TVS iQube सध्या इलेक्ट्रिक टू व्हीलर लचा मार्केटमध्ये बोलबाला आहे. अनेकजण इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदी करत आहेत. परंतु या गाड्यांबरोबर सर्वात मोठी समस्या असते बॅटरीची आणि खऱ्या आयुष्यातील रेंजची. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये जेवढी मोठी बॅटरी तेवढीचं त्याची जास्त रेंज.
आता टीव्हीएसने सुद्धा अशी एक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केलीये, जिथे तुम्हाला चक्क 150 किलोमीटरची रेंज मिळेल. मग कोणती आहे ही इलेक्ट्रिक बाइक आज आपण त्याबद्दलचं जाणून घेऊया.
TVS iQube
TVS iQube या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल तुम्हाला सर्वांनाचं माहीत असेल. मार्केटमधील ही खूप पॉप्युलर इलेक्ट्रिक बाईक आहे. पण आता टीव्हीएसने या बाईकचं एक बेस वेरीएंट् आणि टॉप वेरीएंट् लॉन्च केलंय.
टीव्हीएसने TVS iQube Standard हे बेस वेरीएंट् 2.2 kWh या बॅटरी कॅपॅसिटीमध्ये लाँच केलंय. ज्याची किंमत 94 हजार 999 रुपये आहे. तसंच रियल वर्ल्डमध्ये ही गाडी 75 किलोमीटरची रेंज येते आणि टॉप स्पीड सुद्धा 75 किलोमीटरचा आहे.
तसंच टीव्हीएसने iQube चं नवीन टॉप वेरीएंट् सुद्धा लॉन्च केलंय. जिथे तुम्हाला 5 kWh बॅटरी पॅक मिळतं आणि रियल वर्ल्डमध्ये या बॅटरी पॅक बरोबर तुम्हाला 150 किलोमीटरची रेंज मिळते. या वेरीएंट्ची किंमत 1 लाख 85 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.
150 किलोमीटरची रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कुटर
फक्त हे दोन व्हेरियंटचं नाही, तर टीव्हीएसने एकूण 5 व्हेरियंट मार्केटमध्ये आहेत. जेथे तुम्हाला वेगवेगळ्या बॅटरी पॅक आणि रेंज मिळतील त्यानुसार किंमत कमी जास्त होते.
काही महिन्यांपूर्वी सरकारने नवीन धोरणानुसार इलेक्ट्रिक बाइकवर मिळणारी सबसिडी कमी केली होती. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या गाड्यांचे बेस व्हेरियंट लॉन्च केलेत. ज्यांची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
परंतु तरीही जर तुम्हाला अशी इलेक्ट्रिक बाइक हवी असेल, ज्याची रेंज 100 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. तर तुम्हाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करावेचं लागतील, एवढं मात्र नक्की.
तर तुम्ही इलेक्ट्रिक बाइक खरेदी कराल की पेट्रोल ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !