Unwanted Call On Whatsapp हे सध्या आपल्या सर्वांच्याचं मोबाईलवर सर्वात जास्त वापरलं जाणारे ॲप्लिकेशन आहे. व्हाट्सअपचा वापर हा फक्त एकमेकांना मेसेजेस पाठवण्यासाठी होत नाही, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करण्यासाठी, स्टेटस ठेवण्यासाठी, कम्युनिटी ग्रुप तयार करण्यासाठी आणि अगदी पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठीसुद्धा आजकाल व्हाट्सअपचा वापर होतोय.
परंतु मागील काही दिवसांपासून व्हाट्सअप वापरणाऱ्या लोकांची डोकेदुखी वाढली आहे आणि त्याचं कारण म्हणजे विदेशातून येणारे व्हाट्सअप कॉल आणि मेसेजेस (Unwanted Call On Whatsapp). अनेकांना हा अनुभव आला असेल की, अननोन नंबरवरून व्हाट्सअपवर कॉल येत आहेत किंवा whatsapp हे स्वतः तुम्हाला मेसेज पाठवत आहे की, जर तुम्हाला विदेशातील एखाद्या नंबरवरून कॉल आला, तर तो कॉल उचलू नका आणि त्याबद्दल लगेचचं व्हाट्सअपला कळवा.
Unwanted Call On Whatsapp
व्हाट्सअपवर येणारे विदेशातील कॉल्स फसवे असतात. यातून तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते किंवा दुसरी एखादी डोकेदुखीही वाढू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला विदेशातून येणाऱ्या या फसव्या व्हाट्सअप कॉलपासून बचाव कसा करायचा, त्याबद्दल पाच उपाय सांगणार आहोत.
या पाच उपायांमुळे होईल विदेशातून येणाऱ्या फसव्या व्हाट्सअप कॉलचा खात्मा
१) माहिती नसलेल्या नंबरवरील कॉल उचलू नका : जर तुम्हालाही एखाद्या अननोन नंबरवरून व्हाट्सअप कॉल आला असेल, तर हा (Unwanted Call On Whatsapp) कॉल कधीही उचलू नका. हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे, अशा फ्रॉडपासून वाचण्यासाठी.
२) नंबर ब्लॉक करा : कधी कधी तुम्ही अननोननंबर वरून आलेले फोन कॉल उचलत नाही. परंतु या नंबरवरून पुन्हा पुन्हा कॉल येत असतात. अशावेळेस या नंबरला ब्लॉक करणे हा एक प्रभावी उपाय आहे. म्हणजे त्यावरून पुन्हा तुम्हाला कधीही फोन येणार नाही.
३) असे नंबर रिपोर्ट करा : व्हाट्सअपमध्ये ब्लॉक बरोबरचं रिपोर्ट हासुद्धा ऑप्शन असतो. हे ऑप्शन वापरल्याने व्हाट्सअपला (Unwanted Call On Whatsapp) तुमची तक्रार समजेल आणि व्हाट्सअप अशा नंबरवर कारवाई करू शकेल आणि हा त्रास लवकरचं कमी होईल.
आता चुकलेला व्हाट्सएप मेसेज एडिट करा
४) टू स्टेप वेरिफिकेशन ऑन करा : कोणत्याही फसवणुकीपासून वाचण्यासाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन हा सर्वात प्रभावी उपाय आहे. ज्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये लॉगिन करताना तुम्हाला एक पासवर्ड विचारला जाईल आणि तुमच्या अकाउंटवर कोणताही फसवा व्यक्ती लॉगिन करू शकणार नाही.
५) प्रलोभनापासून दूर राहा : व्हाट्सअप असो किंवा कोणतही ऑनलाइन एप्लीकेशन समोरच्या व्यक्तीला फसवण्यासाठी त्याला पैशांचं आमिष दाखवलं जातं की, तुम्हाला इतकं बक्षीस दिलं जाईल, ही वस्तु मिळेल. त्यामुळे अनेक लोक या फसव्या लोकांच्या ट्रॅपमध्ये फसतात. त्यामुळे असा कोणताही पैसे मिळण्याचा मेसेज तुम्हाला आला असेल, तर त्याला रिप्लाय करू नका. हा नंबर ब्लॉक करून लगेचं रिपोर्ट करा.
एकूणच सध्याच्या ऑनलाईन जगामध्ये आपण जास्तीत जास्त जागरूक राहायला हवं, नाहीतर या ॲप्लिकेशनच्या फायद्यांपेक्षा तोटेचं जास्त आहेत.
हा Unwanted Call On Whatsapp लेख फायदेशीर वाटला असल्यास नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !