Top 10 Honeymoon Destinations In Maharashtra सध्या सगळीकडेचं लगीनसराई सुरू आहे. तसं पाहायला गेलं, तर आपल्या देशात वर्षभर लग्न होतचं असतात. देशात तरुणांची संख्या सर्वात जास्त आहे, त्यामुळे लग्नाचा तुटवडा कधीही होणार नाही, यात शंका नाही.
घरात जर लग्न असेल, तर घरातील मोठी माणसं लग्न कसं सुरळीतपणे पार पडेल, याकडे लक्ष देत असतात. परंतु ज्यांचं लग्न आहे, त्यांच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार सुरू असतो आणि तो म्हणजे हनिमूनचा. लग्न झाल्यानंतर हनिमूनला कुठे जायचं ? हा प्रश्न सर्वांनाचं भेडसावत असतो.
हनिमूनसाठी Top 10 Honeymoon Destinations In Maharashtra काही लोक राज्यात फिरतात, काही देशात तर काही विदेशातही जातात. पण जर तुम्हाला कमी वेळेत आणि कमी पैशांत हनिमून साजरा करायचा असल्यास तर आपल्या महाराष्ट्रातसुद्धा असे अनेक ठिकाण आहेत, जेथे तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील असा हनिमून साजरा करता येऊ शकतो.
म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रातील टॉप 10 हनिमून डेस्टिनेशन (Top 10 Honeymoon Destinations In Maharashtra) घेऊन आलो आहोत. जेथे तुम्हाला तुमचा हनिमून साजरा करता येईल.
Top 10 Honeymoon Destinations In Maharashtra
१) महाबळेश्वर : यामध्ये कोणतीही शंका नाहीये की, महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि गजबजलेलं हनिमून डेस्टिनेशन आहे. महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण असून फक्त हनिमून कपल्स नाही, तर सामान्य माणसंही कुटुंबाबरोबर येथे फिरायला येतात.
पुणे जिल्ह्यात असलेल्या महाबळेश्वरला जर तुम्ही हनिमून डेस्टिनेशन म्हणून निवडलं, तर तुम्ही रेल्वेने, विमानाने किंवा बसने आधी पुण्याला येऊ शकता आणि मग तेथून महाबळेश्वरला जाणं सोपं आहे.
महाबळेश्वरमध्ये पाहण्यासारखे अनेक नयनरम्य ठिकाण आहेत, जशी की एल्फिन्स्टंट पॉईंट, विल्सन पॉईंट, वेण्णा लेक, प्रतापगड किल्ला, सनसेट पॉईंट, श्री महाबळेश्वर महादेव मंदिर आणि मॅप्रो गार्डन.
एकूणच एक प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे येथे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये राहण्याचे आणि खाण्या पिण्याचे खूप सारे ऑप्शन्स मिळू शकतात.
उन्हाळ्याच्या सुट्टीत महाराष्ट्रात या ठिकाणी फिरायला जा
एकूणचं महाबळेश्वर आमच्या महाराष्ट्रातील टॉप 10 हनिमून डेस्टिनेशन च्या लिस्टमध्ये पहिल्या नंबरला आहे.
२) लोणावळा : कुठं कुठं जायचं हनिमूनला या गाण्यामध्ये लोणावळा पहिल्या नंबरवर येतं,परंतु आमच्या लिस्टमध्ये लोणावळा आहे दुसऱ्या नंबरवर. महाबळेश्वर प्रमाणेचं महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण लोणावळा पुणे जिल्ह्यातचं आहे.
Top 10 Honeymoon Destinations In Maharashtra जशी लोणावळ्याची चिक्की संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. तसंच लोणावळा एक हनिमून डेस्टिनेशन म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे.
लोणावळ्यात पाहण्यासारखी अनेक ठिकाण आहेत. जसे की भुशी डॅम, आई एकविरा देवी मंदिर, कारल्याची लेणी, विसापूरचा किल्ला, लोहगड किल्ला, इमॅजिका अम्युजमेंट पार्क आणि लोणावळा तलाव.
प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे येथे तुम्हाला राहण्यासाठीचे अनेक ऑप्शन्स मिळतील.
३) कोंकण : कोंकणपेक्षा सुंदर संपूर्ण महाराष्ट्रात दुसरं काहीही नाही आणि जर तुम्ही हनिमूनसाठी आयुष्यभर लक्षात राहील, अशा एखाद्या जागेचा शोध घेत असाल, तर कोंकण तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तसं तर कोंकणात अशी अनेक ठिकाण आहेत, जेथे तुमचा संपूर्ण हनिमून साजरा होऊ शकतो. परंतु अनेक ठिकाणांना तुम्ही धावती भेटही देऊ शकतात.
कोकणातील अनेक नयनरम्य ठिकाणांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दापोडी, दिवेगार, अलिबाग, गणपतीपुळे, हरणाई, महाड, मालवण, कलेशी प्रसिद्ध आहेत.
जर तुम्हाला समुद्रकिनारा हवा आहे, परंतु गोव्यासारखी गर्दी नकोय. शांत समुद्रकिनारा हवा आहे. त्यांच्यासाठी कोकणातीलं समुद्रकिनारे एक आयडियल जागा आहे.
४) माथेरान : महाबळेश्वर आणि लोणावळानंतर नंबर लागतो, महाराष्ट्रातील माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाचा. हनिमूनसाठी अतिशय सुंदर आणि नयनरम्य अशा जागेचा शोध घेत असाल, तर माथेरान तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
या ठिकाणी पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, जसे की सनसेट पॉईंट, पॅनरोमा पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट, एको पॉइंट, विक्रमगड किल्ला आणि चार लोटे तलाव.
Top 10 Honeymoon Destinations In Maharashtra माथेरानची टॉय ट्रेनसुद्धा आयुष्यात एकदा घेण्यासारखा अनुभव आहे.
येथे तुम्हाला राहण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी अनेक चांगल्या सुविधा मिळतील.
५) म्हैसमाळ : जर तुम्ही मराठवाड्यात राहता असाल आणि तुम्हाला जवळपासचं एखादं हनिमून डेस्टिनेशन हवं असेल, तर म्हैसमाळ हे तुमच्यासाठी हॉट हनिमून डेस्टिनेशन असू शकतं.
म्हैसमाळला मराठवाड्याचं महाबळेश्वरही म्हटलं जातं. थंड आणि अल्हादायक वातावरण हे म्हैसमाळचं वैशिष्ट्य आहे.
म्हैसमाळच्या आसपास पाहण्यासारखी ठिकाण आहेत, घृष्णेश्वर महादेवा मंदिर, वेरूळची लेणी आणि देवगिरी किल्ला.
Top 10 Honeymoon Destinations In Maharashtra राहण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी तुम्हाला अनेक चांगल्या सुविधा येथे मिळतील.
महाराष्ट्रातील टॉप 10 हनिमून डेस्टिनेशन
६) इगतपुरी : तुम्ही नाशिक जिल्ह्याच्या आसपास एखादं हनिमून डेस्टिनेशन शोधत असाल, तर इगतपुरी तुमच्यासाठी परफेक्ट हनिमून डेस्टिनेशन आहे.
पावसाळ्यात इगतपुरीचं वातावरण स्वर्गसुखदायक असतं. त्याचबरोबर येथे खूप सारे रिसॉर्टसुद्धा आहेत. जिथे तुम्हाला पर्यटनाबरोबरच आराम आणि हनिमूनसाठी खूप साऱ्या सुविधा मिळू शकतात.
त्याचबरोबर तुम्ही नाशिकच्या आसपास असलेले विविध पर्यटन स्थळसुद्धा एक्सप्लोर करू शकता.
७) भंडारदरा : नगर जिल्ह्यातील भंडारदरा हे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. भंडारदरा धरण आणि तेथील निसर्ग सौंदर्य आयुष्यात एकदा पाहायलाचं हवं आणि तुमच्यासाठी ही एक हॉट हनिमून डेस्टिनेशन होऊ शकते.
Top 10 Honeymoon Destinations In Maharashtra सध्या येथे खूप सारे होम स्टेज आणि रिसॉर्टसुद्धा ओपन झालेले आहेत. जेथे तुम्हाला सर्व सोयी सुविधा मिळू शकतात.
भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे येथील काही नयनरम्य देखावे दाखवणारे पॉईंट्स आहेत.
८) खंडाळा : कुठे कुठे जायचं हनिमूनला या गाण्यात लोणावळ्यानंतर खंडाळ्याचाही उल्लेख आहे. कारण खंडाळा आहेचं तितकं निसर्गरम्य.
हॉट हनिमून डेस्टिनेशन म्हणून तुम्ही खंडाळ्याचीही निवड करू शकतात. येथे असे अनेक निसर्गरम्य आणि नयनरम्य पॉईंट्स आहेत, जे शहरी जीवनापासून तुम्हाला विसावा देतील.
राजमाची किल्ला, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला आणि बेडसे लेणी अशा अनेक ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता.
९) मुंबई : आयुष्यात एकदा तरी जीवाची मुंबई करण्याचं स्वप्न प्रत्येकानेचं पाहिलेलं असतं. प्रत्येकाला मुंबई पाहण्याची इच्छा असते आणि हॉट हनिमून डेस्टिनेशन म्हणून तुम्ही मुंबईचासुद्धा विचार करू शकतात.
Top 10 Honeymoon Destinations In Maharashtra मुंबईमध्ये राहण्यासाठी आणि खाण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला येथे अनेक ऑप्शन्स मिळतील.
फिरण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी एक्सप्लोर करू शकतात जसे की, सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, गिरगाव चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, बँड स्टँड, मड आयलँड आणि मुंबईची प्रसिद्ध फिल्म सिटी. त्याचबरोबर तुम्ही अनेक प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांची घरही पाहू शकतात अर्थातचं बाहेरून.
१०) पुणे : पुणे हे सुद्धा एक हॉट हनिमून डेस्टिनेशन म्हणून तुमच्यासाठी योग्य असू शकत.
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी आहे.
पुणे शहर आणि पुणे शहराच्या आसपास असे अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत, जी तुम्ही पाहू शकतात. त्याचबरोबर शॉपिंग आणि खवय्यांसाठी सुद्धा पुण्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत.
Top 10 Honeymoon Destinations In Maharashtra येथे तुम्हाला राहण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही हेही नक्की.
महाराष्ट्रात हनिमूनसाठी आमच्या मते हे आहेत, टॉप 10 हॉट हनिमून डेस्टिनेशन्स. (Top 10 Honeymoon Destinations In Maharashtra) तुम्हालाही असचं एखाद स्थळ माहित असेल, तर नक्कीच कमेंट करुन सांगा आणि ही माहिती फायदेशीर वाटल्यास, आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !