Top 5 Selling SUV In India भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या SUV

Top 5 Selling SUV In India

Top 5 Selling SUV In India चारचाकी विकत घेणं हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असतं. मग कोणती गाडी विकत घ्यायची हा प्रश्न समोर येतो. म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी एप्रिल 2024 मध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या गाड्यांची लिस्ट घेऊन आलो आहोत.

म्हणजेचं जी गाडी सर्वात जास्त विकली जाते, जी सर्वात जास्त पॉप्युलर आहे, ती चांगली असेलचचं याच शंका नाही. मग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या लिस्टमधील एक गाडी निवडू शकता. तर सर्वात आधी पाहूया भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या टॉप फाईव्ह गाड्यांची लिस्ट (Top 5 Selling SUV In India).

Top 5 Selling SUV In India

1) या लिस्टमध्ये पहिला नंबर लागतो टाटा पंच या एसयूव्हीचा. टाटा पंच एप्रिल 2024 मध्ये तब्बल 19158 लोकांनी विकत घेतली आणि सर्वाधिक विकली जाणारी गाडी बनली. लॉंच झाल्यापासूनचं टाटाची ही छोटी एसयुव्ही सर्वांच्या आवडती बनली आहे आणि लोक एकानंतर एक ही गाडी खरेदी करताय. तुम्ही सुद्धा या गाडीचा विचार नक्कीचं करू शकता.

Top 5 Most Selling SUV Cars In India
Tata Punch

2) या लिस्टमध्ये दुसरा नंबर लागतो मारुती ब्रेझाचा. एप्रिल 2024 मध्ये तब्बल 17,113 लोकांनी ही गाडी विकत घेतली. तुमचाही मारुती सुझुकीवर विश्वास असेल, तर हा ऑप्शन तुमच्यासाठी योग्य आहे यात शंका नाही.

Maruti Brezza
Top 5 Most Selling SUV Cars In India

3) या लिस्टमध्ये तिसरा नंबर लागतो ह्युंदाई क्रेटा या प्रसिद्ध एसयूव्हीचा. एप्रिल 2024 मध्ये 15447 लोकांनी ही गाडी विकत घेतली. एसयूव्ही म्हटलं की हुंडाई क्रेटा हे समीकरण लोकांच्या डोक्यात घट्ट बसलंय.

Hyudai Creta
Top 5 Most Selling SUV Cars In India

भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या EV कार

4) या लिस्टमध्ये चौथा नंबर आहे महिंद्रा स्कॉर्पिओचा. ही धासू एसयूव्ही आपल्या सर्वांनाचं आवडते. एप्रिल 2024 मध्ये तब्बल 14,187 लोकांनी महिंद्रा स्कॉर्पिओ विकत घेतली. जर तुम्हाला मस्क्युलर्स लुक असणारी गाडी हवी असेल, तर महिंद्रा स्कॉर्पिओ तुमच्यासाठी बेस्ट आहे, यात शंका नाही.

Top 5 Most Selling SUV Cars In India
Mahindra Scorpio

5) पाचवा आणि शेवटचा नंबर या लिस्टमध्ये आहे मारुती फ्रॉक्स या एसयुव्हीचा. 14,286 युनिटची विक्री करत या लिस्टमध्ये ही कार पाचव्या नंबर वर आहे. म्हणजेचं या लिस्टमध्ये मारुती सुझुकीच्या दोन दोन गाड्या आहेत.

Top 5 Most Selling SUV Cars In India
Top 5 Most Selling SUV Cars In India

तर यापैकी (Top 5 Selling SUV In India) तुम्हाला कोणती गाडी आवडते ? तुम्ही कोणती गाडी घेण्याचा विचार करताय ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top