Veg Khichda Recipe In Marathi
Veg Khichda Recipe In Marathi तुम्ही सर्वांनी खिचडा तर अनेकदा खाल्लाचं असेल. अतिशय पौष्टिक असणारा खिचडा चवीमध्येही खूप छान असतो. अनेक प्रकारचे धान्य आणि डाळी मिक्स करून ही व्हेज खिचडाची रेसिपी बनवली जाते. हा खिचडा नेहमीच आपल्या घरात बनवला जातो. लहानपणापासून आपण अनेकदा हा खिचडा खाल्ला असणार. आपल्या आरोग्यासाठीही हा खिचडा अतिशय पौष्टिक असतो.
पूर्वीच्या काळात फकीर किंवा भिक्षा मागणाऱ्या लोकांकडे एकच झोळी असायची तेव्हा कोणी त्यांना गहू द्यायचे, कोणी बाजरी तर कोणी तांदूळ, डाळ द्यायचे मग ते हे सर्व धान्य घरी घेऊन जायचे आणि धुवून कांडून त्याचा खिचडा करून खायचे असा या खिचडाचा Veg Khichda Recipe In Marathi इतिहास मानला जातो.
हा खिचडा अनेक प्रकारचा बनवला जातो. कोणाला व्हेज खिचडा आवडतो तर कोणाला नॉनव्हेज खिचडा आवडतो. पण व्हेज खिचडा हा गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ, वेगवेगळ्या डाळी टाकून बनवतात. रोजच्या जेवणाचा कंटाळा आला की ही व्हेज खिचडाची रेसिपी Veg Khichda Recipe In Marathi आपण बनवू शकतो.
आज आम्ही तुमच्यासाठी व्हेज खिचडा बनवण्याची सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. ही Veg Khichda Recipe In Marathi रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून पहा.
व्हेज खिचडा बनवण्याचं साहित्य :
व्हेज खिचडा Veg Khichda Recipe In Marathi बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
- 2 चमचे तांदूळ
- 2 चमचे मुगाची डाळ
- 2 चमचे मसूर डाळ
- 2 चमचे तुरीची डाळ
- 2 चमचे चना डाळ
- 2 चमचे हिरवी मुगाची डाळ
- 1 छोटी वाटी गहू
- अर्धी छोटी वाटी ज्वारी
- अर्धी छोटी वाटी बाजरी
- भिजवण्यासाठी पाणी
- चवीनुसार मीठ
- 2 मोठे चमचे तेल
- 1 छोटा चमचा मोहरी
- 1 छोटा चमचा जिरे
- चिमूटभर हिंग
- 2 छोटे चमचे आलं लसणाची पेस्ट
- 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- थोडेसे कढीपत्त्याची पानं
- थोडेसे काळी मिरी
- अर्धा छोटा कांदा बारीक चिरलेला
- थोडेसे खोबऱ्याचे बारीक तुकडे
- 1 टोमॅटो बारीक चिरलेला
- थोडंसं मीठ
- 1 छोटा चमचा जिरेपूड
- 1 छोटा चमचा धनेपूड
- अर्धा छोटा चमचा हळद
- 1 चमचा लाल तिखट
- थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
व्हेज खिचडा बनवण्याची कृती :
1. व्हेज खिचडा Veg Khichda Recipe In Marathi बनवण्यासाठी आपण जे धान्य आणि डाळी घेणार आहोत त्याचं ठराविक प्रमाण नाही पण आपण एका भांड्यात 2 चमचे तांदूळ, 2 चमचे मुगाची डाळ, 2 चमचे मसूर डाळ, 2 चमचे तुरीची डाळ, 2 चमचे चना डाळ, 2 चमचे हिरवी मुगाची डाळ घेणार आहोत. यातलं जे उपलब्ध असेल ते वापरू शकता.
2. त्यानंतर दुसऱ्या भांड्यात एक छोटी वाटी गहू, अर्धी छोटी वाटी ज्वारी, अर्धी छोटी वाटी बाजरी टाकायची. या दोन्ही भांड्यांमध्ये पाणी टाकून धान्य आणि डाळी स्वच्छ धुवून घेऊया.
धान्य आणि डाळी दोन्ही धुवून झाल्यावर हे पाणी काढून टाकायचं आणि पुन्हा त्यात पाणी टाकून भिजत घालायचं. हे आपण उद्या सकाळी करणार आहोत त्यामुळे रात्रभर भिजत घालायचं. गहू, बाजरी आणि ज्वारी बाहेरच रूम टेंपरेचरवर भिजत ठेवायचं आहे आणि या डाळी फ्रीजमध्ये ठेवायच्या.
3. जर तुम्ही खिचडा Veg Khichda Recipe In Marathi दुपारच्या जेवणाला करणार असाल तर सकाळीसुद्धा भिजायला ठेवू शकता. पण आपण उद्या सकाळी करणार आहोत म्हणून रात्रभर भिजत ठेवायचं. थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही बाहेर ठेवू शकता पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं आहे.
4. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या डाळी आणि धान्य चांगलं भिजलं आहे. आता यातलं पाणी नितळून घेऊया. पूर्वी गहू, बाजरी आणि ज्वारी आधी कुटून घ्यायचे आणि नंतर वापरायचे जेणेकरून ते लवकर शिजले गेले पाहिजे. पण इथे आपण आज कुटून किंवा कांडून घेणार नाही कारण आधीच आपण भिजवून घेतलेले आहेत त्यामुळे लवकर शिजेल. फक्त ज्वारी शिजायला थोडा वेळ लागतो. जर तुम्हाला ज्वारी आवडत नसेल तर नाही वापरली तरी चालेल.
5. आता आपण धान्य आणि डाळी मातीच्या भांड्यामध्ये टाकून शिजवून घेऊया. मातीचंच भांडं वापरलं पाहिजे असं काही नाही तुम्ही कुठल्याही गंजात, टोपात हे शिजवू शकता. फक्त कुकरमध्ये हे नाही लावायचं कारण कुकरमध्ये हे खालून लागतं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं.
6. पाण्याचं प्रमाण हे जेवढं आपण धान्य घेतलंय त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचंय. जर तुमचं 1 कप पूर्ण भिजलेलं धान्य असेल तर तुम्हाला 2 कप पाणी वापरायचं आहे. कारण आपण हे आधीच भिजवून घेतलेलं आहे त्यामुळे याला शिजायला पाणी कमी लागतं. जर तुम्ही भिजवून घेतलं नसेल तर त्याला शिजण्याकरिता जास्त वेळ लागतो आणि पाणीसुद्धा जास्त लागतं.
हे तुम्हाला मधेमधे ढवळत ढवळत छान शिजवून घ्यायचं आहे. मातीचं भांडं असल्यामुळे गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा. भांड्यावर झाकण ठेवून आपलं पूर्ण धान्य शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं.
7. काही वेळाने झाकण बाजूला केल्यावर आपल्या डाळी आणि धान्य छान शिजल्या गेल्या आहेत. चना डाळ आणि ज्वारी शिजायला वेळ लागतो त्यामुळे ते चमच्यावर घेऊन शिजले का ते दाबून पाहायचं. आपली चणाडाळ छान शिजली आहे. इथे आपला खिचडा तयार आहे. आता गॅस बंद करायचा आणि यावर झाकण ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण याला फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणीची तयारी करूया.
8. फोडणीसाठी दुसरं मातीचं भांडं गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल, तेल गरम झाल्यावर त्यात 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 2 छोटे चमचे आलं लसणाची पेस्ट टाकून मिक्स करायचं.
त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडेसे कढीपत्त्याची पानं, थोडीशी काळी मिरी, अर्धा छोटा कांदा चिरून टाकायचा, थोडेसे खोबऱ्याचे बारीक काप, 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो, कांदा शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं. आपण आधीच खिचडा शिजवताना मीठ टाकलं होतं त्यामुळे सांभाळून मीठ टाकायचं. टोमॅटो नीट शिजले गेले पाहिजे त्यामुळे हे मीठ टाकायचंय.
9. यावर झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिटे शिजवून घेऊया. आता आपला हा मसाला छान शिजलेला आहे. यामध्ये 1 छोटा चमचा जिरेपूड, 1 छोटा चमचा धनेपूड, अर्धा छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट टाकायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त टाकू शकता.
10. त्यानंतर यामध्ये आपण शिजवलेला खिचडा टाकायचा. हे खूप पौष्टिक जेवण आहे आणि तुम्ही रात्रीच भिजवून घेतलं तर शिजायला जास्त वेळसुद्धा लागत नाही. हा खिचडा मसाल्यासोबत छान मिक्स करून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवून साधारण 2 मिनिटे वाफ येऊपर्यंत छान शिजवून घेऊया.
आपला खिचडा Veg Khichda Recipe In Marathi तयार आहे. गॅस बंद करूया आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गारनिशिंग करूया. आपला खिचडा Veg Khichda Recipe In Marathi आता तुम्ही प्लेटमध्ये सर्व्ह करू शकता.
ही खिचडा रेसिपी Veg Khichda Recipe In Marathi अत्यंत पौष्टिक आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, मिनरल्स आणि हेल्दी फॅट्स आहेत. वजन कमी करणाऱ्यांसाठी ही अतिशय फायदेशीर रेसिपी आहे. या सर्व फायद्यांमुळे खिचडा रेसिपी एकदा नक्की टेस्ट करून पहा.
Chakolya Recipe In Marathi | चकोल्या रेसिपी मराठी 2024
महत्त्वाच्या टिप्स :
1. जर तुम्हाला खिचडा Veg Khichda Recipe In Marathi दुपारी जेवणाला बनवायचा असेल तर धान्य आणि डाळी सकाळी भिजायला टाकायचं आणि सकाळी बनवायचा असेल तर रात्रीच भिजायला टाकायचं. थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही बाहेर भिजत ठेवू शकता पण उन्हाळ्यात फ्रीजमध्ये ठेवायचंय.
2. धान्य आणि डाळी शिजवताना जेवढं आपलं भिजलेलं धान्य आहे त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं. कुकरमध्ये हे कधीही शिजवायचं नाही कारण ते कुकरमध्ये खाली लागतं. त्याऐवजी दुसरं भांडं वापरायचं.
3. बऱ्याचदा हा खिचडा Veg Khichda Recipe In Marathi नैवेद्याच्या रुपात प्रसादासाठी बनवला जातो त्यामध्ये कांदा नाही वापरायचा. डाएटसाठीही बनवत असाल तर कांदा, खोबरं टाकत नाहीत.
4. जर तुम्ही धान्य आणि डाळी रात्रीच भिजवून घेतलं तर शिजवायला जास्त वेळ लागत नाही.
5. खिचडा ही रेसिपी वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी खूप उत्तम आहे. यामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स भरपूर आहेत.
या सर्व टिप्स वापरून व्हेज खिचडाची रेसिपी Veg Khichda Recipe In Marathi नक्की बनवा.
काही महत्त्वाचे प्रश्न :
1. व्हेज खिचडा रेसिपी Veg Khichda Recipe In Marathi कशी बनवायची ?
व्हेज खिचडा बनवण्यासाठी धान्य आणि डाळी हे दोन वेगळ्या भांड्यात टाकून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग पुन्हा पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या डाळी आणि धान्य चांगलं भिजलं आहे. त्यातून पाणी काढून टाकायचं. यानंतर धान्य आणि डाळी मातीच्या भांड्यात टाकून शिजवून घ्यायचं. यामध्ये दुप्पट पाणी टाकून झाकण ठेवायचं आणि गॅसच्या कमी फ्लेमवर शिजवून घ्यायचं. हे शिजल्यावर गॅस बंद करायचा. आता मसाला तयार करायचा आणि त्यात शिजवलेला खिचडा टाकून मिक्स करायचा. 2 मिनिटे वाफ येऊपर्यंत पुन्हा शिजवून घ्यायचा. आपला टेस्टी व्हेज खिचडा तयार आहे.
2. खिचडा रेसिपी Veg Khichda Recipe In Marathi आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे का ?
व्हेज खिचडा रेसिपी Veg Khichda Recipe In Marathi ही धान्य आणि डाळींपासून बनवली जाते. खिचडा हा एक असा पदार्थ आहे ज्यामधून आपल्याला सर्व पोषणतत्व मिळतात. यामध्ये भरपूर प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स अशी खूप सारे पोषणतत्वे आहेत त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे. ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांच्यासाठी ही खूप फायदेशीर रेसिपी आहे. व्हेज खिचडा ही खूप टेस्टी आणि हेल्दी डिश आहे.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला पौष्टिक आणि ताकद देणारे जेवण खायचं असतं अशावेळी हा स्वादिष्ट खिचडा Veg Khichda Recipe In Marathi नक्कीच बनवून टेस्ट करायला हवा. तुम्ही ही खिचडा रेसिपी नक्कीच बनवून घरच्यांना खायला द्या. सर्वांना खूप आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल हे नक्की.
तुम्हाला ही Veg Khichda Recipe In Marathi रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच खमंग रेसिपी बनवण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद