Veg Manchurian Recipe In Marathi
Veg Manchurian Recipe In Marathi आजकाल आपण सगळेच घराबाहेर चायनीज खाणं खूप पसंत करतो. चायनीज नूडल्स, मंचुरीयन, सूप, मोमोज, डम्पलिंग्स, स्प्रिंग रोल्स, चाऊमीन, फ्राईड राईस, चायनीज भेळ असे अनेक लोकप्रिय खाद्यपदार्थ आपल्याकडे आवडीने खाल्ले जातात.
चायनीज पदार्थ हे आपल्या जबरदस्त टेस्टमुळे प्रचंड लोकप्रिय आहेत. मूळ चीनचे असलेले हे खाद्यपदार्थ सध्या आपल्याकडे जेवणाचा भाग बनले आहेत.
लहाण्यांपासून ते मोठ्यांपर्यंत चायनीज पदार्थ सगळ्यांनाच खूप आवडतात. प्रत्येक घराघरात नूडल्स तर खूप आवडीने खाल्ले जातात. आपल्याकडे 2 मिनिटात बनणारी मॅगी तर सगळेच बनवतात आणि आवडीने खातात.
पण हेच पदार्थ आपण जर आपल्या घरात बनवले तर बाहेरच्यापेक्षा स्वच्छ, हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आपण घरातच बनवू शकतो.
मैत्रिणींनो आज आपण सर्वांचं आवडतं अतिशय टेस्टी व्हेज मंचुरीयन Veg Manchurian Recipe In Marathi घरच्याघरी बनवणार आहोत. मंचुरीयन हा खाद्यपदार्थ आपल्याकडेच पहिल्यांदा बनवला गेला होता. तो चीनच्या पारंपरिक मांचू डिशपेक्षा खूप वेगळा असतो. व्हेज मंचुरीयन घरी बनवणं खूपच सोपं असतं.
व्हेज मंचुरीयन बनवण्यासाठी लागणारं साहित्य :
४ ते ५ जणांसाठी Veg Manchurian Recipe In Marathi व्हेज मंचुरीयन बनवण्यासाठी खालीलप्रमाणे साहित्य घ्यावं लागेल.
व्हेज मंचुरियनमध्ये आपल्याला दोन वेगवेगळे पदार्थ बनवावे लागतात. सर्वात आधी मंचुरियन बॉल्स बनवून घेऊ आणि मग त्यानंतर मंचुरियन ग्रेव्ही बनवावी लागेल.
मंचुरीयन बनवण्यासाठी लागणारं साहित्य :
- 1 कोबी
- 2 – 3 गाजर
- 2 – 3 शिमला मिरची
- कांद्याची पात
- लसणाची पेस्ट
- मंचुरीयन मसाला
- कॉर्न फ्लॉवर
- चवीनुसार मीठ
- लाल तिखट
- तेल
मंचुरीयनची ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारं साहित्य :
- बारीक चिरलेला कांदा
- थोडीशी कांद्याची पात
- बारीक चिरलेली शिमला मिरची
- 2 – 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- आलं लसणाची पेस्ट
- मंचुरीयन मसाला
- चिली सॉस
- सोया सॉस
Veg Manchurian Recipe In Marathi Process व्हेज मंचुरीयन बनवण्याची कृती :
जसं आपण मंचुरियन बॉल्स आणि मंचुरियन ग्रेव्ही यासाठी वेगवेगळं साहित्य घेतलं, तसंच हे दोन्ही बनवण्याची कृतीही वेगळी आहे.
मंचुरीयन बनवण्याची कृती :
1. एक ताट घ्या त्यात कोबी, गाजर, शिमला मिरची बारीक किसून घ्या. त्यानंतर त्यामधील सगळं पाणी काढून घ्या. ते पाणी फेकून द्या.
2. या किसमध्ये एक वाटी कॉर्न फ्लॉवर, अर्धा वाटी मैदा टाकायचं. मग लाल तिखट, कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
3. मग या मिश्रणाचे गोल आकाराचे छोटे छोटे गोळे बनवायचे. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल टाकायचं आणि या तेलात गोळे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. आपले क्रिस्पी मंचुरीयन तयार आहेत.
मंचुरीयनची ग्रेव्ही बनवण्याची कृती :
1. ग्रेव्ही तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घ्यायच. तेल तापल्यानंतर जिरे टाकायचे. मग कांदा टाकायचा. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात आल्या लसणाची पेस्ट टाकायची. मग बारीक चिरलेली शिमला मिरची तेलात टाकून फ्राय करून घ्यायची.
2. त्यानंतर मीठ, चिली सॉस, सोया सॉस टाकायचा. मग एका बाऊलमध्ये मंचुरीयन मसाला घ्यायचा. मग त्यात अर्धा कप पाणी टाकून मसाला मिक्स करून घ्यायचा. आता हे पॅनमध्ये टाकून द्यायचं.
3. आता ही ग्रेव्ही उकळी येईपर्यंत गॅसवर शिजू द्यायची. त्यावर कोथिंबीर टाकून गारनिशिंग करा. आपली ग्रेव्ही तयार आहे.
4. एका प्लेटमध्ये आपण तळलेले मंचुरीयन घ्यायचे आणि त्यावर ही ग्रेव्ही टाकायची. आपले हेल्दी आणि टेस्टी व्हेज मंचुरीयन तयार आहे. ही प्लेट तुम्ही घरच्यांना सर्व्ह करू शकता.
मंचुरीयनचे प्रकार :
Veg Manchurian Recipe In Marathi आपल्याकडे मंचुरीयनचे प्रमुख दोन प्रकार आहेत
1. ड्राय किंवा सेमी ड्राय मंचुरीयन
2. मंचुरीयन विथ ग्रेव्ही
ड्राय मंचुरीयन हे एकदम कोरडे मंचुरीयन असतात. यामध्ये कोणतीही ग्रेव्ही नसते. हे मंचुरीयन टोमॅटो केचअपसोबत खाता येतात. अनेकदा स्टार्टरमध्ये स्नॅक्स म्हणून हे मंचुरीयन खाणं सर्वजण पसंत करतात.
तर ग्रेव्हीसोबत असणारं मंचुरीयन हे वेगळं असतं. या मंचुरीयनमध्ये कॉर्न फ्लॉवरपासून बनलेली स्पेशल ग्रेव्ही असते. यामध्ये वेगवेगळे सॉस असतात. ही मंचुरीयन डिश मेन कोर्समध्ये असते.
याशिवाय व्हेज मंचुरीयन आणि चिकन मंचुरीयन असेसुद्धा प्रकार असतात. व्हेज मंचुरीयनमध्ये बारीक चिरलेल्या कोबी, गाजर, कांद्याची पात, शिमला मिरची अशा अनेक भाज्या असतात. तर चिकन मंचुरीयनमध्ये चिकनचासुद्धा वापर केला जातो.
आजकाल मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मंचुरीयन मिळतात. तेसुद्धा आपण नक्की ट्राय करायला हवेत.
Dal Batti Recipe In Marathi | डाळ बट्टी मराठी रेसिपी
1. व्हेज मंचुरीयन
या मंचुरीयनमध्ये अनेक वेगवेगळ्या भाज्या चिरून टाकलेल्या असतात आणि त्यापासून मंचुरीयनचे बॉल्स बनवलेले असतात आणि नंतर ते ग्रेव्हीमध्ये टाकतात.
2. चिकन मंचुरीयन
या प्रकारात भाज्यांसोबतच चिकनसुद्धा मंचुरीयन बनवताना वापरले जाते. अनेकांना हा प्रकार खूप आवडतो.
3. कोबी मंचुरीयन
या मंचुरीयनमध्ये कोबीसुद्धा वापरला जातो. कोबी मक्याच्या पिठात बुडवून मग तेलात तळतात आणि मंचुरीयनच्या ग्रेव्हीमध्ये टाकून खातात. कोबी मंचुरीयन खूपच लोकप्रिय प्रकार आहे.
4. पनीर मंचुरीयन
या प्रकारच्या Veg Manchurian Recipe In Marathi मंचुरीयनमध्ये पनीरसुद्धा वापरला जातो. पनीर मक्याच्या पिठात मिक्स करून तेलात तळून घेतात आणि मग ग्रेव्हीमध्ये टाकून खातात. पनीरच्या सर्वच रेसिपी खूप टेस्टी असतात आणि सर्वांनाच खूप आवडतात.
5. इडली मंचुरीयन
इडली मंचुरीयन हा खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. तुमच्या घरी जर इडली उरलेली असेल तर तुम्ही इडली कट करून फ्राय करायच्या आणि मग मंचुरीयनच्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून खाऊ शकता. हा पदार्थ खूप टेस्टी बनतो.
6. सोया मंचुरीयन
या मंचुरीयनमध्ये सोयाबीनचे तुकडे हे मक्याचं पीठ आणि भाज्यांसोबत मिक्स करून तेलात फ्राय करतात. अशा प्रकारचे मंचुरीयन खूपच हेल्दी असते.
7. मशरूम मंचुरीयन
यामध्ये मशरूम मक्याच्या पिठात बुडवून मग तेलात तळून घेतात आणि मंचुरीयन ग्रेव्हीसोबत खातात. यातून खूप सारं प्रोटीन मिळतं.
8. बेबी कॉर्न मंचुरीयन
या Veg Manchurian Recipe In Marathi मंचुरीयनमध्ये बेबी कॉर्न वापरले जाते. बेबी कॉर्न वापरल्यामुळे हे मंचुरीयन आणखी टेस्टी आणि हेल्दी बनते.
9. दुधी भोपळा मंचुरीयन
किसलेला दुधी भोपळा हा मक्याच्या पिठासोबत मिसळून नंतर तेलात फ्राय केला जातो आणि नंतर मंचुरीयनच्या ग्रेव्हीमध्ये टाकून खाल्ला जातो. अशाच प्रकारे दुधी भोपळा अनेक डिशमध्ये वापरला जातो.
10. तोफु मंचुरीयन
तोफु हे मक्याच्या पिठात मिसळून तेलात तळून घेतलं जातं आणि त्यानंतर मंचुरीयनच्या ग्रेव्हीमध्ये टाकतात आणि मग खातात. अशाप्रकारे आपलं अतिशय टेस्टी तोफु मंचुरीयन तयार आहे.
असे Veg Manchurian Recipe In Marathi मंचुरीयनचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. मंचुरीयनच्या फॅन्सनी हे सगळे प्रकार नक्कीच ट्राय करायला हवेत आणि या सर्व पदार्थांचा आस्वाद घ्यायला हवा.
Important Tips For Making Veg Manchurian Recipe व्हेज मंचुरियन रेसिपीसाठी काही महत्वाच्या टिप्स :
1. Veg Manchurian Recipe In Marathi व्हेज मंचुरीयनमध्ये सॉस खूप महत्त्वाचे असतात. योग्य प्रमाणात सॉस टाकले तर टेस्ट आणखीन वाढते.
2. तुम्हाला मंचुरीयन बनवायचे असतील तेव्हाच कॉर्न फ्लॉवर आणि मैदा भाज्यांमध्ये मिक्स करायचा. नाहीतर जास्तवेळ ठेवलं तर त्याला पाणी सुटते.
3. मंचुरीयनची ग्रेव्ही ही थोडी पातळच ठेवायची नाहीतर थंड झाल्यावर ती घट्ट होते.
4. Veg Manchurian Recipe In Marathi खाणं हे आपल्या आरोग्यासाठी जास्त चांगलं नाही. त्यामध्ये जास्त प्रमाणात तेल, कॅलरीज आणि फॅट असतात त्यामुळे खाणाऱ्यांना आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. पण तुम्ही मंचुरीयनला हेल्दी बनवण्यासाठी त्यात काही चांगले बदलही करू शकता.
5. मंचुरीयन हे तेलात तळलेले असतात त्यामुळे त्यात जास्त कॅलरीज असतात. जास्त प्रमाणात खाल्लं तर तुमच्या शरीरातील चरबी वाढून वजन वाढू शकतं. व्हेज मंचुरीयन तुमचं वजन वाढण्यात कारणीभूत ठरू शकते.
6. कुठलेही बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यापेक्षा घरी ते पदार्थ बनवून खाणं हे कधीही चांगलं. घरी जेवण बनवताना आपण चांगल्या प्रकारच्या भाज्या, मसाले, तेल वापरतो आणि स्वच्छताही चांगलीच ठेवतो पण याउलट बाहेर हे सर्व पाळलं जात नाही त्यामुळे घरी बनवलेलं हे नेहमी उत्तम.
7. Veg Manchurian Recipe In Marathi बनवताना तुम्ही मैद्याऐवजी तांदळाचे पीठ वापरले तर चालते. कारण मैद्यापेक्षा तांदळाचं पीठ आरोग्यास चांगले असते.
8. मंचुरीयन आणि त्याची ग्रेव्ही बनवताना अनेकजण मार्केटमधून तयार असलेला मसाला वापरतात ज्यामुळे अन्नपदार्थाला अगदी बाहेरच्या सारखीच चव येते. पण जर तुम्हाला बाहेरचा मसाला आवडत नसेल तर तुम्ही घरचे मसालेसुद्धा टाकू शकता.
FAQ’s About Veg Manchurian Recipe व्हेज मंचुरियन रेसिपीबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
1. व्हेज मंचुरीयनमध्ये कुठले कुठले सॉस टाकले जातात ?
मंचुरीयनमध्ये अनेक प्रकारचे सॉस टाकले जातात. सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस असे सॉस या डिशमध्ये टाकले जातात. हे सॉस वापरल्यामुळे मंचुरीयन डिशची टेस्ट ही आणखीनच वाढते.
2. Veg Manchurian Recipe In Marathi हा नेमका कुठला पदार्थ आहे ?
मंचुरीयन ही रेसिपी मूलतः आपल्या भारतातीलच आहे. आपल्याकडील चायनीज रेस्टॉरंटमधेच ही डिश बनवली गेली. या मंचुरीयन डिशचा चीनमधील पारंपरिक मांचू डिशशी जास्त संबंध नाही. दोन्हींमध्ये खूप फरक आहे.
3. व्हेज मंचुरीयन कशा कशापासून बनवले जाते ?
मंचुरीयन हे कोबी, गाजर, शिमला मिरची, कांद्याची पात, हिरवी मिरची, अनेक प्रकारचे सॉसपासून बनवले जाते. वेगवेगळ्या भाज्या यामध्ये वापरल्या जातात.
4. मंचुरीयन हा व्हेज पदार्थ आहे का ?
हो अनेक भाज्या वापरून व्हेज मंचुरीयनदेखील बनवता येते. यामध्ये खूप साऱ्या भाज्या वापरल्या जातात त्यामुळे हा व्हेज पदार्थ आहे.
5. Veg Manchurian Recipe In Marathi खाण्याचे फायदे कोणते आहेत
मंचुरीयन जर मक्याच्या पिठापासून बनवलेले असेल तर आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. यामुळे तुमचे पचन सुधारते. शरीरातील हाडं मजबूत होतात. उच्च रक्तदाब आणि रक्ताची कमीही दूर होते.
अशाप्रकारे आपले घरगुती पद्धतीने बनवलेली अतिशय टेस्टी आणि हेल्दी Veg Manchurian Recipe In Marathi रेसिपी तयार आहे. बाहेरही अनेक ठिकाणी आपल्याला मंचुरीयन खायला मिळते पण तुम्ही ही डिश घरी बनवली तर तुमच्या घरच्यांना ती जास्त आवडेल. ही टेस्टी आणि हेल्दी मंचुरीयन रेसिपी खाल्ल्यानंतर तुमच्या घरचे नक्कीच खूप खुश होतील आणि तुमचं भरभरून कौतुकसुद्धा करतील.
अशाच नवनवीन रेसिपी शिकून घेण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा.
खूप खूप धन्यवाद.