प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला झाला गंभीर आजार. कृतिका गायकवाड ही मराठी चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने गैरी, टाईमपास 3 चित्रपटात आयटम सॉंग केलेत. यासोबतच बंदिशाळा, विठ्ठला शपथ, धुमस या चित्रपटात तिने अभिनयही केला आहे. ती सोशल मीडियावर चांगली ऍक्टिव्ह असते.
तिने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्याला गंभीर आजार झाल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केलाय. या आजारामुळे तिचं पोट फुगलेलं आहे पण ती गरोदर नाही. एका आजारामुळे तिचं पोट फुगलं आहे. काही दिवसांपूर्वी ती हॉस्पिटलमध्येही ऍडमिट झाली होती त्याचा फोटोही तिने शेअर केला होता.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला झाला गंभीर आजार
कृतिकाने आपल्या आजाराबद्दल सांगण्यासाठी या व्हिडिओसोबत एक पोस्टसुद्धा लिहली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहलंय की,
नाही मी गरोदर नाही, हे गर्भाशयाचे फायब्रॉइड्स आहेत जे वर्षानुवर्षे विकसित झाले आहेत. फायब्रॉईड म्हणजे गर्भाशयातील गाठ. ही गाठ म्हणजे कर्करोग नाही. फायब्रॉइड असलेल्या सर्व महिलांमध्ये ही लक्षणे नसतात. ज्या स्त्रियांना लक्षणे दिसतात त्यांना सहसा फायब्रॉइड्ससह जगणे कठीण वाटते. काहींना वेदना होतात आणि मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होतो. यातील काही वाढ डोळ्यांनी पाहण्यास खूपच लहान आहे. इतर द्राक्षाच्या आकारात किंवा त्याहून मोठ्या आकारात वाढू शकतात. एक फायब्रॉइड जो खूप मोठा होतो तो गर्भाशयाच्या आतील आणि बाहेरील भाग खराब करू शकतो. अनेक प्रकरणांमध्ये, काही फायब्रॉइड्स श्रोणि किंवा पोटाचे क्षेत्र भरण्याइतके मोठे होतात. यामुळे एखादी व्यक्ती गर्भवती दिसू शकते. कृपया सावध राहा महिलांनो, हे तुमच्या हाताबाहेर जाण्याआधीच डॉक्टरकडे जाऊन रेग्युलर चेकअप करत रहा.
अभिनेत्री कृतिका गायकवाडला झाला गंभीर आजार
कृतिकाने या आजाराबद्दल माहिती देऊन जनजागृती सुद्धा केली आहे. कृतिका या गंभीर आजाराचा सामना करतेय. तिच्यावर उपचारदेखील सुरू आहेत. तिने शेअर केलेल्या या पोस्टवर फॅन्स कमेंट करून ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थनासुद्धा करत आहेत.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !