स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच 2 नवीन मालिकांची घोषणा करण्यात आली. अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता विशाल निकम यांची ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका लवकरचं सुरू होणार आहे. यासोबतच अभिनेत्री शिवानी सुर्वेची ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवानी सुर्वे 9 वर्षांनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय.
या दोन्ही नवीन मालिका खूपच जबरदस्त दिसताय आणि प्रेक्षक या मालिकांची खूपच आतुरतेने वाट पाहताय. पण 2 नवीन मालिका सुरू होणार याचा अर्थ आधीपासून सुरू असलेल्या मालिका बंदसुद्धा होतील.
स्टार प्रवाह वाहिनीच्या 2 मालिका बंद होणार
अभिनेत्री शिवानी सुर्वेची मुख्य भूमिका असलेली ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका 17 जूनपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता स्टार प्रवाह प्रसारित केली जाणार आहे. आता रात्री 9 वाजता ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका दाखवण्यात येते. मग ही मालिका बंद होणार का असंच सर्वांना वाटतंय, पण या मालिकेची कथा अजून उरलेली आहे त्यामुळे या मालिकेऐवजी ‘अबोली’ नाहीतर ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका बंद होऊ शकते असा अंदाज आहे.
यासोबतच अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता विशाल निकम यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘येड लागलं प्रेमाचं‘ ही मालिका येत्या 27 मेपासून सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता दाखवली जाणार आहे. सध्या या वेळेत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सुरू आहे. पण सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका बंद होणार नसून ती रात्री 11 वाजता दाखवली जाणार आहे आणि ‘पिंकीचा विजय असो‘ ही मालिका चॅनलने बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
Pinkicha Vijay Aso To Go Off Air
आता लवकरच स्टार प्रवाह वाहिनीची ‘पिंकीचा विजय असो‘ आणि आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे हे नक्की. पण या बातमीमुळे या दोन्ही मालिकांचे फॅन्स खूपच नाराज होतील कारण त्यांना यापुढे आपली आवडती मालिका पाहता येणार नाही. पण आपण या दोन नवीन मालिकांचा आनंद नक्की घेऊ शकतो.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !