झी मराठीवर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेचं नाव आहे 'लाखात एक आमचा दादा'.
मालिकेच्या नावावरून कळतंय की ही मालिका बहीण भावाच्या नात्यावर आधारित असेल.
मालिकेची पहिली झलक समोर आलीय. मालिकेचं एक पोस्टर दाखवण्यात आलं आहे.
पोस्टरमध्ये चार बहिणी आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवलेला भाऊ दिसत आहे.
लागिरं झालं जी फेम अभिनेता नितीश चव्हाण मालिकेत मुख्य भूमिकेत दिसेल.
ही मालिका झी तमिळ वाहिनीवरील 'अण्णा' मालिकेचा रिमेक असणार आहे.
टीआरपीमध्ये पुढे राहण्यासाठी झी मराठी एकामागे एक नवीन मालिका सुरू करतंय.
टीआरपीमध्ये पुढे राहण्यासाठी झी मराठी एकामागे एक नवीन मालिका सुरू करतंय.
पण या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढायला लागली आहे.