प्रसिद्ध मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप. तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी खूपचं दुःखद बातमी समोर येतेय. या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचं शूटिंग झालंय आणि आता लवकरचं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत आणि असं कॅप्शन दिले की, काही मालिका प्रसिद्धी देतात आणि काही satishfaction देतात. तुझेचं मी गीत गात आहे, या मालिकेने दोन्हीही दिलं.
प्रसिद्ध मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
तिच्या या पोस्टनंतर सगळेच फॅन्स खूप इमोशनल झाले आहेत. मागील 2 वर्षांपासून तुझेच मी गीत गात आहे या मालिकेने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलंय. स्वरा, मल्हार, पिहू या सगळ्याचं कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
अभिजीत खांडकेकर, प्रिया मराठे, उर्मिला कोठारे आणि तेजस्विनी लोणारी यांसारख्या कलाकारांनी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. पण प्रत्येक गोष्टीचा अंत असतो, तसंच या मालिकेची कथाही आता संपली आहे आणि मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
मालिकेचा शेवटचा भाग 16 जून रोजी दाखवण्यात येईल. तुझेचं मी गीत गात आहे, ऐवजी आता शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे यांची मुख्य भूमिका असलेली थोडं तुझं थोडं माझं ही मालिका घेणार आहे. 17 जून पासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता ही मालिका दाखवण्यात येईल.
बऱ्याच कालावधीनंतर शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे हे दोघे टेलिव्हिजनवर कमबॅक करताय. त्यामुळे ही नवीन मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. एकीकडे थोडा आनंद तर थोडं दुःख अशीच त्यांची अवस्था झाली आहे. तुझेचं मी गीत आहे बंद होणार आहे, तर थोडं तुझं थोडं माझं ही मालिका सुरू होणार आहे.
आता पुन्हा अभिजीत खांडकेकर, उर्मिला कोठारे, प्रिया मराठे आणि तेजस्विनी लोणारी यांसारख्या कलाकारांना कधी पाहता येईल, याबद्दलच प्रेक्षक विचार करताय.
या प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मुरांबा मालिका
फक्त तेजस्विनी लोणारीचं नाही तर येत्या काही दिवसात अभिजीत खांडकेकर, उर्मिला कोठारे यांसारख्या कलाकाराकडून सुद्धा मालिकेच्या शेवटच्या दिवसाबद्दल पोस्ट शेअर करण्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
तर तुम्ही तुझेचं मी गीत जात आहे या मालिकेला मिस करणार का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन अपडेटसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !