रसिका वेंगुर्लेकर ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
ती आपल्या जबरदस्त अभिनय आणि विनोदबुद्धीमुळे खूप लोकप्रिय आहे.
रसिका मराठीसोबतच हिंदीमधेही भूमिका साकारताना दिसते.
ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहते.
रसिका आपले फोटो आणि व्हिडिओ नेहमी शेअर करते.
नुकतेच रसिकाने आपले सिंगापूरमधील फिरण्याचे फोटो शेअर केलेत.
हास्यजत्रेच्या शोजसाठी ती टीमसोबत सिंगापूरला गेली होती.
त्यावेळी कामातून वेळ काढत तिने सिंगापूरमध्ये फिरण्याचा आनंद लुटला.
सिंगापूरमधील प्रेक्षणीय स्थळांना भेट देत तिने आपले सुंदर फोटो पोस्ट केले.
या फोटोंमध्ये रसिका अतिशय मॉडर्न ड्रेसेसमध्ये दिसून आली.