Tharala Tar Mag : ठरलं तर मग मालिकेतील संतूर मम्मी

tharala tar mag

Tharala Tar Mag ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे आणि या मालिकेत साक्षी शिखरे ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे प्रसिद्ध अभिनेत्री केतकी पालव. मालिकेच्या सुरुवातीला मीरा जगन्नाथ साक्षीची भूमिका साकारत होती. परंतु तिने मालिकेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर केतकी पालव या भूमिकेत आली आणि तिनेही प्रेक्षकांचं मन जिंकलं.

केतकी याआधी आपल्याला सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत दिसली होती. ती सोशल मीडियावरही खूप ऍक्टिव्ह असते. ठरलं तर मग मालिकेत अजून साक्षी म्हणजेचं केतकीचं लग्न झालेलं नाहीये. परंतु खऱ्या आयुष्यात मात्र केतकी पालव ही विवाहित आहे. तिच्या लग्नाला 7 वर्षे झाली असून तिला एक 5 वर्षांची मुलगीही आहे.

Tharala Tar Mag मालिकेतील अभिनेत्री केतकी पालव

केतकी पालवच्या नवऱ्याचं नाव गंधार पटवर्धन असं आहे आणि केतकीच्या 5 वर्षांच्या मुलीचं नाव ईश्वरी आहे. तिचा जन्म 2019 मध्ये झाला होता. केतकी नेहमीचं तिच्या पतिबरोबर आणि मुली बरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. फॅन्स या फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

अक्षय कुमारचा नवीन चित्रपट झाला फ्लॉप

केतकी सध्या Tharala Tar Mag या मालिकेबरोबरचं आमने-सामने या नाटकातही काम करत आहे. मागील अनेक वर्षांपासून ती अभिनय क्षेत्रात काम करते. परंतु ठरलं तर मग या मालिकेने तिला प्रेक्षकांमध्ये एक आगळीवेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. तिच्या प्रसिद्धीत मोठी वाढ केली आहे.

काही दिवसांपूर्वी केतकीने तिचा नवरा गंधारचा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिने गंधार बरोबरचा आपला एक स्पेशल फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि तू माझ्या आयुष्यातील सर्वात आवडती व्यक्ती आहे, माझ्यासाठी तू पुरेसा आहे. असं कॅप्शनही तिने या फोटोला दिलं होतं.

केतकीची मुलगी ईश्वरी सुद्धा तिच्या सारखीचं खूप सुंदर आणि क्युट आहे. केतकीचं हे छोटसं आणि सुखी कुटुंब असंच आनंदात राहो, आपणही अशीच प्रार्थना करूयात. तुम्हाला आवडते का Tharala Tar Mag मधील केतकी पालव ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन बातम्यांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top