Vidhwa Girl Story अवघ्या सहा महिन्यापूर्वी भाग्यश्रीचा नवरा हे जग सोडून गेला होता. भाग्यश्रीच्या लग्नाला फक्त दीड वर्ष झालं होतं आणि 22 वर्षाची भाग्यश्री विधवा झाली होती.
भाग्यश्रीला काही मुलंबाळं नव्हतं. परंतु नवऱ्याच्या अशा अकाली जाण्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. या घटनेनंतर भाग्यश्रीचे आई-बाबा तिला माहेरी घेऊन आले होते.
Vidhwa Girl Story
लग्नाआधीची भाग्यश्री नेहमी हसत खेळत राहायची. काही ना काहीतरी खोड्या करत राहायची. तिच्या हसण्याने संपूर्ण घर हे आनंदाने भरून जायचं. Vidhwa Girl Story तीच भाग्यश्री आता एखाद्या कोमेजलेल्या फुलाप्रमाणे घराच्या एका कोपऱ्यात बसून राहायची. रडत बसायची. तिच्या आयुष्यात आता कोणताही रंग, कोणताही रस उरला नव्हता.
भाग्यश्रीकडे पाहून तिचे आई-बाबाही झुरत होते. त्यांना तिचं असं रूप सहन होत नव्हतं. भाग्यश्रीचे बाबा तिच्या आईला म्हणतात, “अगं ऐकलंस का, पाहिलं ना आपल्या मुलीची अवस्था कशी झालीये. Vidhwa Girl Story मी तिला किती वेळ समजण्याचा प्रयत्न केला की, बाळा आता दुःख विसरुन जा. आयुष्यात पुढे चाल. पण ती मात्र अजूनही त्याच दुःखात बुडालेली आहे.”
भाग्यश्रीची आई म्हणते, “हो ना तिच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलांची स्थळ येत आहेत, परंतु ती नकाराचं देते.” बाबा म्हणतात, “त्यात तिची तरी काय चूक आहे. Vidhwa Girl Story तिच्यापेक्षा दहा दहा पंधरा वर्षांनी मोठ्या पुरुषांची स्थळ तिला येत आहेत, ज्यांना दहा-बारा वर्षांची मुलं आहेत. आपल्या मुलीचं त्यांच्याशी लग्न करून मला तिच्या आयुष्याचा अजून वाईट नाही करायचं.”
भाग्यश्रीची आई चिडून म्हणते, “अहो तुम्हाला राग येईल, परंतु आपली मुलगी विधवा आहे. तिला आता असंच एखादं स्थळ मिळेल. Vidhwa Girl Story एखादा बिन लग्नाचा नवरा नाही तिच्याशी लग्न करणार. हे सत्य जरी कडू असलं, तरी तुम्हाला ते मान्यचं करावं लागेल.”
बाबा म्हणतात, “माझ्या मनात तर एकचं प्रश्न येतोय की, भाग्यश्रीने आता जगण्यासाठी लग्नच केलं पाहिजे, हे का महत्त्वाचं आहे ? आपण तिचं इतक्या धुमधडाक्यात लग्न केलं, परंतु नशिबाला ते मान्य नव्हतं. अवघ्या दीड वर्षात तिचा नवरा देवाघरी गेला. ती माहेरी परत आली. Vidhwa Girl Story लग्न करण्याआधी ती म्हणायची, बाबा मला नाही लग्न करायचं. मला शिकायचंय, नोकरी करायची आहे. मोठ्या शहरात जायचंय. पण आपण त्यासाठी नकार दिला आणि तिचं लग्न लावून दिलं. मग आता ते स्वप्न ती का नाही पूर्ण करू शकत ?”
भाग्यश्रीची आई म्हणते, “अहो हे काय बोलताय तुम्ही. लग्नाच्याआधी तिला मोठ्या शहरात नोकरीसाठी किंवा Vidhwa Girl Story शिक्षणासाठी पाठवणं योग्य होतं, परंतु आता ती विधवा आहे आणि तिला जर असं घराबाहेर पाठवलं, दूर शहरात पाठवलं, तर लोक काय म्हणतील. याचा तरी विचार करा.”
भाग्यश्रीचे बाबा चिडून म्हणतात, “लोक गेले खड्ड्यात. मला नाही कुणाचं देणं घेणं. तिच्या लग्नाआधीसुद्धा आपण लोक काय म्हणतील, याचं विचाराने तिला तिचं स्वप्न पूर्ण करू दिलं नाही. पाहिलं ना आज काय झालं ? Vidhwa Girl Story आज तिचं दुःख वाटून घ्यायला ते लोक येताय का ? उलट नावं ठेवताय. हिच्याचं पायगुणामुळे तिचा नवरा गेला. असं झालं वाईट बोलतात.”
भाग्यश्रीची आई म्हणते, “अहो शांत व्हा. तुमचा राग मी समजून घेऊ शकते. परंतु आपण या समाजात राहतो आणि त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. त्यांच्या चालीरीती आपण पाळल्याचं पाहिजेत.”
भाग्यश्रीचे बाबा म्हणतात, “नाही, मला या समाजापेक्षा माझी मुलगी महत्त्वाची आहे. मला तिला या दुःखातून आणखीन मोठ्या दुःखात नाही लोटायचं. जर आपण तिचं दुसरं लग्न करून दिलं आणि तो मुलगा चांगला नसला किंवा तिचं त्या संसारात मन नाही रमलं, तर काय करायचं ? Vidhwa Girl Story मला आता तिच्या मनासारखं करायचंय. जे स्वप्न ती दीड-दोन वर्षांपूर्वी पूर्ण नाही करू शकली, ते तिने आता करावं, अशी माझी इच्छा आहे.”
असं म्हणून भाग्यश्रीचे बाबा भाग्यश्रीजवळ येतात आणि तिला म्हणतात, “बाळा काय विचार करतेस. Vidhwa Girl Story भाग्यश्री सुकलेल्या चेहऱ्याने म्हणते, काही नाही बाबा. आता विचार करणं सोडून माझ्या आयुष्यात दुसरं उरलंय तरी काय ?”
बाबा म्हणतात, “बेटा असं बोलू नको। तुझ्यासमोर उभं आयुष्य पडलंय. मला माफ कर. मी तुला तुझं स्वप्न नाही पूर्ण करू दिलं. तुला शिकायचं होतं, नोकरी करायची होती, करिअर करायचं होतं. Vidhwa Girl Story पण मी तुझं लग्न लावून दिलं. परंतु आता मी तशी चूक नाही करणार. झालं गेलं, विसरून जा. आता तू तुझ्या करिअरकडे लक्ष दे. तुला आयुष्यात जे करायचं ते कर.
लोक काय म्हणतीलं, याचा विचार करू नको. हा बाप तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तू तुझं शिक्षण पूर्ण कर. Vidhwa Girl Story उच्च शिक्षण घे. तुला जिथे नोकरी करायची असेल, तेथे कर. हवं तर मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन तुझ्याबरोबर येऊन राहील.”
भाग्यश्री बाबांना विचारते, “खरंच का बाबा ? तुम्ही मला सपोर्ट कराल का ? तुम्ही माझ्याबरोबर याल का ? बाबा होकारार्थी मान डोलावतात. भाग्यश्री बाबांना घट्ट मिठी मारते.
भाग्यश्रीच्या डोळ्यात तिच्या सोनेरी भविष्याची स्वप्न असतात. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची, काहीतरी करून दाखवण्याची धमक असते.
कशी वाटली आजची कथा, नक्कीचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !