Tharala Tar Mag Today ठरलं तर मग या मालिकेत एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. सध्या या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे आणि या प्रोमोमध्ये दाखवण्यात येत आहे की, सायली अर्जुन चैतन्य आणि साक्षीच्या साखरपुड्याआधी चैतन्यला भेटायला येतात आणि चैतन्यसमोर साक्षीचं खरं रूप ठेवतात. साक्षी कुणालची गर्लफ्रेंड होती. याबद्दलचे सगळे पुरावे त्याच्यासमोर ठेवतात आणि हे पुरावे पाहून चैतन्यला जबर धक्का बसतो.
साक्षीने आपला विश्वासघात केलाय, हे चैतन्यला समजतं आणि तो ढसाढसा रडू लागतो. अर्जुन त्याला सावरतो. चैतन्य खूप चिडलेला असतो आणि ठरवतो की, आत्ताच्या आत्ता मी साक्षीबरोबरचा साखरपुडा मोडतो. तिला जाब विचारतो, परंतु अर्जुन आणि सायली त्याला थांबवतात.
Tharala Tar Mag Today
अर्जुन चैतन्यला म्हणतो, हा खेळ साक्षीने सुरू केला होता. परंतु आता आपण तो संपवायचा. चैतन्यसुद्धा यासाठी तयार होतो. तो अर्जुन आणि सायलीच्या टीममध्ये येतो.
म्हणजे एकूणचं येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसेल की, चैतन्य साक्षीशी प्रेमाने वागण्याचं नाटक करेल Tharala Tar Mag Today आणि तिच्याविरुद्ध पुरावे गोळा करेल. आश्रम मर्डर केसमध्ये साक्षी हीच खरी दोषी आहे, तिनेच खून केलाय आणि प्रियाच्या साथीने मधु भाऊंना अडकवलंय, याबद्दलचे पुरावे अर्जुन आणि सायलीकडे नव्हते. परंतु आता चैतन्याच्या मदतीने त्यांना हे पुरावे नक्कीचं मिळतील.
घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील कलाकार
आणि (Tharala Tar Mag Today) हे पुरावे मिळाल्यानंतर जेव्हा अर्जुन कोर्टात साक्षीला दोषी ठरवेल, तेथेचं साक्षीसमोर हा खुलासा होईल की, चैतन्यला तिचं सत्य समजलंय आणि महिपतच्या बाजूच्या कोठडीत साक्षीची रवानगी होईल, तिचाही खेळ संपणार.
ठरलं तर मग मालिकेत येणार मोठा ट्विस्ट
म्हणजे पुढील काही दिवसांमध्ये ठरलं तर मग या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक ही मालिका पाहायला खूप उत्साहित आहेत.
ठरलं तर मग या मालिकेने मागील 2 वर्षांपासून प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलंय. प्रेक्षकांची आवडती बनली आहे. म्हणूनचं टीआरपीच्या लिस्टमध्ये ही मालिका नेहमी नंबर 1 असते. कधीही आपली जागा सोडत नाही.
तर तुम्हाला हे ट्विस्ट पाहायला आवडतील का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन अपडेटसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !