Tharala Tar Mag 22nd April Episode : ठरलं तर मग आजचा भाग

Tharala Tar Mag 22nd April Episode

Tharala Tar Mag 22nd April Episode स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेच्या 22 एप्रिलच्या एपिसोडमध्ये अर्जुन त्याच्या कॉलेजच्या मित्रांबरोबर रियुनियन एन्जॉय करत असतो. परंतु सायलीला मात्र साक्षीचं सत्य समजल्यामुळे ती खूप अस्वस्थ असते. आता अर्जुन खुश आहे, तर त्याला येथे एन्जॉय करू दे. घरी गेल्यावर त्याला सत्य सांगायचं ती ठरवते.

दुसरीकडे प्रिया रविराज आणि नागराजची वाट पाहत असते. तेवढ्यात हे दोघे घरी पोहोचतात. घरी आल्यानंतर रविराज नागराजला विचारतो की, तुझा आणि महिपत शिखरेचा काय संबंध आहे ? तू त्याच्या माणसांना का भेटलास ? रवीराजला आपलं सत्य समजलंय, हे ऐकून नागराजच्या पायाखालची जमीनचं सरकते.

Tharala Tar Mag 22nd April Episode

इकडे अर्जुनच्या कॉलेजच्या मित्रांची रियुनियन संपते आणि सगळे एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घरी जायला निघतात. गाडीमध्ये सुद्धा अर्जुन रियुनियनमध्ये किती मजा आली, रियुनियन दरवर्षी व्हायला पाहिजे, याबद्दलचं बोलत असतो. तर सायली मात्र त्याला साक्षीचं सत्य सांगायचं ठरवते.

इकडे Tharala Tar Mag 22nd April Episode नागराज रविराजला म्हणतो की, मी महिपत बरोबरचे सगळे संबंध तोडले. तर रविराज त्याला म्हणतो, खोटं बोलू नकोस. तू महिपतच्या माणसांना भेटलास. त्यांना वसुली करायला सांगितली. 24 तासात कधीही फोन करायला सांगितला. हे मी ऐकलं नाहीये का ? प्रिया खूप खुश होते.

ठरलं तर मग

तर नागराज रविराजला म्हणतो, मी महीपतशी सगळे संबंध तोडलेत. परंतु महिपत जेलमध्ये गेल्यानंतर फायनान्सर साक्षीला खूप त्रास देत आहेत, म्हणून मी फक्त तिला मदत करतोय. प्रिया म्हणते, परंतु मी तर तिच्याशी सगळे संबंध तोडलेत. त्यामुळे रविराज नागराजला शेवटची वार्निंग देतो की, यानंतर तू त्याच्याशी संबंध ठेवले, तर परिणामांना सामोरे जायला तयार रहा.

ठरलं तर मग आजचा भाग

इकडे सायली अर्जुनला साक्षीच्या कॉलेजमधील फोटो दाखवते. अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो. सायली विचारते, साक्षी कोणत्या मुलाला मिठी मारतेय ? अर्जुन म्हणतो, तो कुणाल आहे. याचा अर्थ कुणालची गर्लफ्रेंड साक्षी होती आणि त्यामुळेचं कुणालने आत्महत्या केली आणि आता साक्षी चैतन्यचं सुद्धा तेच करेल, हा विचार करून अर्जुन खूप घाबरतो.

पुढील Tharala Tar Mag 22nd April Episode एपिसोडमध्ये आपण पाहू की, अर्जुन चैतन्यला साक्षीचं सत्य सांगायचा प्रयत्न करेल, पण तो काहीच ऐकून घेणार नाही. ठरलं तर मग मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट रोज वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला पुन्हा नक्की भेट द्या.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top