Ujjwal Nikam : भाजपचे उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील लोकसभा उमेदवार उज्वल निकम कोण आहेत ?

Ujjwal Nikam News

Ujjwal Nikam हे नाव जरी घेतलं, तर आठवतात एखाद्या चित्रपटातील वकिलालाही लाजवतील असे डॅशिंग वकील. ज्यांनी आपल्या देशासाठी सरकारी वकील म्हणून अनेक केसेस लढवल्या आहेत आणि देशद्रोही गुन्हेगारांना फासावर लटकवलंय.

Ujjwal Nikam

सध्या उज्वल निकम चर्चेत आहेत त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यामुळे. भाजपने त्यांना उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. आज आपण त्यांच्याबद्दल सगळी माहिती जाणून घेऊया.

Ujjwal Nikam सध्या 71 वर्षांचे आहेत. 30 मार्च 1953 रोजी महाराष्ट्रातील जळगाव मध्ये त्यांचा जन्म झाला. जळगावातील S S Maniyar Law कॉलेजमधून त्यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आणि जळगावातील जिल्हा कोर्टात सरकारी वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

भाजपचे लोकसभा उमेदवार उज्वल निकम

परंतु त्यांच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली 1993 मध्ये. जेव्हा सरकारने 1993 बॉम्बस्फोट खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती केली. तेव्हाचे अनेक ज्येष्ठ वकील सांगतात की, ह्या खटल्यात त्यांनी वन मॅन आर्मी म्हणून सगळी सूत्र हलवली. या खटल्यानंतरचं त्यांचा जळगाव ते मुंबई हा प्रवास सुरू झाला.

या केसनंतर त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून अनेक खटले लढले आणि दोषींना शिक्षा मिळवून देण्यास मदत केली. 2016 मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

तारक मेहता फेम गुरुचरण सिंग बेपत्ता

Ujjwal Nikam यांच्या आयुष्यावर लवकरचं एक बॉलीवूड चित्रपट सुद्धा येणार आहे. परंतु त्याआधी आता ते लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा विजय होईल की नाही, हे तर 4 जूनला मतमोजणीच्या दिवशीचं कळेल.

उज्वल निकम लोकसभा निवडणूक जिंकणार का

उत्तर मध्य मुंबई मतदार संघातून त्यांची लढाई काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याशी असेल. मागील दोन निवडणुकीत भाजपच्या पूनम महाजन यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. परंतु आता त्यांना तिकीट न देता भाजपने उज्वल निकम यांना संधी दिली आहे आणि हे सर्वांसाठी सरप्राईज आहे.

उज्वल निकम (Ujjwal Nikam) राजकारणात येतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु याबद्दल त्यांना जेव्हा विचारलं, तेव्हा त्यांनी नकार दिला होता. परंतु आता त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे आणि ते निवडणूक लढवत आहेत.

अशाचं नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top