अरुंधतीच्या भूमिकेत मधुराणी प्रभुळकरने प्रेक्षकांचं मन जिंकलंय.
मागील काही दिवसांत आशुतोषच्या मृत्यूमुळे अरुंधती फक्त रडतेय.
आता मधुराणीने याबद्दल एक खूप मोठा खुलासा केला आहे.
मधुराणीने सांगितलं की, सलग 4 दिवस 12 - 12 तास रडल्याने तिला त्रास झाला.
तिच्या छातीवर दडपण आलं होतं आणि मग एक दिवस ती चक्कर येऊन पडली.
औषधे गोळ्या घेऊन ती बरी झाली पण याचा परिणाम तिच्या तब्येतीवर झाला.
डेली सोपमध्ये सतत एकच भूमिका करत असल्याचा परिणाम होतो.
2019 मध्ये आई कुठे काय करते मालिकेची सुरुवात झाली होती.
आतापर्यंत या मालिकेचे 1000 पेक्षा जास्त भाग झाले आहेत.
मालिकेच्या सगळ्याचं कलाकारांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय.