Thoda Tujha Thoda Majha Today Episode Review. थोडं तुझं थोडं माझं ही मालिका नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झाली आहे. 17 जून 2024 रोजी रात्री 9 वाजता या मालिकेचा पहिला एपिसोड स्टार प्रवाह वाहिनीवर दाखवण्यात आला. अभिनेत्री शिवानी सुर्वेने या मालिकेतून पुन्हा एकदा टेलिव्हिजन विश्वात कमबॅक केलं आहे. त्यामुळे सगळेचं तिला पुन्हा पाहण्यासाठी खूप एक्साईटेड होते.
त्यातच मालिकेच्या प्रोमोने सुद्धा प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली होती. त्यामुळे कधी एकदा या मालिकेचा पहिला एपिसोड येतोय आणि आपण पाहतोय यासाठी उत्सुक होते आणि आता पहिला एपिसोड आल्यानंतर हा एपिसोड कसा आहे ? मालिकेने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या का नाही ? याबद्दल चर्चा होताना दिसतेत. तर मग आज आपणही जाणून घेऊया की थोडं तुझं थोडं माझं मालिकेचा पहिला एपिसोड कसा होता.
Thoda Tujha Thoda Majha Today Episode Review
पहिल्या प्रोमोत दाखवल्याप्रमाणेचं मालिकेची सुरुवात होते कॉलेजमधील स्टुडन्ट ऑफ द इयर च्या फंक्शनने. जेथे कॉलेजने माजी विद्यार्थ्यांनी गायत्रीला बोलवलेलं असतं चीफ गेस्ट म्हणून आणि यावर्षी कॉलेजची बेस्ट स्टुडन्ट कोण असेल त्याबद्दल कॉम्पिटिशन सुरू असते.
गायत्री स्वतःलाच बेस्ट समजते आणि दोन मुलींचा ती सणसणीत अपमान करते. परंतु त्यानंतर जेव्हा मानसी तिच्यासमोर येते. तेव्हा मात्र मानसी तिला तिच्याचं जाळ्यात अडकवते आणि बेस्ट स्टुडन्टची ट्रॉफी मिळवते. तेही गायत्रीपेक्षा चांगला स्कोर करून तिला हरवून.
हे काही गायत्रीला सहन होत नाही आणि ती तिथून रागारागाने निघून जाते. थोड्या वेळानंतर मालिकेचा हिरो तेजसबद्दलही पाहायला मिळतं. जेथे गायत्री त्याची वहिनी असते आणि तिला त्यांचा जुना वाडा विकायचा असतो. तेजस आणि त्याच्या कुटुंबाला हे मान्य नाहीये. परंतु गायत्री घरात सर्वात जास्त कमवत असल्यामुळे आणि घर चालवत असल्यामुळे तिच्यासमोर काही बोलण्याची कोणाची हिंमत नाही.
श्रेया बुगडे दिसणार या नवीन कार्यक्रमात
मालिकेचा पहिला एपिसोड तर खूपचं इंटरेस्टिंग वाटला. जेथे मानसी आणि तेजस या दोघांची कॅरेक्टर्स खूप छान आहेत. सहकलाकार ही चांगले आहेत. गायत्रीसारखी विलन मालिकेत असल्याने मालिकेत एकानंतर एक ट्विस्ट येतील असं दिसतंय.
एकूणचं थोडं तुझं थोडं माझं ही मालिका नक्कीचं स्टार प्रवाहच्या इतर मालिकांप्रमाणे प्रेक्षकांचं मन जिंकेल. टीआरपीमध्ये कमाल करेल, असं वाटतंय. तर तुम्हाला आवडला का मालिकेचा पहिला एपिसोड ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन अपडेटसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !