ठरलं तर मग आजचा भाग. ठरलं तर मग या मालिकेत दिवसेंदिवस जबरदस्त ट्विस्ट येत आहेत. आता कुठे अर्जुन आणि सायली यांचा महिपत, साक्षी आणि प्रिया यांच्यावर विजय होतोय, असं वाटत असतानाचं पुन्हा एकदा साक्षीने गेम फिरवला आहे.
साक्षीने चैतन्य आणि अर्जुनवर जे आरोप केलेत, त्यानंतर या दोघांविरोधात वातावरण तर निर्माण झालं. पण याच आरोपांचा फायदा घेऊन तिने कोर्टात हेही सिद्ध केलं की, दोघांनी साक्षी विरुद्ध खोटे पुरावे सादर केले होते आणि मग याचाच फायदा तिने महिपत विरुद्धच्या केसमध्येही मिळवलाय.
ठरलं तर मग आजचा भाग
नुकत्याचं झालेल्या भागामध्ये आपण पाहू की, महिपतची कोर्टात केस सुरू होईल. तेव्हा महिपतचा वकील सर्वांना सांगेल की, ज्याप्रकारे अर्जुन आणि चैतन्य या दोघांनी साक्षीच्या केसमध्ये खोटे पुरावे सादर केले, तसेच त्यांनी महिपत विरुद्ध सुद्धा खोटे पुरावे सादर केले असतील. त्यामुळे महिपतला जामीन देण्यात यावा.
कोर्टाने त्यांची ही गोष्ट ऐकून घेतली आणि चक्क महिपतला जामीन दिला आहे. त्यामुळे अर्जुन आणि सायलीला जबर धक्का बसलाय. आता महिपत आणि साक्षी हे दोघेही जेलबाहेर आहेत. त्यामुळे ते अर्जुन आणि सायलीसाठी अनेक अडचणी निर्माण करतील, एवढं मात्र नक्की.
मुक्ताने सागरला सगळ्यांसमोर केलं किस
त्यातचं कोर्टाने अर्जुन आणि चैतन्यविरुद्ध बार कौन्सिलची चौकशी बसवली आहे आणि अर्जुनने रागात बार कौन्सिलच्या एका वकिलाला जबरदस्त मारहाणसुद्धा केली. त्यामुळे सगळंच वातावरण अर्जुन आणि चैतन्यविरोधात जातंय. अर्जुन या घटनांमुळे पूर्णपणे खचून गेला आहे. त्याला खूप राग येतोय. तो सगळ्या चुकीच्या गोष्टी करतोय. सायली त्याला समजवण्याचा प्रयत्न करतेय, परंतु अर्जुन काहीही ऐकून घ्यायला तयार नाहीये.
अर्जुनच्या याच उतावीळपणाचा फायदा साक्षी आणि महिपत घेत आहेत आणि पुढेही घेत राहणार यात शंका नाही. ठरलं तर मगमध्ये आणखीन एक मोठा ट्विस्ट येणार आहे. जेथे चैतन्य सगळे आरोप स्वतःवर घेईल की, मीच साक्षविरुद्ध खोटे पुरावे सादर केले. ह्यात अर्जुनचा काहीही हात नाही.
चैतन्याच्या या डावामुळे अर्जुन तर सुटणार, परंतु त्यानंतर पुढे काय होईल हे पाहणं खूपचं इंटरेस्टिंग असणार आहे. अर्जुन आणि सायली पुन्हा एकदा साक्षी आणि महिपतला अडकवू शकतील का, हे जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !