Uttarakhand Swaraojgar Yojana 2024
Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 सध्या आपल्या देशात नोकऱ्यांसाठी किती मारामारी आहे, ही गोष्ट कोणापासूनही लपलेली नाहीये. नोकऱ्या मिळवण्यासाठी तरुण बेरोजगार रात्रंदिवस मेहनत करतात. परंतु तरीही नोकऱ्या मिळत नाही. सरकारी नोकऱ्यांची परिस्थिती तर आणखीनचं अवघड आहे. त्यामुळे आता अनेक तरुण स्वरोजगाराकडे वळले आहेत. स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करावा, अशी त्यांची इच्छा असते.
परंतु स्वतःचा व्यवसाय सुरू करणं, हे काही सोपं काम नाहीये. व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात अवघड आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडवल जमा करणं. भांडवल असेल तरचं व्यवसाय सुरू करता येतो आणि नवीन उद्योजकाला तरुण मुलांना हे भांडवल कोण देणार ?
तरुण मुलांकडे उत्साह असतो, टॅलेंट असतं. परंतु त्यांच्याकडे कोणतीही पार्श्वभूमी नसते. आधीची संपत्ती नसते की, त्यांना बँका कर्ज देतील किंवा ते स्वतःच्या कुटुंबाकडून पैसे घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकतील. त्यामुळे अनेक नवं उद्योजक कधीही यशस्वी उद्योगपती होऊ शकत नाही. भांडवल नसल्यामुळे त्यांना त्यांच्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागते.
पण आता अशाचं तरुणांसाठी उत्तराखंड सरकारने एक खूपचं छान योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 उत्तराखंड स्वरोजगार योजना. या योजनेअंतर्गत ज्या बेरोजगार तरुणांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना राज्य सरकार कर्ज उपलब्ध करून देणार आहे.
मग ही उत्तराखंड स्वरोजगार योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेअंतर्गत किती रुपयांचं कर्ज मिळेल ? या Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? पात्रता आणि अटी काय आहेत ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया.
उत्तराखंड स्वरोजगार योजनेचं उद्दिष्ट
राज्यातील बेरोजगारी दूर करणं, राज्यातील शिक्षित तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ मिळवून देणं. त्यांची भांडवलाची कमतरता पूर्ण करणं, हे उत्तराखंड स्वरोजगार Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
उत्तराखंड स्वरोजगार योजनेची वैशिष्ट्ये
उत्तराखंड सरकारने सुरू केलेली Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 ही योजना खूपचं वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता आपण या योजनेच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.
1) या Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 योजनेअंतर्गत राज्यातील ज्या नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं.
2) या कर्जावर राज्य सरकार खूप कमी व्याजदर आकारतं.
3) कर्जाची परतफेड करण्यासाठी सोईस्कर हप्ते आणि मुदतही देण्यात आली आहे. जेणेकरून हे कर्ज नवीन उद्योजकांना डोईजड होणार नाही.
4) उत्तराखंड सरकार दिवसेंदिवस या योजनेचा विस्तार करत आहे. आता नुकतीचं या योजनेमध्ये ज्या उद्योजकांना स्वतःची ऑटो रिक्षा, ई रिक्षा किंवा टॅक्सी खरेदी करायची आहे, त्यांना सुद्धा कर्ज उपलब्ध करून दिलं जातं.
5) या Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 योजनेत अर्ज करण्यासाठी सरकारने कोणतीही शैक्षणिक पात्रता ठरवलेली नाहीये. म्हणजेचं ज्या व्यक्तींकडे शिक्षण नसतानाही एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, पण त्याच्याकडे स्किल असेल, तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि तो स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो.
Mukhyamantri Gramin Path Vikreta Yojana | मुख्यमंत्री पथ विक्रेता ऋण योजना
उत्तराखंड स्वरोजगार योजनेच्या पात्रता आणि अटी
या Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 योजनेत अर्ज करण्यासाठी उत्तराखंड सरकारने काही पात्रता आणि अटी आखून दिल्या आहेत. आपण आणि त्या जाणून घेऊयात.
1) अर्जदार व्यक्ती उत्तराखंड राज्याची मूळ निवासी असावी.
2) या व्यक्तीस जो व्यवसाय सुरू करायचा आहे, त्या व्यवसायाबद्दल त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रे आणि ज्ञान असणं आवश्यक आहे.
3) या Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 योजनेत अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रतेची कोणतीही अट नाही.
उत्तराखंड स्वरोजगार योजनेत अर्ज करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे
या Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराने खालील प्रमाणे महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
1) अर्जदाराचं आधार कार्ड
2) अर्जदाराचा निवासी दाखला
3) अर्जदाराचं पॅन कार्ड
4) अर्जदाराचं बँक अकाउंट पासबुक
5) अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
6) व्यवसायासंबंधी कागदपत्रे
7) व्यवसाय कसा करणार आहे त्याबद्दलचा प्लॅन
उत्तराखंड स्वरोजगार योजनेत अर्ज कसा करायचा
या Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 योजनेत अर्ज करण्यासाठी उत्तराखंड सरकारने एक ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या ऑनलाइन पोर्टलवर लॉगिन करून अर्जदार अर्ज करू शकतो आणि महत्त्वाची कागदपत्रेही अपलोड करू शकतो.
त्याचबरोबर राज्यातील मोठमोठ्या शहरांमध्ये या योजने संबंधित मेळावेही आयोजित केले जातात. येथे तरुणांना आमंत्रित करून स्वरोजगार मिळण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं.
या Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 योजनेसंबंधित अर्ज प्राप्त झाल्यानंतर अधिकारी त्या अर्जाची छाननी करतात आणि सर्व गोष्टी योग्य आढळल्यास अर्जदाराला त्याच्या आवश्यकतेनुसार कर्ज पुरवलं जातं.
उत्तराखंड स्वरोजगार योजनेचे फायदे
उत्तराखंड सरकारने सुरू केलेली ही स्वरोजगार योजना खूपचं फायदेशीर आहे. देशाच्या इतर राज्यांमध्ये ही अशा योजना सुरू आहेत. परंतु या योजनेअंतर्गत मिळणार कर्ज हे खूप कमी असतं. त्यामुळे कर्ज मिळाल्यानंतरही अनेक तरुणांना नवीन व्यवसाय सुरू करण्यास खूप अवघड जातं.
आपल्या सर्वांना माहिती आहे की, व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यावर खूप पैशांची आवश्यकता असते. शून्यातून कोणतीही गोष्ट सुरू करणं हे काही सोप्प नाहीये. त्यामुळे उत्तराखंड सरकारने या योजनेचे जी दहा लाख रुपये कर्जाची सीमा ठेवली आहे, ती खूपचं योग्य आहे, तेवढं मात्र नक्की.
तसंच एखादा व्यवसाय करायचा म्हटल्यावर, एखादा लघुउद्योग सुरू करायचा, एखाद्या वस्तूचं उत्पन्न सुरू करायचं, असाच अर्थ पकडला जातो. परंतु उत्तराखंड हे पर्यटकांचे आवडते राज्य असल्यामुळे, तेथे मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय सुरू असल्यामुळे, राज्य सरकारने या योजनेचा विस्तारही केला आहे आणि ज्या लोकांना स्वतःचं एखादं वाहन खरेदी करायचंय जसं की, ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी त्यांनाही या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलंय.
म्हणजेचं ही Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 योजना सर्वसमावेशक आहे. फक्त स्वतःचा मोठा व्यवसाय सुरू करणाऱ्यांनाचं नाही तर छोटे मोठे व्यवसाय सुरू करणाऱ्यांना सुद्धा ही योजना खूपचं फायदेशीर आहे.
भारतात तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येकालाचं काम हवंय. रोजगार हवाय. परंतु सरकार प्रत्येकालाचं नोकरी नाही देऊ शकत. त्यामुळे स्वरोजगार मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. तरुण बेरोजगारांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करणं खूप महत्त्वाचं आहे आणि उत्तराखंड सरकारची योजना त्यांना नक्कीचं उत्साहित करेल, प्रोत्साहन देईल यात शंका नाही.
अनेक तरुणांकडे बेरोजगारांकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे आयडिया. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट नसते आणि ती म्हणजे पैसा भांडवल. हे भांडवल मिळवण्यासाठी तरुण बँकांकडे जातात. तेव्हा त्यांच्या पदरी निराशा येते. कारण बँका अशा नवख्या तरुणांना कर्ज देण्यासाठी नकार देतात. त्या मोठमोठ्या उद्योजकांना कर्ज देतात.
नवीन उद्योजकांकडे गॅरंटीसाठी बँक जमीन, दागिने किंवा तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे अशी विचारणा करते. परंतु तरुणांकडे यापैकी काहीचं नसतं. त्यामुळे उद्योजक बनण्याचं स्वप्न हे अपूर्णचं राहून जातं. त्यामुळे अशा तरुणांना सरकारने मदत करणं खूप महत्त्वाचं आहे. आज हा तरुण जो नवीन उद्योग सुरू करणार आहे, त्याला स्वतःलाही नोकरीची गरज पडणार नाही आणि तो उद्या काही जणांना नक्कीचं रोजगार देऊ शकतो. म्हणजे एकाचं वेळेस सरकार अनेक तरुणांच्या समस्या सोडवू शकतं.
उत्तराखंड स्वरोजगार योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : उत्तराखंड स्वरोजगार योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
उत्तर : या Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 योजनेअंतर्गत सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांना स्वरोजगार सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं उद्दिष्ट ठेवलंय.
2) प्रश्न : उत्तराखंड स्वरोजगार योजनेअंतर्गत किती रुपयांचं कर्ज मिळतं ?
उत्तर : अर्जदाराला कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे, त्याला किती पैशांची गरज आहे, यानुसार या योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मंजूर केलं जातं.
3) प्रश्न : उत्तराखंड स्वरोजगार योजनेअंतर्गत वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज मिळतं का ?
उत्तर : होय, या Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 योजनेअंतर्गत वाहन खरेदी करण्यासाठीही कर्ज मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. ज्या तरुणांना स्वतःची ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी खरेदी करायची आहे, त्यांनाही सरकारकडून कर्ज उपलब्ध करून दिलं जातं.
4) प्रश्न : या योजनेसाठी अर्जदाराचे वय किती असायला हवं ?
उत्तर : या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्ष असायला हवं.
5) प्रश्न : उत्तराखंड स्वरोजगार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय हवी ?
उत्तर : या Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 योजनेत अर्ज करण्यासाठी उत्तराखंड सरकारने कोणतीही शैक्षणिक पात्रतेची अट ठेवलेली नाहीये. तुमचं कितीही शिक्षण झालेला असो तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
एकूणचं उत्तराखंड सरकारने सुरू केलेली ही योजना Uttarakhand Swaraojgar Yojana 2024 खूपचं उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. राज्यातील तरुणांना रोजगार मिळवून देणे हे प्रत्येक सरकारचं कर्तव्य असतं. त्यात प्रत्येकाला नोकरी मिळवून देणे हे काही शक्य नाहीये. कारण आपल्या देशात तरुणांची संख्या खूप मोठी आहे. त्यामानाने नोकऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे तरुणांना स्वरोजगार मिळवण्यासाठी प्रोत्साहन देणं सरकारचं कर्तव्य असतं. कारण आज हे स्वरोजगार मिळवलेले तरुण उद्या अनेक दुसऱ्या तरुणांनाही नोकरी देऊ शकतात.
तुमच्या मनात उत्तराखंड स्वरोजगार योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि सरकारी योजनाबद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !