Thoda Tujha Thoda Majha Today मानसी पोहोचली तेजसच्या घरी

Thoda Tujha Thoda Majha Today

Thoda Tujha Thoda Majha Today थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा आजचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग झालाय. एकीकडे संपत रावांनी ठरवलं की, माझी मुलगी त्याच घरात लग्न करून जाईल, जिथे लक्ष्मी पाणी भरत असेल आणि त्यांनी मानसीच्या मामाच्या मुलाचं स्थळ नाकारलं. त्यामुळे मानसीची मामी खूप चिडली आणि तिने मानसीला श्राप दिला की, ती ज्या घरात लग्न करून जाईल, तिथे तिच्या डोळ्यातून पाणी येईल. यामुळे संपतराव आणखीनचं चिडले.

Thoda Tujha Thoda Majha Today

तर दुसरीकडे तेजस प्रयत्न करतोय की, काहीही करून गायत्रीला दोन लाख रुपये देऊन टाकायचे आणि तिचं तोंड बंद करायचं. त्यासाठी तो त्याच्या एका मित्राकडे पैसे उसने मागण्यासाठी आला. परंतु मित्राने त्यासाठी नकार दिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी गायत्री मॅडमची सर्टिफिकेट व सही घेण्यासाठी मानसी संपत रावांबरोबर मुंबईला आली आणि गायत्रीच्या घरी प्रभू निवासमध्ये पोहोचली. तेथे पोहोचल्यावर तिला समजलं, हे तर स्वातंत्र्यसैनिक दिनकर प्रभू यांचे घर आहे. मानसीला आपल्याबद्दल एवढी माहिती आहे, ती ऐकून तेजसच्या आई-बाबांना खूप आनंद झाला आणि त्यांना मानसी खूप छान मुलगी वाटली.

Thoda Tujha Thoda Majha Today
Thoda Tujha Thoda Majha Today

इकडे संपतराव दिनकरला भेटले. जे मानसीचे मामा आहेत आणि त्यांनी दिनकरची झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. परंतु दिनकर म्हणाला की, यात तुमची काही चूक नाही. मानसीला नक्कीचं चांगला मुलगा भेटेल, काळजी करू नका.

थोडं तुझं थोडं माझं मालिका पहिला एपिसोड रिव्ह्यू

त्यानंतर संपतराव त्याच गाडीच्या शोरूममध्ये गेले जेथे तेजस मित्राकडे पैसे मागायला आला होता. तेथे त्यांनी एका गाडीवर हात ठेवला, तर या शोरूमचा मालक त्यांना हात काढायला सांगतो. त्यामुळे संपतवांचा स्वाभिमान दुखावला जातो आणि ते चक्क तीस लाख रुपयांची गाडी कॅशने खरेदी करतात.

हे सगळं तेजस पाहतो आणि तो संपतरावांना दोन लाख रुपयांना लुटण्याचं ठरवतो. आता तेजस यांच्याकडून दोन लाख रुपये कसे उकळणार ते तर कळेलचं.

पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की, एकीकडे मानसी गायत्रीची सही घेण्यासाठी तिच्या ऑफिसमध्ये जाईल. परंतु गायत्री सही करण्यास नकार देईल. तर दुसरीकडे गायत्री तेजसच्या बाबांच्या औषधांचा खर्च देण्यास नकार देईल. मग आता पुढे काय होईल, हे जाणून घेण्यासाठी आमच्या अपडेट नक्की पहात रहा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top