आज 10 मे रोजी संपूर्ण देशभरात अक्षय तृतीया साजरी केली जात आहे.
अक्षय तृतीयेला सोनं-चांदी किंवा इतर शुभ वस्तूंची खरेदी करणं चांगलं मानलं जातं.
सर्वात आधी अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त कोणता ते पाहूयात.
सकाळी 5:33 ते दुपारी 12:18 मिनिटांपर्यंत तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करू शकता.
अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरात असे चार मुहूर्त आहे ज्यांमध्ये खरेदारी करणं खूपचं शुभ आहे.
खरेदारी करण्यासाठी सर्वात पहिला शुभ मुहूर्त आहे सकाळी 5.33 ते सकाळी 10:37 पर्यंत.
त्यानंतर दुसरा शुभमुहूर्त आहे दुपारी 12:18 ते 1:59 वाजेपर्यंत.
शुभ वस्तूंची खरेदी ही करता येते. जसं की वाहन, मातीच्या वस्तू, दक्षिणावर्ती शंख आणि श्रीयंत्र.
परंतु या दिवशी प्लास्टिकसाख्या अशुद्ध धातूची खरेदी तुम्ही नाही करायला पाहिजे
तर मग तुम्ही या अक्षय तृतीयेला काय खरेदी करणार ?