ज्ञानदा रामतीर्थकर 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील अप्पू या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रिय

काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. फॅन्स ज्ञानदाला खूप मिस करताय.

पण आता ज्ञानदाच्या चाहत्यांसाठी खूपच मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तिने आपल्या फॅन्सना जबरदस्त सरप्राईज दिलं आहे

सोशल मीडियावरून एक घोषणा केली आहे. ज्ञानदा रामतीर्थकर मराठी चित्रपट येतोय.

तिची मुख्य भूमिका असलेला 'मुंबई लोकल' हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

तिच्यासोबत अभिनेता प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि मनमीत पेम दिसणार आहेत.

त्यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला.

ज्ञानदा रामतीर्थकर मराठी चित्रपटात दिसणार असल्यामुळे तिचे फॅन्स खूप खुश झाले आहेत.

ज्ञानदाच्या या नवीन चित्रपटाबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल लवकरच माहिती समोर येईल.