Tu Bhetshi Navyane Serial Cast तू भेटशी नव्याने मालिकेचे कलाकार

Tu Bhetshi Navyane Serial Cast 

Tu Bhetshi Navyane Serial Cast नुकतीच सोनी मराठी वाहिनीवर ‘तू भेटशी नव्याने’ ही नवीन मालिका सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. या मालिकेचा पहिला प्रोमो हा सोनी मराठी चॅनलने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मालिकेचा प्रोमो खूपच जबरदस्त आहे.

प्रोमोवरून कळतंय की ही मालिका कॉलेज जीवनावर आधारित असणार आहे. पहिल्या प्रोमोमध्ये मालिकेतील पात्रांची ओळख (Tu Bhetshi Navyane Serial Cast) करून देण्यात आलीय. मालिकेची नायिका माहीची डायरी वाचत असते तेव्हा कॉलेजचे प्रोफेसर अभिमन्यू सरांची एन्ट्री होते. त्यांना संपूर्ण कॉलेज घाबरतं. कॉलेजमध्ये त्यांचा खूप दरारा आहे. तर ती डायरी 25 वर्षांपूर्वी त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या माहीची असते. प्रोमोसोबत कॅप्शन दिलं गेलंय की, नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची! कारण ‘जगायला श्वासाची नाही तर, प्रेमाची गरज असते.’ 

Tu Bhetshi Navyane Serial Cast 
Tu Bhetshi Navyane Serial Cast 

Tu Bhetshi Navyane Serial Cast 

अभिनेता सुबोध भावे हा या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तो या मालिकेत दोन भूमिकांमध्ये दिसणार आहे. कॉलेजचे प्रोफेसर अभिमन्यू सर आणि 25 वर्षांपूर्वी त्याच कॉलेजमध्ये शिकणारा माही या दोन भूमिका तो साकारणार आहे.

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार (Tu Bhetshi Navyane Serial Cast) दिसणार आहेत हे आपण जाणून घेऊया.

1. सुबोध भावे – सुबोधने या मालिकेत दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. तो अभिमन्यू सर आणि माही या दोन्ही भूमिकांमध्ये दिसणार आहे.

Subodh Bhave New Serial Tu Bhetshi Navyane
Subodh Bhave New Serial Tu Bhetshi Navyane

2. शिवानी सोनार – शिवानी या मालिकेत कॉलेज तरुणीची भूमिका साकारताना दिसेल. ती मालिकेची नायिका आहे. राजा राणीची गं जोडी मालिकेमुळे ती खूप लोकप्रिय झाली.

Shivani Sonar
Shivani Sonar

या मालिकेत अजून कोणकोणते कलाकार दिसणार आहेत ते लवकरच कळेल.

या मालिकेत अभिनेता सुबोध भावे हा विशीतल्या कॉलेज तरुणाच्या भूमिकेतसुद्धा दिसेल. 25 वर्षांपूर्वीच्या सुबोधचं पात्र हे AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने साकारण्यात येणार आहे. AI च्या मदतीने तरुण वयातील सुबोध दाखवला जाणार आहे. एखाद्या मालिकेत पहिल्यांदाच AI टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. यामुळे प्रेक्षकांमध्ये या मालिकेसाठी खूप उत्सुकता आहे.

कलर्स मराठीची ही प्रसिद्ध मालिका बंद होणार

मराठी मालिकेत पहिल्यांदाचं वापरली जाणारी AI टेक्नॉलॉजी

अभिनेता सुबोध भावेसोबत पहिल्यांदाच अभिनेत्री शिवानी सोनार पडदयावर दिसणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना या दोघांची फेश जोडीसुद्धा खूप आवडली आहे. मालिकेची आगळीवेगळी कथा आणि त्याचबरोबर प्रमुख कलाकारांची नवीन जोडी ही या मालिकेची जमेची बाजू आहे.

मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार आहेत आणि ही मालिका कधी सुरु होणार ही सर्व माहिती लवकरच समोर येईल. प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट पाहताय.

मनोरंजनविश्वातील अशीच महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top