Veg Hakka Noodles Marathi Recipe | व्हेज हक्का नूडल्स रेसिपी मराठी

Veg Hakka Noodles Marathi Recipe

Veg Hakka Noodles Marathi Recipe

Veg Hakka Noodles Marathi Recipe अगदी 2 मिनिटांत बनणारे नूडल्स आपण सगळेच खूप आवडीने खात असतो. मग तो सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारचं नाहीतर रात्रीचं जेवण आपल्याला ईच्छा होईल तेव्हा आपण आपले फेव्हरेट नूडल्स खातो. घरातल्या लहान मुलांची तर नूडल्स म्हटल्यावर सगळ्यात फेव्हरेट डिश आहे त्यामुळे त्यांच्यासाठी वारंवार नूडल्स हे बनवावेच लागतात.

जबरदस्त भूक लागली असेल तर पटकन तयार होणारे चटपटीत नूडल्स सगळेच बनवून खातात. अनेकदा घरात स्वयंपाकाचा कंटाळा आला की आपण हमखास नूडल्स बनवतो. हॉस्टेलला राहणारे विद्यार्थी आणि घराबाहेर राहणारे नोकरदार तर बहुतांश आपली भूक नुडल्सवरच भागवतात. कमी वेळात बनणारे टेस्टी नूडल्स सर्वांचंच आवडतं जेवण आहे.

चायनीज नूडल्स खाण्यासाठी अनेक रेस्टोरंट आणि चायनीजच्या गाड्यांवर खवय्यांची नेहमीच भरपूर गर्दी पाहायला मिळते. भरपूर प्रकारचे नूडल्स याठिकाणी खायला मिळतात. अतिशय टेस्टी नूडल्स बाहेर मिळतात पण ते हेल्दी असतात का याबद्दल खात्री नसते त्यामुळेच आपण जर घरी हे नूडल्स बनवले तर उत्तमच आहे.

आपण बाहेरच्यापेक्षा खूप टेस्टी आणि हेल्दी नूडल्स खूपच सोप्यात घरच्याघरीच बनवू शकतो. व्हेज हक्का नूडल्स तर सर्वांचेच फेव्हरेट आहेत. हे नूडल्स खूप टेस्टी लागतात. व्हेज हक्का नूडल्सला Veg Hakka Noodles Marathi Recipe व्हेज चाऊमीन असंही म्हणतात.

आज आम्ही अगदी टेस्टी व्हेज हक्का नूडल्स बनवण्याची सोपी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्ही ही Veg Hakka Noodles Marathi Recipe नूडल्सची रेसिपी नक्की बनवून पहा.

व्हेज हक्का नूडल्स बनवण्याचं साहित्य :

व्हेज हक्का नूडल्स Veg Hakka Noodles Marathi Recipe बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.

150 ग्रॅम नूडल्स
दीड लीटर पाणी
अर्धा चमचा मीठ
1 मोठा चमचा तेल
थोडं थंड पाणी
2-3 चमचे तेल
पाव कप चिरलेला गाजर
पाव कप चिरलेली शिमला मिरची
पाव कप चिरलेला कोबी
2 ते 3 मोठे चमचे तेल
2 चमचे बारीक किसलेला लसूण
अर्धा इंच आल्याचे बारीक काप
2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
पाव कप बारीक चिरलेली कांद्याची पात
पाव कप बारीक चिरलेला कांदा
किंचित थोडंसं मीठ
1 चमचा सोया सॉस
1 मोठा चमचा रेड चिली सॉस
2 चमचे तेल
पाव चमचा काळ्या मिरीची पूड
1 मोठा चमचा टोमॅटो केचअप
थोडंसं मीठ
1 छोटा चमचा विनेगर
1 छोटा चमचा नूडल सिझनिंग
थोडीशी कांद्याची पात

व्हेज हक्का नूडल्स बनवण्याची कृती :

1. व्हेज हक्का नूडल्स Veg Hakka Noodles Marathi Recipe बनवण्यासाठी सर्वात आधी आपण नूडल्स उकळून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर एका पॅनमध्ये दीड लिटर पाणी उकळायला ठेवायचं. आपण मार्केटमधून आणलेल्या नूडल्सच्या पॅकवर सूचना लिहलेली असते की नूडल्स किती वेळ शिजवायचे त्याप्रमाणेच हे शिजवायचे. इथे आपण 5 मिनिटे हे नूडल्स मिडीयम फ्लेमवर शिजवून घेणार आहोत.

2. पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ, 1 मोठा चमचा तेल टाकायचं. 150 ग्रॅम नूडल्स घ्यायचे आणि पाण्याला छान उकळी आली की नूडल्स त्यामध्ये टाकायचे. त्याआधी जर आपण नूडल्स टाकले तर ते चिकटू शकतात त्यामुळे नूडल्स सुटसुटीत होण्याकरिता पाण्याला छान उकळी आल्यानंतरच नूडल्स त्यामध्ये घालायचे. पॅकेटवर जेवढा वेळ लिहलेला आहे तेवढाच वेळ ते शिजवायचे.

3. चिमट्याच्या साहाय्याने नूडल्स सुटसुटीत करून घ्यायचे. 4 ते 5 मिनिटे हे नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत. जास्त वेळ शिजवायचे नाहीत. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि एका भांड्यावर चाळणी ठेवून नूडल्स चाळणीवर टाकून त्यातलं पाणी काढून घ्यायचं. नूडल्सवर लगेचच थंड पाणी घालायचं त्यामुळे नूडल्स छान सुटसुटीत राहतात. वरून 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आणि ते पसरून घ्यायचं.

Masale Bhat Marathi Recipe 2024 | मसाले भात रेसिपी मराठी

नूडल्स सुटसुटीत राहण्यासाठी 3 टिप्स आहेत. पाणी उकळल्यानंतरच त्यामध्ये नूडल्स टाकायचे. नूडल्स जास्त वेळ शिजवायचे नाहीत जेवढा वेळ पॅकेटवर लिहलेला आहे तेवढाच वेळ शिजवायचे. त्यानंतर नूडल्स चाळणीवर टाकून त्यातलं पाणी काढल्यावर त्यावर लगेच थंड पाणी टाकायचं आणि 2 चमचे तेल टाकून ते पसरून घ्यायचं. यामुळे नूडल्स बराच वेळ सुटसुटीत राहतात.

4. नूडल्समध्ये टाकण्यासाठी शिमला मिरची, गाजर आणि कोबीचे बारीक काप करून घ्यायचे आहेत.

5. आता आपण नूडल्स बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी एका मोठ्या पॅनमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे. गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवायचा. तेल गरम झालं की त्यात 2 चमचे बारीक चिरलेला लसूण, अर्धा इंच आल्याच्या तुकड्याचे बारीक काप, पाव कप बारीक चिरलेला गाजर, पाव कप बारीक चिरलेला कोबी टाकून मिडीयम फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळ शिजवायचं नाही. आपल्याला या भाज्या क्रंचीच ठेवायच्या आहेत.

6. त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, पाव कप बारीक चिरलेली कांद्याची पात, पाव कप बारीक चिरलेला कांद्याच्या पातीचा कांदा टाकून परतून घ्यायचा. आता पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून परतून घ्यायचं.

नूडल्स बनवण्याकरिता लागणारं सर्व साहित्य जवळच ठेवायचं. भाज्या वगैरे आधीच चिरून घ्यायच्या कारण नूडल्स मिडीयम ते हाय फ्लेमवर आपल्याला बनवायचे असतात आणि ते लगेच बनतात.

7. आता यामध्ये किंचित थोडंसं मीठ घालूया. सगळ्या वस्तू हाताशी ठेवायच्या म्हणजे कढईमध्ये पदार्थ जळणार नाहीत.  या सर्व भाज्या 2 ते 3 मिनिटे मिडीयम ते हाय फ्लेमवर शिजवून घेतल्या आहेत.

8. यानंतर कढईमध्ये नूडल्स Veg Hakka Noodles Marathi Recipe टाकायचे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. आता आपल्याला 1 मोठा चमचा सोया सॉस, 1 मोठा चमचा रेड चिली सॉस, रेड चिली सॉसवर 2 चमचे तेल, पाव चमचा काळी मिरीची पूड, 1 मोठा चमचा टोमॅटो केचअप टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं.

9. आता यामध्ये आपण मीठ थोडंसं टाकूया. ज्यावेळी आपण नूडल्स शिजवून घेतले होते त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं आणि थोडावेळ गाजर आणि कोबी शिजवली होती तेव्हासुद्धा मीठ थोडंसं टाकलं होतं. त्यानुसार मीठ घालायचं आणि आपण जे सॉस वापरले आहेत त्यामध्येही बऱ्यापैकी मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण बरोबर घ्यायचं.

10. सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये 1 छोटा चमचा विनेगर घालायचं आहे. तुमच्याकडे जर ऍपलचा गर विनेगर असेल तर तेही तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर दोन्ही चमच्याच्या मदतीने हे मिक्स करून घ्यायचं आणि शेवटी शेवटी एखाद्या मिनिट हाय फ्लेम ठेवून हे मिक्स करून घ्यायचं.

11. आपले नूडल्स तयार आहेत हे तुम्ही असेच सर्व्ह करू शकता पण याची चव आणखी वाढवण्यासाठी नूडल्सच्या पॅकेटबरोबर एक नूडल्सची सिझनिंग येते. तर ती सिझनिंग आपण यामध्ये घालणार आहोत. 1 छोटा चमचा नूडल्सची सिझनिंग यामध्ये टाकायची. हे टाकणं तुमच्या मनावर आहे. जर तुमच्या नूडल्सच्या पॅकबरोबर हे सिझनिंग आलेलं असेल तर टाका आणि नसेल आलं तर नाही टाकलं तरी चालेल. पण यामुळे नूडल्सची चव आणखीन वाढते.

12. सगळ्यात शेवटी यात थोडीशी कांद्याची पात टाकायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. आपले नूडल्स तयार आहेत. हे तुम्ही एका छोट्या बाऊलमध्ये सर्व्ह करू शकता. नूडल्स असेच खाऊ शकता किंवा मग टोमॅटो केचअपसोबतही खाऊ शकता.

काही वस्तू कमी जास्त वाटत असतील तर त्या तुम्ही ऍडजस्ट करू शकता. एखादा सॉस तुम्हाला आवडत असेल तर तो यामध्ये जास्त घालू शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये टाकू शकता.

महत्त्वाच्या टिप्स 

1. तुम्हाला जर नूडल्स Veg Hakka Noodles Marathi Recipe छान सुटसुटीत बनवायचे असतील तर

सर्वात आधी पाणी उकळल्यानंतरच त्यामध्ये नूडल्स टाकायचे.

नूडल्सच्या पॅकेटवर लिहलेलं आहे तितकाच वेळ नूडल्स शिजवायचे आहेत.

नूडल्स शिजल्यानंतर ते गाळणीवर टाकून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि नूडल्सवर लगेचच थंड पाणी टाकायचं आणि 2 ते 3 छोटे चमचे तेल टाकून पसरून घ्यायचं.
यामुळे आपले नूडल्स बराचवेळ सुटसुटीत राहतील.

2. नूडल्स बनवताना गाजर आणि कोबी आधी शिजायला टाकायचे कारण त्यांना शिजायला जास्त वेळ लागतो. या भाज्या आपल्याला क्रंची ठेवायच्या त्यामुळे जास्तवेळ शिजवायच्या नाहीत.

3. नूडल्स बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य जवळच ठेवायचं. भाज्या वगैरे आधीच चिरून घ्यायच्या. कारण नूडल्स मिडीयम ते हाय फ्लेमवर बनवले जातात म्हणून ते लवकर बनतात. सगळ्या वस्तू हाताशी ठेवल्या तर कढईमधील पदार्थ काहीच जळणार नाहीत.

4. आपण नूडल्स Veg Hakka Noodles Marathi Recipe शिजवतो तेव्हा मीठ टाकतो त्यानंतर गाजर आणि कोबी शिजवली तेव्हासुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं. आपण सॉस टाकले त्यामध्येही मीठ असतं त्यामुळे मीठ बरोबर प्रमाणात टाकायचं.

5. नूडल्सच्या पॅकेटसोबत आलेली सिझनिंग यामध्ये टाकली तर नूडल्सची चव आणखी वाढते.

वरील सर्व टिप्स वापरून तुम्ही सहज व्हेज हक्का नूडल्स बनवू शकता.

काही महत्त्वाचे प्रश्न :

1. व्हेज हक्का नूडल्स Veg Hakka Noodles Marathi Recipe कसे बनवले जातात ?

व्हेज हक्का नूडल्स बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये पाणी उकळून त्यात नूडल्स शिजवून घ्यायचे. त्यानंतर नूडल्स चाळणीवर टाकून त्यातील पाणी काढून घ्यायचं. लगेचच नूडल्सवर थंड पाणी टाकायचं आणि 2 चमचे तेल टाकून पसरून घ्यायचं. शिमला मिरची, गाजर आणि कोबीचे बारीक काप करून टाकायचे आणि तेलामध्ये लसूण, आलं, गाजर, कोबी, हिरव्या मिरच्या, कांद्याची पात, कांदा, शिमला मिरची टाकून परतून घ्यायचं. आता कढईमध्ये नूडल्स, सॉस आणि टोमॅटो केचअप टाकून मिक्स करून घ्यायचं. आपले व्हेज हक्का नूडल्स तयार आहेत.

2. नूडल्स Veg Hakka Noodles Marathi Recipe आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात का ?

नूडल्स Veg Hakka Noodles Marathi Recipe जर योग्य प्रमाणात खाल्ले तर ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकत नाही. नूडल्समध्ये पोषकतत्वे कमी प्रमाणात असतात त्यामुळे ते मुख्य जेवण होऊ शकत नाही. नूडल्स वारंवार खाल्ल्याने तुमच्या जेवणाची गुणवत्ता खराब होते आणि मेटबॉलिक सिंड्रोमचा धोका होतो.

अत्यंत टेस्टी व्हेज हक्का नूडल्स Veg Hakka Noodles Marathi Recipe आपले घरच्याघरी बनवून तयार झाले आहेत. हे तुम्ही तुमच्या कुटुंबियांना टेस्ट करायला द्या. सर्वांना हे नूडल्स प्रचंड आवडतील. इतके चटपटीत नूडल्स घरीच बनवता येत असतील तर बाहेर जाऊन खाण्याची काहीच गरज नाही. तुम्ही हे नूडल्स पुन्हा पुन्हासुद्धा बनवू शकता. ही व्हेज हक्का नूडल्स रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा.

तुम्हाला ही चटपटीत नूडल्सची रेसिपी Veg Hakka Noodles Marathi Recipe आवडली का नक्कीच सांगा. अशाच छान छान रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.

तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.

Scroll to Top