Thoda Tujha Thoda Majha Serial Cast थोडं तुझं आणि थोडं माझं मालिका

Thoda Tujha Thoda Majha Serial Cast

Thoda Tujha Thoda Majha Serial Cast मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे ही पुन्हा एकदा एका जबरदस्त मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय. तिच्या नवीन मालिकेचं नाव आहे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’. ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे.

शिवानी सुर्वे या मालिकेत कॉलेज तरुणीची भूमिका साकारतेय. तिच्या व्यक्तिरेखेचं नाव मानसी असणार आहे. मानसी ही अत्यंत हुशार आणि स्वाभिमानी मुलगी आहे. ती आपल्या कॉलेजची टॉपर आहे.

Thoda Tujha Thoda Majha Serial Cast 

मानसी ही आपल्या कॉलेजच्या गायत्री मॅडमची खूप मोठी फॅन आहे. ती गायत्री मॅडमला आपलं आयडल मानते. गायत्री मॅडमच्या हुशारीपासून ती खूप प्रभावित आहे. मानसी आपल्या कॉलेजमध्ये टॉप करते आणि मग वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात गायत्री मॅडमच्या हातून तिला ट्रॉफी मिळणार असते. यावेळी गायत्री मॅडम मानसीला टास्क देते त्यातही ती त्यांना हरवते. मानसी गायत्री मॅडमच्या हातून ट्रॉफी घेते पण त्या दोघींमध्ये वाद पेटतो. गुरू शिष्याच्या नात्यावर आधारित मालिकेचा प्रोमो समोर आलाय.

आज आपण ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत कोणकोणते कलाकार (Thoda Tujha Thoda Majha Serial Cast) दिसणार आहेत ते पाहूया.

थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेची कास्ट –

1. शिवानी सुर्वे – शिवानी या मालिकेत मानसी सणस ही भूमिका साकारणार आहे. ती मालिकेची नायिका आहे आणि अतिशय हुशार, स्वाभिमानी आणि वडिलांचं नाव मोठं करणारी मुलगी आहे.

Shivani Surve In Thoda Tujha Thoda Majha

2. मानसी कुलकर्णी – ती या मालिकेत गायत्री मॅडमच्या भूमिकेत दिसेल. ती मानसीच्या कॉलेजमधील टीचर आहे.

मानसी कुलकर्णी
मानसी कुलकर्णी

मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार आहेत ही माहिती लवकरच समोर येईल.

या (Thoda Tujha Thoda Majha Serial Cast) मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे ही देवयानी मालिकेनंतर तब्बल 9 वर्षांनी एखाद्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला परत येतेय. तिची भूमिकासुद्धा चांगलीच ताकदीची दिसतेय. शिवानीचे फॅन्स तिला या नवीन भूमिकेत पाहून खूप खुश आहेत. तिच्यासमोर अभिनेत्री मानसी कुलकर्णीची भूमिकासुद्धा जबरदस्त आहे.

येड लागलं प्रेमाचं मालिकेतील कलाकार

Thoda Tujha Thoda Majha Serial Timing

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका (Thoda Tujha Thoda Majha Serial Cast) येत्या 17 जूनपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. प्रेक्षक या मालिकेची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत.

मनोरंजनविश्वातील अशीच महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top