास्यजत्रेसाठी शूट करत होते.
अत्यंत हृदयद्रावक असा प्रसंग प्रसाद ओक यांनी सांगितला आहे.
अधिक माहितीसाठी स्वाईप अप करा.
Learn more