Top 10 Selling Cars In India : या आहेत भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या टॉप 10 गाड्या

Top 10 Selling Cars In India

Top 10 Selling Cars In India चार चाकी गाडी घेणं हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. परंतु कोणती गाडी घ्यावी हा प्रश्न सगळ्यांच्याचं मनाला भेडसावत असतो. अशावेळेस जी गाडी सर्वात जास्त विकली जाते, त्यावर लोकांचा विश्वास बसलेला असतो. तीच गाडी आपण घ्यायला हवी, असाही काही जण विचार करतात.

म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी मागील महिन्यात म्हणजेचं मार्च 2024 मध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या दहा गाड्यांची लिस्ट Top 10 Selling Cars In India घेऊन आलो आहोत, तर चला पाहूया.

Top 10 Selling Cars In India

1) टाटा पंच : मागील महिन्यात म्हणजेचं मार्च 2024 मध्ये ही गाडी सर्वात जास्त विकली जाणारी गाडी आहे. टाटा पंच 17,543 जणांनी मागील महिन्यात विकत घेतली.

2) ह्युंदाई क्रेटा : या लिस्टमध्ये दुसरा नंबर लागतो ह्युंदाई क्रेटा या एसयुव्हीचा. तब्बल 16,458 लोकांनी ही गाडी मागील महिन्यात आपल्या घरी आणली.

3) मारुती सुझुकी वॅगन आर : नेहमी टॉपला असलेली मारुती सुझुकी वॅगन आर यावेळेस मात्र तिसऱ्या नंबरवर आहे. मागील महिन्यात 16,368 लोकांनी ही गाडी विकत घेतली.

4) मारुती सुझुकी डिजायर : मागील अनेक वर्षांपासून भारतीयांची आवडती असलेली सीडान म्हणजेच मारुती सुझुकी डिझायर या लिस्टमध्ये चौथ्या नंबरवर आहे आणि मागील महिन्यात 15,894 लोकांनी ही गाडी विकत घेतली.

5) मारुती सुझुकी स्विफ्ट : तब्बल वीस वर्षांपासून भारतीयांच्या मनावर राज्य गाजवत असलेली मारुती सुझुकी स्वीट या लिस्टमध्ये पाचव्या नंबर आहे आणि मागील महिन्यात 15,728 लोकांनी ही गाडी विकत घेतली.

सावत्र आई वाईट असते का ?

6) मारुती सुझुकी बलेनो : मारुतीची ही गाडी या लिस्टमध्ये सहाव्या नंबर असून मागील महिन्यात तब्बल 15,588 लोकांनी ही गाडी विकत घेतली.

7) महिंद्रा स्कॉर्पिओ : भारतात एसयूव्ही म्हटलं की, स्कॉर्पिओ ही एकमेव गाडी नजरेसमोर उभी राहते. ही गाडी या लिस्टमध्ये सातव्या नंबरवर असून मागील महिन्यात 15,151 गाड्यांची विक्री करण्यात आली.

8) मारुती सुझुकी अर्टिगा : भारतीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय असलेली मारुतीची ही गाडी या लिस्टमध्ये 8 व्या नंबरवर असून 14,888 लोकांनी ही गाडी मागील महिन्यात विकत घेतली.

9) मारुती सुझुकी ब्रेझ्झा : मारुतीची ही गाडी या लिस्टमध्ये नवव्या नंबर असून मागील एका महिन्यात 14,614 गाड्यांची विक्री करण्यात आली.

10) टाटा नेक्सन : या लिस्टची सुरुवात टाटाच्या पंच या गाडीने झाली होती आणि आता शेवटही टाटा नेक्सॉनने होतोय. ही गाडी या लिस्टमध्ये दहाव्या नंबरवर असून मागील महिन्यात 14,058 गाडींची विक्री करण्यात आली.

तर Top 10 Selling Cars In India यापैकी तुम्हाला कोणती गाडी आवडते आणि तुम्ही कोणती गाडी खरेदी करण्याचा विचार करताय ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top