Tharala Tar Mag News ठरलं तर मग मालिकेत अर्जुन आणि सायलीच्या मागील शुक्लकाष्ठ काही संपण्याचं नाव घेत नाहीये. आता कुठे अर्जुन साक्षीच्या प्लॅनमधून सुटला अस वाटत होतं आणि त्यातचं त्याची एक चूक या दोघांनाही खूप महागात पडणार आहे.
चैतन्यने साक्षीला सांगितलं होतं की, अर्जुन आणि सायली या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय. या गोष्टीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न साक्षी करतेय आणि तिने अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स शोधण्याचं काम प्रियाला दिलं.
Tharala Tar Mag News
नुकत्याचं झालेल्या एपिसोडमध्ये साक्षी आणि महिपतने हे पेपर्स शोधण्यासाठी प्रियाला धमकी दिली आणि मग प्रिया अर्जुनच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिने अर्जुनच्या ड्रॉवरची चावी चोरली.
दुसरीकडे अर्जुनला मात्र संशय आलाय की, प्रिया अचानक त्याच्या ऑफिसमध्ये का आली होती ? नक्कीचं साक्षीने तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगितलं आणि ती कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स शोधण्यासाठी आली होती.
अर्जुन ही गोष्ट सायलीला सांगणार. त्यामुळे सायलीलाही मोठा धक्का बसेल आणि मग हे दोघे मध्यरात्री ऑफिसमध्ये पोहोचतील. परंतु हे दोघे ऑफिसमध्ये पोहोचण्याआधीच प्रिया तेथे जाऊन अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स चोरणार.
पेपर्स ऑफिसमधून गायब झाल्याचं पाहून अर्जुनला जबर धक्काचं बसेल. पण आता वेळ निघून गेलीये. प्रिया लवकरचं या पेपर्सचा वापर करून अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांमोर आणेल. तिच्याकडे पुरावा असेल, त्यामुळे अर्जुन आणि सायलीला हे सत्य मानावं लागेल.
लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत मोठा ट्विस्ट
मग जेव्हा अर्जुन आणि सायलीचं सत्य संपूर्ण जगासमोर येईल तेव्हा काय घडेल ? तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !